Thursday, 4 February 2016

सेक्स.. ( प्रकरण... २ )
=============
सेक्स ह्या विषयाचं, सिनेमा मधील योगदान अगदी वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. इंग्रजी सिनेमामध्ये, सुरवातीपासून बराच मोकळेपणा असल्याने. त्यांना, त्या गोष्टीचं काहीएक सोयरसुतक किंवा अप्रूप नव्हतं. परंतु.. सेक्स हा, आपल्या संस्कृतीचा प्रमुख भाग असून सुद्धा. यामध्ये आपली, पीछेहाट का झाली..? यावर, अभ्यास होणं खूप गरजेचं आहे.
आजही.. खजुराहो सारख्या कित्तेक मंदिरावर, आपल्याला प्रणय प्रतिकृती दृश्य पाहायला मिळतात. त्याचं मुख्य कारण एकच आहे. कि.. हे, भोगविलासी जीवन जगत असताना. त्यातून, तुम्ही पूर्णपणे हद्दपार व्हा. मनामध्ये आणि तणामध्ये, कोणतीही इच्छा आकांक्षा मागे शिल्लक ठेवू नका. त्याशिवाय, तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होणार नाहीये.
हा, सरळ आणि साधा नियम आपल्या पूर्वजांनी आपल्यासमोर एक आदर्श म्हणून ठेवला होता. हे अगदी साधं आणि सोप्पं गणित होतं. सेक्स हि, एक प्रकारची सुंदर अशी लैंगिक कला आहे. काळाच्या ओघात.. हे बहुमूल्य ज्ञान शिकवण्यात, आपला भारतीय धर्म कुठेतरी मागे पडलेला दिसतो. हे सुद्धा तितकंच खरं आहे. हे.. काही लोकांच्या, मागासलेपणाच्या मनोवृत्तीमुळे घडलं असावं. असं, माझं ठाम मात आहे. त्यामुळे, भारतीय संस्कृतीत आपण सेक्स ह्या कलेची पाळेमुळे घट्ट रोऊ शकलो नाही. हि फार मोठी शोकांतिका आहे.
सुरवातीच्या काळात, मराठी भावगीता मधून काही गोष्टी मांडल्या जाऊ लागल्या. आपण विचार करण्याच्या पुढील काही गोष्टी आहेत. पण त्या कवी महाशयांनी त्या गोष्टी अगदी चपखलपणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्यामते, आपल्या भारतीय संस्कृतीला लाभलेला तो एक फार मोठा मैलाचा दगड ठरावा.
वानगीदाखल, " तरुण आहे रात्र अजून राजसा निजलास का रे..! "
ह्या संपूर्ण गीताचा, आशय आणि विषय अगदी बेधुंद करणारा असा आहे. ह्या भावगीतातील प्रत्येक कडव्यात प्रणयरंग अगदी ठासून भरला आहे. आणि, शेवटी तर तो विषय अगदी उफाळून आपल्या अंगावर येऊ घालतो. ते प्रत्यक्ष, हे गीत ऐकतेवेळी आपल्या ध्यानात येतं.
त्यानंतर.. मराठी सिनेसृष्टीतील महान कलाकार, दादा कोंडके ह्या 'दादा' माणसाने. साध्या शब्दाचे सेक्सी दुहेरी 'अंतरंग' आपल्याला दाखवायला सुरवात केली.
बोट लावीन तिथे गुदगुल्या, अंधळा मारतो डोळा, अंधेरी रात मे दिया तेरे हातमे..
हि त्यातील, नामसाधर्म्य अशी काही ठळक उदाहरणं होत..
त्यापुढे जाऊन.. काही सिनेमांमध्ये, बरीच 'आंबट' दृश्य सुद्धा दाखवली जाऊ लागली. राजकपूर साहेब यामध्ये फार आघाडीवर होते. मेरा नाम जोकर, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम आणि राम तेरी गंगा मैली.. या सिनेमातून त्यांचं योगदान आपल्या ध्यानात येऊ शकतं.
रोजा सिनेमा मधील " रुक्मिणी रुक्मिणी " ह्या गीताने सुद्धा एक वेगळीच दालनं आपल्या समोर उघडून दाखवली होती. असा हा, बराच मोठा इतिहास आहे.
शेवटी आत्ता काही वर्षांपूर्वी आलेलं. " ड्रीमम वेकपम " ह्या हिंदी गीताने तर अगदी धुमाकूळ घातला होता. त्यात तर, त्यांनी काहीच शिल्लक ठेवलं नव्हतं.
आता तर.. पोर्ण स्टार 'सनी लियोन' सुद्धा आपल्या हिंदी पडद्यावर आली आहे. आता, उरली सुरली कसर सुद्धा भरून काढली जाणार. यात, तिळमात्र शंका नाही...!
क्रमशः 

No comments:

Post a Comment