कोणत्याही दुकानात, एखादी वस्तू किंवा अन्य काही मोफत मिळत असेल का..?
नाही ना..!
मी लहान असताना, आई वडिलांबरोबर पुणे मुंबई रेल्वे प्रवास करत होतो. त्यावेळी, मी जेमतेम सात आठ वर्षांचा असेल. त्यावेळी, मला एक गोष्ट पाहायला मिळाली होती.
दुकानात नाही... पण,
रेल्वे मधून प्रवास करत असताना. बटर पेपरचं वेष्टन असलेल्या, लक्ष्मीनारायण चिवड्याचे लहान-लहान पाकिटं रेल्वेतील प्रवाशांना मोफत वाटली जात होती. हा झाला जाहिरातीचा भाग. पण त्यामुळे, आज त्या चिवड्याने उंचच्या उंच भराऱ्या घेतल्या आहेत.

हल्ली मॉल मध्ये सुद्धा, एकावर एक वस्तू मोफत. हे फ्याड, खूप मोठ्या प्रमाणात आलं आहे. तसं पाहिलं तर, कोण कोणाला काहीच मोफत देत नसतं. उलट, एकाच्या ठिकाणी ते दोन वस्तू आपल्या माथी मारत असतात. पण.. हे गणित समजेल त्यालाच.
असो.. तर आपला विषय, मोफत काय मिळतं. किंवा, मिळू शकतं याचा होता..

पूर्वी मी..पानपट्टीचा व्यवसाय सुद्धा करत होतो. त्याकाळची एक घटना मला आठवतेय. माझ्या दुकानात, सगळ्या वस्तू विकत मिळायच्या. पण एखाद्या व्यक्तीने, तंबाखूचा " विडा " मागितला तर. तो मला, हसतमुखाने आणि अगदी मोफत द्यावा लागायचा.
त्या व्यवसायातला तो एकप्रकारचा अलिखित नियमच होता. त्यामुळे, दिवसाकाठी तंबाखूच्या दोन पुड्या तरी हमखास संपायच्याच..!
माझ्याकडून मोफत विडा घेणारे ती लोकं फुकट चंबू बाबुराव होते. किंवा, त्यापाठीमागे आणखी काही वेगळी कारणं असतील. त्याचा मी, कधी शोध घेतला नाही.
कारण.. " शौक बहोत बडी चीज होती है..! "
शिवाय..
" बाईने चुड्याला आणि पुरुषाने तंबाखूच्या विड्याला कधी नाही म्हणून नये..! "
असं मी ऐकून आहे.

अजूनही.. पानपट्टीवर तो प्रकार चालू आहे का नाही ते मला माहित नाही. पण, आपल्यातल्या काही तंबाखू शौकीन मित्रांना ते नक्की माहित असेल.
परंतु माझ्या माहितीप्रमाणे, तो प्रकार अजून चालू असावा.. असा, माझा अंदाज आहे..!

No comments:
Post a Comment