Friday, 7 July 2017

अजून.. किती दिवस, आपण हे दुखः झेलणार आहोत..?
त्यावेळी, पूर्वेकडे लक्ष दिलं गेलं नाही. 
आणि आता, ते आम्हाला पुरायला निघाले आहेत. आपण आहोत कुठे.?

एकीकडे, या पाकिस्तानने आपल्या नाकात अगदी दम केला आहे. पाकिस्तान, हा एक नंबरचा भिकार देश आहे. भिक मागून जगतात, आणि जगात मोठेपणा मिरवतात. 
ते का कमी म्हणून, आपली काश्मिरी जनता सुद्धा त्या आगीत तेल ओतायचं काम करत आहे. मी सरसकट सर्वांना म्हणत नाहीये, पण शेवटी आहेत ना..? 
शेवटी.. गव्हासोबत किडे सुद्धा रगडले जाणारच कि. त्यात माझा दोष नाहीच.
आणि, या सगळ्यावर कुरघोडी म्हणून. आपल्या देशात.. क्रिकेट साठी, त्या विदेशी खेळासाठी खेळला गेलेला सट्टा. आणि, पाकिस्तानी बुकी लोकांना त्यातून मिळालेली रक्कम. अतिरेकी लोकांमार्फत, त्या मूर्ख काश्मिरी अतिरेकी जनतेच्या हातात देऊन. आपल्या, काश्मिरी पोलिसांवर दगडफेक केली जात आहे. 
अरे बेट्याहो, हे अतिरेकी तुम्हाला कुठवर पोसणार आहेत..? जे काश्मिरी व्यक्ती खरोखर न्युट्रल जीवन जगत आहेत. एकवेळ त्यांच्याकडे सुद्धा पाहा. 
काश्मीर पाहायला जर पर्यटक यायचे बंद झाले. तर, तुम्ही साले अन्न-अन्न करून उपाशी मरताल. आणि त्या अपराध न करणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही जीवे मरताल. आणि त्यावेळी, ते अतिरेकी लोकं तुम्हाला मारू लागायला सुद्धा मदत करतील. पण बघा ना, तरी सुद्धा त्यांच्या अंगात किती मस्ती आहे. शक्य असेल तर त्यांना वेळीच आवरा.

आणि.. काहीच कारण नसताना, ते नालायक चीनी लोकं भारतीयांशी अगदी नको तसं वागत आहेत. चायना हा एक नंबरचा नालायक आणि विस्तारवादी देश आहे. तसं पाहायला गेलं तर, हिंदुस्थानची सीमा अगदी हिंदुकुश पर्वता पर्यंत होती. त्यापुढे जाऊन, अगदी बाली सुमात्रा बेटा पर्यंत आपली हिंदू सरहद्द पसरली होती. आजही त्या भागात असणारी हिंदू मंदिरं त्याची साक्ष देत जशीच्या तशी उभी आहेत. 
अरे नालायकांनो, विस्तार करून काय हाशील करताय, आपल्या घरात सुखी राहा ना राव..! 

आपल्या देशात राहून, आपल्या हिंदू तीर्थ स्थळांना भेटी द्यायला आपण नाकाम ठरत आहोत. आपल्याकरिता हि फार मोठी शर्मनाक गोष्ट आहे. 
गतवर्षी याच अतिरेकी लोकांनी, अमरनाथ यात्रा बंद पाडली. कित्तेक तरुण वृद्ध लोकं, फार मोठी आशा घेऊन या यात्रेला गेले होते. आणि सरतेशेवटी, त्यांना देव दर्शन न घेताच माघारी फिरावं लागलं. का आणि कशासाठी होतंय हे सगळं..? आम्ही, अगदी नाकाम झालो आहोत का..?

आत्ता.. नुकतीच कुठे, मानस सरोवर यात्रा सुरु झाली आहे. या वर्षीच्या यात्रेचा भाविकांचा, जेमतेम पहिलाच जत्था चायनाच्या सरहद्दीवर पोहोचला. आणि, अचानक एक बातमी येऊन धडकली. कि.. खराब हवामानामुळे, त्या भाविकांना यात्रेसाठी पुढं सोडलं गेलं नाही. 

पण.. खरी परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे मित्रांनो..!
 
चीनी लोकांनी, भारतीय नागरिकांना मानस सरोवर यात्रेसाठी सोडण्यासाठी मज्जाव केला आहे. 
कधीकाळी, हिंदी चीनी भाई-भाई म्हणून नारा देणाऱ्या ह्या चिन्यांनी, त्यावेळी आपली लायकी दाखवत भारतीयांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. हे आपण बिलकुल विसरता कामा नये.

तरी सुद्धा, आपण लोकं फार मायाळू. आजही.. आमचे कित्तेक व्यापारी, निव्वळ चार पैशाचा फायदा होतोय म्हणून चीन मध्ये तळ ठोकून बसले आहेत. तेथील उत्पादनं फार मोठ्या प्रमाणात भारतात कसे पसरवता येतील, या धडपडीत आहेत. 
आणि, त्याचबरोबर भारतीय माल किती निकृष्ट दर्जाचा आहे. हे सुद्धा, ते आपल्या जनतेला अगदी लीलया पटवून देत आहेत. भले, आपले भारतीय उद्योजक नालायक असतील. पण त्यामुळे, ते चीनी लोकं आपले सक्खे होणारा आहेत का..?
खरं पाहायला गेलं तर, भारतात त्यांनी फार पूर्वीपासून विष पेरून ठेवलं आहे. 
लहान मुलांच्या खेळण्यात, अति प्रमाणात शिशाचा वापर करून त्यांना अगदी चकचकीत केलं जातं. पण तीच खेळणी लहान मुलांनी तोंडात घातली कि, तो रासायनिक पदार्थ त्याच्या पोटात जाऊन त्याला विषबाधा होते. हल्लीच, मेंदीच्या कोनातून सुद्धा त्यांनी विष पसरवण सुरु केलं आहे. चायनिस मेहेंदीमुळे मुलींच्या हाताला फार मोठी सूज येत आहे. आणि त्यानंतर, संपूर्ण अंगात विष भिनल्यावर. त्या मुलीचा जीव वाचावा म्हणून, त्यांचे हात कापावे लागत आहेत. दिवाळीच्या फटाक्यात सुद्धा, विशिष्ट प्रकारची शोभेची दारू वापरून जास्तीचं प्रदूषण कसं पसरवता येयील त्याकडे त्यांचं लक्ष असतं. आता पुढील महिन्यात चायनिस गणपती आणि त्यांच्या सजावटीच सामान भारतात येईल. कसं थोपवावं यांना..?
मित्रांनो, या चीनी भस्मासुराला आवरा रे.. नाहीतर, तो आपल्याला बेचिराख करून सोडेल.

काल.. त्यांनी भारतीय भाविकांना मानस सरोवराच्या यात्रेला जाण्यापासून रोखलं आहे. आपल्या सैन्याशी, त्यावर त्यांची हमरीतुमरी सुद्धा झाली. सीमेवर लढणारा प्रत्येक जवान, आपल्या रक्ता मासाचा नातवाईक नक्कीच नसतो. तरी सुद्धा, तो सीमेवर आपल्या अनामिक बांधवांसाठी अविरत झटत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तर मग, त्यांच्या प्रेमापोठी आपण सुद्धा त्यांचं काही तरी देणं लागतोय कि नाही..?
एकतर.. जुन्या राजकारण्यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पूर्वेकडे खास लक्ष दिलं नाही. त्यामुळे, मानस सरोवर आणि कैलाश पर्वत आपल्या हातातून गेला. आणि आज आपल्याला हे दिवस पहावे लागत आहेत. आज आपले शंभू महादेव तिथे बंधिस्त झाले आहेत. त्यांच्या भेटीसाठी आम्हाला आता पासपोर्ट आणि व्हिजा काढावा लागतोय. यापेक्षा मोठी, मानहानी ती कोणती..?

गुलामगिरी झटका, आणि खऱ्या अर्थाने चीनी मालाची होळी करा. आणि त्यावर बहिष्कार टाका. मित्रांनो, तुम्ही अशी काही धडाकेबाज कृत्य करा. 
कि चीनची बाजारपेठ अगदी हादरून गेली पाहिजे. आणि हे काम खूप सोप्पं आहे मित्रांनो. 
भारतीय बाजारपेठ, हल्ली त्यांच्या मालाला नकार देत आहेत. म्हणून तोच माल, ते दुसऱ्या देशातून आपल्या देशात निर्यात करत आहेत. त्यामुळे, हल्ली चायनिस वस्तूंच्या किमती सुद्धा खूप वाढल्या आहेत. 
याचाच फायदा उचलत, भारतातील व्यापाऱ्यांनी, त्यांचा माल खरेदी करण्याचं टाळलं, तर फार मोठं गणित घडू शकतं. 
मालाची खरेदीच झाली नाही, तर त्यांचे व्यापार फुलतीलच कसे..? 
बघा मित्रांनो, आजवर या धगधगत्या विषयावर मी बरेच लेख लिहिले आहेत. त्यावर, तुम्ही सर्व मित्रांनी अंमलबजावणी सुद्धा केली आहे. आता पुन्हा एकदा हाती शस्त्र घेण्याची वेळ आली आहे.
मागे सरकू नका, कंबर कसून कामाला लागा. 

फक्त आणि फक्त, आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी जागा..!


 

No comments:

Post a Comment