Tuesday, 9 February 2016

आमच्या पुण्यात कोणतीही गोष्ट नव्याने आली. कि तिला, बिनबुडाचा विरोध हा पक्का ठरलेलाच असतो. एक नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात, ओघाने घाणेरडं राजकारण सुद्धा आलंच म्हणा.
आता, आमच्या पुणेकरांनी हेल्मेट सक्ती विरोधात कंबर कसून भांडायला सुरवात केली आहे. विरोधाला म्हणून विरोध काहीच कामाचा नाही बरं का. विचार करण्याची गोष्ट आहे. ह्या जगात निर्मिलेली, प्रत्येक वस्तू हि आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरत असते. त्यात, हे हेल्मेट सुद्धा आलच कि.
मग त्याला विरोध कशासाठी..?
एकतर, भारतातला तळागाळातील व्यक्ती. उभ्या आयुष्यात, फारफार तर हफ्त्यावर एखादी दुचाकी विकत घेऊ शकेल. इतपतच कमवत असतो. चारचाकी हे, त्याच्यासाठी शेवटपर्यंत स्वप्नंच असतं. आपण, हौसेने घेतलेल्या आपल्या दुचाकीची सगळी काळजी घेत असतो. पण बाईक चालवत असताना, आपण आपल्या शरीराची काळजी घेत असतो का..?
विदेशात, सर्रास लोकं चारचाकीने प्रवास करतात. कारण त्यांच्याकडे रस्त्यावर बाईक आणण्यासाठी भल्या मोठ्या नियमांना सामोरं जावं लागतं.
त्यात शिरस्त्राण ( हेल्मेट ) हे ओघाने आलंच. त्याचबरोबर, अंगामध्ये एखादं जाडजूड जर्किन सुद्धा घालावं लागतं. हातामध्ये, हेंड् गोल्व्ह्स सुद्धा हवेतच. सोबतच.. अपघात झालाच तर, कोपराला आणि ढोपराला मार लागू नये म्हणून त्यांना सुद्धा विशिष्ट प्रकारचं सुरक्षा कवच परिधान करावं लागतं. इतके सगळे उपद्व्याप करण्यापेक्षा, ती लोकं चारचाकी मध्ये प्रवास करण्यातच धन्यता मानतात. त्यात, त्यांची आमदनी सुद्धा तितकीच बक्कळ असते. त्यामुळे, त्यांना चारचाकीचं म्हणावं असं कौतुक नाहीये. हे सगळं का आणि कशासाठी केलं गेलंय..?
तर, अपघात झालाच तर. त्या संभाव्य व्यक्तीला काही दुखापत होऊ नये म्हणूनच ना..!
अरे.. एक तर, आपण जगाच्या अंदाजे पन्नास एक वर्षे मागे आहोत. अजून मागे पडण्याचा का प्रयत्न करताय. त्यांची आणि आपली कधी बरोबरी होईल कि नाही ते मला माहित नाही. पण, आलेली संधी पाहून. आपण एक पावूल पुढे टाकायला काय हरकत आहे..?
मी तुम्हाला, मला होत असलेले हेल्मेटचे काही फायदे सांगतो..
१ ) अपघातामध्ये डोक्याला जबरी मार लागत नाही. ( स्वानुभवाने सांगतोय )
२ ) हेल्मेट समोरच्या फायबर ग्लासमुळे, डोळ्यात धूळ जात नाही. पर्यायाने डोळे शाबूत राहतात. लवकर चष्मा लागत नाही.
३ ) संपूर्ण सुरक्षाकवच असल्याने.. उन, वारा, पाऊस किंवा प्रामुख्याने धुळीचा सामना होत नसल्याने. त्वचा तुकतुकीत राहते. चेहेरा काळा पडत नाही.
बघा बुवा पटत असेल तर हो म्हणा.
आणि हो, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. त्यासाठी, कोणाच्या तरी सक्तीची वाट पाहू नका..!

No comments:

Post a Comment