Tuesday, 2 February 2016

सेक्स... ( प्रकरण.. १ )
===============
चुकून.. सेक्स हा शब्द जरी कोणी उच्चारला. तर लगेच, क्षणार्धात तमाम स्त्री पुरुषांच्या अंतरमन पटलावर. आपापल्या आवडीचे, विविध प्रणय प्रसंग पिंगा घालून जातात. सर्वांगावर रोमांच उभे राहतात. आणि, बऱ्याच काही गोष्टी घडून जातात. किती मोठं सामर्थ्य आहे ह्या शब्दामध्ये..! 
खरं पाहायला गेलं तर, असं विशेष तरी काय आहे हो ह्या शब्दामध्ये..? 
हेच कोडं, आणि तीच तर खरी किमया आहे ह्या शब्दाची. 
हा शब्द, ठराविक एका गोष्टीसाठी कधी मर्यादित राहिलाच नाही. एका पठडीत बांधला गेला नाही. त्याची व्यापकता खूप मोठी आहे. ह्या शब्दाने, तशा बऱ्याच सीमा पादाक्रांत केल्या आहेत.

'सेक्स' किंवा 'सेक्सी' हा शब्द इतका प्रचलित झाला आहे. कि, एखाद्या सुंदर दिसणाऱ्या मुलीला किंवा मुलाला आपण पटकन म्हणून जातो....
" काय सेक्सी दिसतेय / दिसतोय ना..! " 
पुढे चालून तर, ह्या शब्दाने अगदी कहरच केला. बऱ्याच विचार मर्यादा ओलांडल्या. 
अगदी.. चमचमीत जेवणाला सुद्धा आपण खूप 'सेक्सी' जेवण होतं. असं म्हणू लागलो.
कपडे, बूट, चप्पल.. काय-काय म्हणून ह्या यादीमध्ये येणार नाही...!

सुरवातीच्या काळामध्ये.. खुलेआम सेक्स पाहायला मिळणं, हा फार दुर्मिळ विषय होता. नाही म्हणता, पडद्या आड स्वतःला हवे तेवढे प्रणय प्रसंग साकारता येत होते. परंतु.. चोरून किंवा दुसऱ्याचं प्रणय पाहायला मिळणं तसं दुरापास्तच होतं. 
आणि मनुष्याला.. 

" क्रिया करण्यापेक्षा क्रिया पाहण्यातच खूप आनंद मिळत असतो..! " 

हे तर, काहीप्रमाणात तुम्हा सर्वांना सुद्धा मान्य असावं.
जुन्याकाळी.. वेश्यागमन, तमाशा, लावणी अशा विषयातून थोड्याफार प्रमाणात ती 'हौस' भागवता येत होती. परंतु, ते फक्त स्वतःचा जीव खेळवण्या करिताच. आणि, ते सुद्धा खूप मर्यादित होतं. किंवा, त्याला सुद्धा बऱ्याच मर्यादा होत्या. 
नंतरच्या काळात आलेल्या, चल चित्रपटाने ती उणीव सुद्धा भरून काढली. राजकपूर सारख्या होतकरू चित्रपट दिग्दर्शकाने हा शिवधनुष्य लीलया पेलला. त्याची प्रचीती जवळ-जवळ सर्वांना आहेच. तसा तर, हा कधीही न संपणारा विषय आहे. परंतु, तूर्तास चर्चा चालू ठेवूयात..!  

क्रमशः 

No comments:

Post a Comment