गुरुविण कोण आम्हा आधार..
आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी. त्याठिकाणी, आपल्याला गुरु नावाच्या व्यक्तीची नितांत गरज भासते. सुरवातीच्या काळात, सगळ्यात पहिल्या गुरूचा मान आपल्या पुज्यरूप आईला जातो. त्यानंतर शाळेत असणारे शिक्षक. आणि, तिथून पुढच्या काळामध्ये, तुम्ही कोणत्या व्यवसायात किंवा कामात पारंगत होताय. त्याठिकाणी सुद्धा, आपल्याला नव्याने एका गुरूची गरज भासते. किंवा, त्याकरिता कोणीतरी आपल्या पाठीशी धावून येतंच.
मी ड्रायव्हर का आणि कसा झालो. याची, बरीच मोठी हकीकत आहे. मला ड्रायव्हिंगचे धडे शिकवण्यासाठी बरेच मित्र त्यावेळी धावून आले होते. प्रत्येक व्यक्तीकडून, मला वेगवेगळ्याप्रकारे ज्ञनार्जन झालं होतं. त्यामुळे, " आज माझ्या घरातली चूल पेटत आहे..! "
हे इथे, मला प्रामाणिकपणे सांगावसं वाटतंय. काही दिवसांनी, ते एपिसोड मी तुमच्या समोर सादर करणारच आहे. तत्पूर्वी, मला तुम्हाला एक हकीकत सांगायची आहे.
हे इथे, मला प्रामाणिकपणे सांगावसं वाटतंय. काही दिवसांनी, ते एपिसोड मी तुमच्या समोर सादर करणारच आहे. तत्पूर्वी, मला तुम्हाला एक हकीकत सांगायची आहे.
मी नव्याने ड्रायव्हिंग शिकत असताना. मला, घाटामध्ये गाडी चालवण्याचा अनुभव हवा होता. पण, नवीन ड्रायव्हरला घाटात गाडी चालवायला देण्याचं धाडस कोण करणार..?
एकदा माझ्या मित्रासोबत, गाडी शिकण्यासाठी मी नागपूरला निघालो होतो. नागपूर पासून दीडशे किलोमीटर अंतरावर अलीकडच्या बाजूला तळेगाव नावाचं एक गाव आहे. आणि त्यापुढे तळेगावचा घाट लागतो. मला, ह्या घाटामध्ये एकट्याने गाडी चालवण्याची खूप इच्छा होती. परंतु, माझ्या एकट्याच्या हातामध्ये कोणी गाडी देणार नव्हतं.

तेंव्हा, चहा पाण्याकरिता आम्ही तळेगावात थांबलो होतो. तितक्यात, माझा " सुनील पवार " नामक एक मित्र त्याची गाडी घेऊन आमच्यापाशी आला. सहा फुट उंची आणि ऐंशी नव्वदच्या आसपास वजन असणारा सुनील. अगदी रुबाबदार पद्धतीने गाडी चालवायचा. ड्रायव्हर सीटवर बसताना, उजवा हात कोपर्यात दुमडून सुमोच्या दरवाजावर हाताचा कोपरा ठेवत त्याच हाताने स्टींअरिंग फिरवण्याचं कसब त्याने आत्मसात केलं होतं. गाडी चालवताना त्याच्या रुंद छातीवर रुळणारी चपट्या आकारातील बेन्टेक्सची चेन सुद्धा फारच उठून दिसायची.
सुनील माझ्यापाशी आला, तेंव्हा माझा चहापाणी उरकलं होतं. त्याच्या गाडीमध्ये, दोन प्रवाशी बसले होते. आणि, अचानकपणे त्याने त्याच्या गाडीची चावी माझ्या हातात दिली. आणि म्हणाला..
सुनील माझ्यापाशी आला, तेंव्हा माझा चहापाणी उरकलं होतं. त्याच्या गाडीमध्ये, दोन प्रवाशी बसले होते. आणि, अचानकपणे त्याने त्याच्या गाडीची चावी माझ्या हातात दिली. आणि म्हणाला..
" तू गाडी घेऊन पुढे जा, आपण नागपूरला भेटूयात..! "
माझ्या मनातील इच्छा, फळाला आली होती. मी तडक गाडीला स्टार्टर मारला. आणि, वेडीवाकडी वळण असलेला तळेगावचा तो घाट पास केला. त्यामुळे, घाटात ड्रायव्हिंग करण्याचा मला एक नवीन अनुभव मिळाला होता. मजल दरमजल करत, मी नागपूरला पोहोचलो. तिथे पोहोचेपर्यंत, मी जवळपास तीनशे रुपये धंदा केला होता. वाडी नाक्यावर गाडी उभी करून, मी माझ्या मित्रांची वाट पाहात उभा होतो. थोड्याच वेळात, बाकीचे मित्र सुद्धा त्यांच्या गाड्या घेऊन वाडी नाक्याला आले.
सुनील माझ्यापाशी आला, गाडीची चावी, आणि 'मी' कमवलेले तीनशे रुपये मी त्याच्या हातामध्ये दिले. त्याने, त्या तीनशे रुपयातले शंभर रुपये मला बक्षीस म्हणून दिले होते. ड्रायव्हर म्हणून, माझ्या आयुष्यातील ती माझी पाहिली कमाई किंवा बक्षिशी होती..
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे, मला ड्रायव्हिंग शिकवणारे तसे बरेच हात होते. पण दुर्दैवाने, त्यातील एका सुद्धा मित्राला सरकारी किंवा स्थिरस्थावर नोकरी मिळाली नाही. सुनील सुद्धा अजून पर्यंत कानवायच ( कंपनीच्या नवीन गाड्या सोडण्याचं काम ) करत होता.

एक फेब्रुवारीला तो बेंगलोरला गाडी घेऊन निघाला असता. पाठीमागून आलेल्या वाहनाने त्याच्या गाडीला इतकी मोठी धडक दिली. कि तो, अक्षरशः काच फुटून गाडीच्या पुढच्या बाजूला फेकला गेला. आणि त्यातच त्याचा करून अंत झाला. आज, त्याचा शेवटचा विधी आहे. थोडसं मागं फिरून त्याच्या काही आठवणी जाग्या झाल्या. हे लिहिताना सुद्धा, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. शेवटी विधिलिखित कोणाला टळलं आहे म्हणा..!
म्हणून, आजचं एक लेखन पुष्प मी त्याला श्रद्धांजली म्हणून अर्पण करत आहे.
मृतात्म्यास सद्गती प्राप्त होवो..!
No comments:
Post a Comment