सेक्स.. ( प्रकरण... ३ )
===============
पूर्वीच्या काळातील मुला मुलींना एकमेकांबद्धल शारीरिक किंवा सौंदर्यीक आकर्षण नव्हतं. अशातला भाग नाहीये. किंवा, त्या किशोर वयात त्यांना त्या गोष्टीचं सखोल ज्ञान नव्हतं अशातला सुद्धा भाग नाहीये. ठराविक वेळात, मुला मुलींना ह्या विषयाची जान हि होतंच असते. पण त्याकाळी, घरून तेवढी सूट मिळत नव्हती. मुलींशी साधं बोलणं जरी झालं, तरी त्याकाळी तो मुला मुलींमध्ये एक चर्चेचा विषय ठरायचा. मुलीचा एखादा हळुवार स्पर्श सुद्धा, त्या आशिक मुलाकरिता कित्तेक महिन्यांचा सुंदर सोबती ठरायचा. मग त्याकाळी खुद्द प्रेम प्रकरणं किती सोपी आणि कठीण याची कल्पनाच केलेली बरी. माझ्या बऱ्याच समवयस्क किंवा त्याहून मोठ्या व्यक्तींना याची अनुभूती असावीच.

माझ्या अनुमानाप्रमाणे, हल्लीच्या मुलांमध्ये सेक्स ह्या विषया बद्धल खास आकर्षण नसावं. किंवा एकप्रकारची अनास्था असावी. असा, माझा अंदाज आहे. हल्ली सुरवातीपासूनच मुलं मुली अगदी मनमोकळ्या पणाने वावरताना आढळतात. त्यामुळे, त्यांच्यामध्ये म्हणावा असा दुरावा किंवा आकर्षण आढळत नाही. कोणत्याही विषयावर, त्यांच्या खुलेआम आणि मोकळेपणाने चर्चा घडत असतात. एकमेकांची प्रेम प्रकरणं, मुलं मुली आपसात अगदी मनमोकळे पणाने शेअर करत असतात. त्यामुळे काही अंशी काही, मुलं मुली हि निव्वळ मित्र म्हणूनच वावरताना आढळतात. त्यांच्या मध्ये, एकमेका बद्धल शारीरिक आकर्षण असं नसतं. हल्लीची बहुतांशी मुलं मुली, एकमेकांचा निरोप घेताना चक्क एकमेकांना आलिंगन देतात. पण त्या आलिंगना मध्ये 'वासना' नसते. हे मी फार जवळून अनुभवलं आहे. एक मुलगा, आणि मुलगी मित्र असू शकत नाहीत का..? माझ्या मुलाने मला केलेला हा खडा सवाल होता. आणि, ह्या प्रश्नासमोर मी अगदी निरुत्तर ठरलो होतो.
कालांतराने, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेमाचा अंकुर फुटू सुद्धा शकतो. हि शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. अशी बरीच उदाहरणं, मला पाहायला मिळाली आहेत. ह्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात प्रत्येकाच्या हातामध्ये आलेला मोबाईल. या गोष्टींना, बऱ्याच अंशी कारणीभूत ठरला आहे. असं म्हंटल तर ते वावगं ठरू नये. सगळं जग, आज त्यांच्यासमोर हात जोडून उभं आहे. एका चुटकीसरशी त्यांना जगातील हव्या नको त्या गोष्टी पाहायला, वाचायला आणि ऐकायला मिळत आहेत. हे त्यांचं सुदैव कि दुर्दैव हा चर्चेचा विषय ठरावा. शेवटी, नाण्याला दोन बाजू आहेत. कोणती बाजू आपल्याला कोणता प्रताप दाखवेल. त्याचा, काहीच अंदाज बांधता येनार नाही.
समाप्त..
No comments:
Post a Comment