#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- १७ )
=====================
सकाळी सात वाजता वडापावचा नाश्ता तयार झाला होता. नाश्ता भरपूर केला असल्याने आत्ताच काय ते खाऊन घ्या. पुन्हा जेवायला पुढे वेळ मिळेल कि नाही ते सांगता येणार नव्हतं. नाश्ता उरकला, आणि गाड्यावर सामान लादून आम्ही बालतालच्या दिशेने निघालो, कारगिल ते बालताल हे एकूण एकशे वीस किलोमीटरचं अंतर होतं. रस्ता सुद्धा म्हणावा असा वाईट नव्हता. पण आमच्या समोर एक नवीनच संकट उभं राहिलं होतं. दोन वर्षापूर्वी बुर्हाण वाणी नामक एका अतिरेक्याला भारतीय सैन्याने यमसदनी धाडलं होतं. त्याला आज दोन वर्षे पूर्ण होणार होती. त्यामुळे त्या भागात, त्याच्या आठवणी प्रीत्यर्थ सगळीकडे बंद आणि अतिरेकी कारवाया सुरु झाल्या होत्या. त्यामुळे अमरनाथ यात्रा सुद्धा बंद पडली होती.

आमची गाडी मुख्य रस्त्याला लागली.. तोच समोरून एक स्थानिक व्यक्ती अगदी आनंदाने वाकुल्या दाखवत आम्हाला खुणवत होता. " तुम्ही आता लटकले, पुढे रस्ता बंद करून टाकला आहे.. " समोर गेल्यावर पाहतो तर वाहनांची भली मोठी रांग लागली होती. पुढे जावं कि नाही अशा संभ्रमात आम्ही पडलो होतो. परंतु, अगदी दहा पंधरा मिनिटात तो जाम सुटला. आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. रोडवर म्हणावी अशी ट्राफिक नव्हती. अगदी काही वेळातच, आम्ही कारगिलमध्ये असणाऱ्या वॉर मेमोरियलला भेट दिली. ती गौरवगाथा पाहून आम्ही पुढे निघालो. आणि पान द्रास या गावामध्ये पुन्हा एकदा आमच्या गाड्या अडवण्यात आल्या.
तेथील स्थानिक लोकांना, पर्यटकांना त्रास झाल्यावर फारच आनंद होतो. असं मला दिसून येत होतं, आम्हाला अगदी दरडावून, त्यांनी आमच्या गाड्या एका गल्लीत घालायला लावल्या. आम्ही जिथे गाडी घातली होती. तिथे एक गेस्ट हाऊस होतं. कारगिल वॉर मेमोरियलच्या बाहेरील बाजूस मी एक फोर्चुणर पाहिली होती. ती पुण्यातील Vasanti Joshi नामक महिलेची होती. त्यांनी सायकलवरून कन्याकुमारी ते लेह हे ४,२७५ किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. आणि आता त्या सुद्धा, त्यांचा प्रवास संपवून परतीच्या मार्गाला निघाल्या होत्या. मी काही त्यांना स्पेशली ओळखत नव्हतो, पण या त्रासाला कंटाळून त्या तिथे रूम घेऊन मुक्काम करू इच्छित होत्या. माझं त्यांच्याशी थोडं बोलणं सुद्धा झालं, पण समोर प्रसंग असला भयंकर असल्याने. मला त्यांच्याशी ओळख करून घेण्याची सुद्धा इच्छा उरली नाही. कारण हे प्रकरण आता फार चिघळनार होतं. मी सहजच कारगिल वार मेमोरियल येथे त्यांच्या इनोव्हाचा एक फोटो तेवढा काढून घेतला होता. तो इथे टाकला आहे.

मनात नको त्या भीत्या डोकावत होत्या. आपल्यावर अतिरेकी हल्ला झाला तर काय करायचं.? कारण तिथले पोलीस सुद्धा त्या बंद कर्त्यांना काहीच बोलत नव्हते. सगळं त्यांच्या मनाप्रमाणे चालू होतं.
खरच सांगतो, या भागात कोणी पाय सुद्धा ठेवला नाही पाहिजे. उपाशी मारलं पाहिजे अशा लोकांना. यांची उपजीविका पर्यटन या विषयावरच आहे, आणि ही लोकं त्यांनाच त्रास देतात. तासाभरात काहीतरी धामधूम झाली, आणि पुन्हा एकदा रस्ता सुरु करण्यात आला. घाईघाईने आम्ही आमच्या दोन्ही गाड्या बाहेर काढल्या, आणि सुसाट वेगात पुढे निघालो. पुढे पुन्हा एक चेकपोस्टवर गाड्या अडवून ठेवल्या होत्या. त्यात काही लोकांनी वेड्यावाकड्या गाड्या घालून ट्राफिक जाम करून टाकलं होतं. आमचं लक्ष अगदी चारीकडे होतं, कोठून एखादा पत्थरबाज व्यक्ती आपल्या दिशेने दगड भिरकावेल त्याचा नेम नव्हता.

असला भयंकर प्रकार घडल्याने गाडीतील सगळे प्रवासी घाबरून गेले होते. शेवटी आम्ही द्रास गाव सुद्धा मागे टाकलं. आणि एका घाटात येऊन पोहोचलो. घाटामध्ये सुद्धा फार मोठा जाम लागला होता. हा घाट उतरल्यावर खालील बाजूस बालताल होतं. आणि तिथूनच आमच्या अमरनाथ यात्रेला सुरवात होणार होती. पण बालताल येथे जाणारा चांगला रस्ता पावसात वाहून गेल्याने पर्यायी नवीन रस्त्याने वाहतून वळवण्यात आली होती. त्यामुळे ट्राफिक जाम झालं होतं. शेवटी संध्याकाळी सात वाजता आम्ही एकदाचे बालताल कॅम्प येथे जाऊन पोहोचलो.
क्रमशः
No comments:
Post a Comment