माझ्या माहितीप्रमाणे..
कोणताही सरकारी नोकर, किंवा नोकरी करणारा माणूस. हा प्रामाणिकपणे, सरकारला टेक्स भरत असतो. भरत असतो काय..! त्याला तो, बळजबरी भरावाच लागतो. कारण, सगळा चिठ्ठा सरकारकडे असतोच ना. त्यामुळे, त्याबाबतीत नो चापलुसी..
परंतु, सरकारच्या धोरणानुसार. अंध, अपंग व्यक्तींना टँक्समध्ये सवलत असते. आणि ती सुद्धा, काही ठराविक मर्यादे पर्यंतच असते.
आज आम्हाला, वर्षभराचा पगार किती. आणि, त्यावर कोणाला किती टेक्स बसला आहे. त्याचा चार्ट सुद्धा मिळाला. त्यावर, आमची घमासान चर्चा चालू होती..
माझ्या दोन्ही अंध मित्रांना, टेक्स काही बसला नाही. आणि, आमचा अजून एक अंध मित्र आहे. त्याला सुद्धा, टेक्स बसला नव्हता.
पण.. तो पावत्या घेऊन आलेला मनुष्य मुद्दामच म्हणाला.
अरे.. तो अमुक एक अंध माणूस आहे ना. यावर्षी, त्याला सुद्धा टेक्स बसला आहे.
त्यावर, आमच्या सोबत असणारा. एक भोळा भाबडा व्यक्ती. ज्याला, यातलं शून्य ज्ञान आहे. आणि, त्याला सुद्धा भर भक्कम टेक्स बसला आहे. असा, तो दुक्खी व्यक्ती ताबडतोब म्हणून गेला.
टेक्स बसला, म्हणजे..
त्याला.. थोडं तरी दिसत असणार हो...!
No comments:
Post a Comment