#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- २० )
=====================
यात्रेला सुरवात झाली, माझा घोडा चांगला धष्टपुष्ट होता. माझ्या घोडे मालकाचं नाव ईश्पाक होतं. हा मुलगा थोडा मुडी स्वभावाचा वाटत होता. चित्रफित काढताना मी त्याला दोनदा आवाज दिला, पण त्याने मागे वळून काही पाहिलं नाही. बहुतेक तो आपल्याच धुंदीत चालत होता. माझ्या पाठीमागे माझ्या सौचा घोडा होता, तिचा घोडेवाला तोंडावरूनच फार हरामखोर वाटत होता, आणि अगदी तसच झालं. तो घोडेवाला खूप रागीट स्वभावाचा होता. आणि कारण नसताना आपला राग काढण्यासाठी तो घोड्याला विनाकारण मारत होता. त्यामुळे घोडा उधळत होता. आणि पर्यायाने माझी सौ खूप घाबरून जात होती. पण आता त्याला बाबा पुता करण्याशिवाय दुसरा काहीच मार्ग नव्हता.

बालताल ते अमरनाथ गुफा हे एकूण चौदा किलोमीटरचं अंतर होतं. घोड्यावर जाऊन सुद्धा आम्हाला पोहोचायला चारपाच तास नक्कीच लागणार होते. संपूर्णपणे मातीची आणि दगड धोंड्याची पायवाट आहे. यात्रेदरम्यान इथे एका फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. ते म्हणजे रस्त्यावरील धूळ. हो.. तिथे रस्त्यावर पांढरट माती आहे. शिवाय रस्त्यात पडणारी घोड्यांची लीद, हे सगळं पायवाटेत एकत्र तुडवत गेल्याने, आणि घोडे चालताना त्यांच्या खुराने या लीद मिश्रित मातीचा फारच धुरळा उडतो. तुम्ही कल्पना करू शकणार नाही, पण या मातीमुळे सर्व यात्रेकरूंची तोंडं पांढरी पडतात. त्यामुळे सावधानता म्हणून, प्रत्येकजण आपलं तोंड मास्कने झाकून घेत असतो. शिवाय तोंड झाकण्यासाठी कानटोपी सुद्धा असतेच.
पहेलगाम मार्गे असणारे लंगर.. आणि तिथे मिळणारी सुविधा या मार्गे नक्कीच मिळत नाही. याची मला प्रवासादरम्यान खात्री झाली. तंबू मागे पडत चालले होते, आणि आमचे घोडे एका खडतर चढाईसाठी तय्यार झाले. आजूबाजूला दिसणारा निसर्ग पाहत माझी यात्रा चालू होती. मला तसा काहीच त्रास नव्हता, जो काही त्रास होणार होता तो फक्त घोड्याला आणि त्याच्या मालकाला. पण याला सुद्धा त्रास म्हणता येणार नाही. हे त्यांचं कामच आहे. त्याभागात इतकी गरिबी आहे, कि.. काही लोकांकडे व्यवसाय करण्यासाठी घोडे सुद्धा नाहीयेत. मग ती लोकं, पायी चालणाऱ्या लोकांच्या बॅगा वाहून देण्याचं काम करत होते. तर कोणी लहान मुलांना खांद्यावर घेऊन जाण्याचं काम करत होते. तर काही जन.. काहीतरी रोजगार मिळेल म्हणून निव्वळ मोकळे आणि मोकार चालत होते. हे सगळं पाहून फार वाईट वाटत होतं.
यात्रेदरम्यान सुरक्षेसाठी म्हणून.. संपूर्ण रोडवर मिलिटरी आणि पोलीस लोकं तैनात होते. कोणतीही अशुभ घटना घडू नये, म्हणून ते सगळे अगदी डोळ्यात तेल घालून पाहरा देत होते. डोंगराच्या कडेकडेने आमचा प्रवास चालू होता. पलीकडील बाजूस मोठ्या डोंगरावर बर्फाच्या टेकड्या दिसत होत्या, तर खाली असणाऱ्या घळीमध्ये नदी वाहत होती. एकुणात सगळा निसर्ग अगदी पाहण्यासारखा होता. सकाळचे आठ वाजत आले होते, आकाशातून हेलिकॉप्टरच्या फेऱ्यांना सुरवात झाली होती. अगदी पाच पाच मिनिटाला एक हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालताना दिसत होतं. लक्ष्मीपुत्र आपली यात्रा लवकरात लवकर आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी या सेवेचा लाभ उचलत होते.
माझ्या घोडेवाल्याने, पोलिसांच्या डोळा चुकवत अजून एक घोडा सारथ्या शिवायच आणला होता. दोन्ही घोडे तो एकटाच हँडल करत होता. गेल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीची भरपाई करू पाहत होता. पण असं करणं फारच धोकादायक असतं, चुकून तो घोडा बेभान झाला तर, यात्रेकरूला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. एखादी मोठी दुखापत किंवा मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागतं. तर..चार लोकांच्या सहाय्याने डोलीवरील लोकं अगदी निर्धास्त होऊन डोलीवर झुलत निघाले होते. तर प्रवासादरम्यान एक पाय नसलेला भाविक दोन कुबड्याच्या सहाय्याने पायी यात्रा करत निघाला होता.

पाच सहा दिवसाचा खंड पडून आज नव्याने यात्रा सुरवात झाली असल्याने, भाविकांची फारच कमी गर्दी होती. त्यामुळे काही मिलिटरीचे जवान सुद्धा आजच्याला दर्शनाला निघाले होते. त्यांना जयहिंद सर.. असा आवाज देत आम्ही पुढे निघालो होतो. चौकशी केल्यावर समजलं कि, त्यातील काही जवानांची ड्युटी चेंज झाल्याने. पुढील ठिकाणी रुजू होण्यापूर्वी ते भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी निघाले होते. बोलता चालता बरच अंतर कापलं गेलं होतं. आणि माझ्या कानी एक शिवधून पडली, पहिला पडाव आला होता. यात्रेतील पहिला मुरादाबाद भंडारा आला होता. इथे थोडं चहापान, घोड्यांना आणि घोडेमालकांना विसावा मिळणार होता.
आम्ही सुद्धा सकाळपासून चहापाणी घेतलं नव्हतं. काही वेळातच आम्ही घोड्यावरून खाली उतरलो, चहापान करण्यासाठी लंगरमध्ये गेलो. चहापान झाल्यावर थोडी विश्रांती घेतली. तोवर आमचा घोडेवाला आम्हाला बोलवायला आला. चलो आगे निकलते है..!

चहापान उरकलं.. तितक्यात माझ्या सौला घेऊन जाणारा घोडेवाला आला. आणि म्हणाला, दीदी सिगारेट पीनी है, पचास रुपये दिजीये. बायकोने विचार केला, थोडी लालूच दिल्यावर तरी हा घोड्याला मारझोड करणार नाही. आणि आपली यात्रा सुखकर होईल, म्हणून तिने त्याला लगेच पन्नास रुपये देऊ केले. त्याने सुद्धा त्याच्या सिगारेट घेऊन मस्तपैकी हवेत धूर सोडायला सुरवात केली. आणि आमच्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली.
काही अंतर चालून गेल्यावर घळीमध्ये एक घोडा मरून पडलेला मला दिसला. त्यावेळी इथे आलेला भयंकर प्रलय मला आठवून गेला. चौकशी केली असता समजलं. कि याठिकाणी वरील बाजूने फार मोठ्या पाण्याचा लोट आणि त्याबरोबर मोठाली दगडं सुद्धा खाली वाहत आली. त्यामध्ये चेंगरून हा घोडा जागेवरच मेला. आणि एक डोली निघाली होती. ती सगळी डोली म्हणजे यात्रेकरू धरून एकुच पाच जन त्या दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावले होते. खरं तर त्या प्रलयात पाच पन्नास व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता. पण प्रसारमाध्यमात या विषयाचा जास्ती गवगवा केला गेला नव्हता. फक्त पाचच यात्रेकरून मृत्यू पडल्याची बातमी दिली गेली होती. नाहीतर भीतीपोटी यात्रेकरून पुन्हा माघारी फिरू शकण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे हि बातमी दाबून ठेवण्यात आली होती.

मी माझ्या घोडेवाल्याला विचारलं, आता या मेलेल्या घोड्याचं काय करणार.? याचं क्रियाकर्म वगैरे करणार कि नाही.? तर तो म्हणाला. नाही, याला आता वरती आणता येणार नाही. हा आता इथे असाच पडून राहणार, जंगली जनावरं आणि पक्षी याला दोनचार दिवसात आपल्या भक्ष्यस्थानी पाडतील. जर चुकून हा बालताल मध्ये गेला असता, तरच याचा अंत्यविधी झाला असता. ते सुद्धा गावात वास पसरून लोकांना त्रास होईल म्हणून. नाहीतर आम्ही लोकं याची जास्ती काळजी करत नसतो. हे ऐकून मला फार वाईट वाटलं, ज्या घोड्याच्या जीवावर आपली उपजीविका भागत आहे, त्याच्या विषयी मनामध्ये नसणारी अनास्था पाहून माझं काळीज अगदी चर्र झालं.
भाग तीन :- https://youtu.be/57LFBDu3kh4
क्रमशः
No comments:
Post a Comment