#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- १९ )
=====================
तंबूमध्ये चांगली व्यवस्था केली होती. एका तंबूमध्ये सहा खाटा लावल्या होत्या, तिथे ऐसपैस अशी झोपण्याची व्यवस्था होती. गाद्या आणि उबदार रजयाने परिपूर्ण असा तो तंबू होता. मागील दिवसांचे कडू गोड अनुभव आठवत काही वेळातच मी झोपी गेलो.
पहाटे दोन वाजता आमचा ड्रायव्हर आम्हाला उठवायला आमच्या तंबूत आला. झोप काही पूर्ण झाली नव्हती, पण उठावं लागणार होतं. उशीर झाला तर सगळा खोळंबा होऊन बसतो. रस्त्यात गर्दी वाढते, वातावरण खराब झालं.. तर त्याचा वेगळाच फटका बसतो. लवकर गेलं तर, संध्याकाळी दिवसा उजेडी लवकर परत सुद्धा येता येतं.
अंघोळीसाठी पन्नास रुपयाला एक अशी गरम पाण्याची बादली तिथे मिळत होती. यावेळी अंघोळीसाठी आणि शौचालयाची चांगली व्यवस्था केली गेली होती. भरपूर स्वच्छता आणि त्याच बरोबर काही कमोड सुद्धा ठेवण्यात आले होते.
एका तासात सगळी आवराआवर झाली, सॅग बॅग मध्ये.. पाण्याची बाटली, रेनकोट, मास्क आणि अंगात स्वेटर, हातमोजे, आणि डोक्याला कानटोपी असा पेहेराव करून आम्ही यात्रेला निघालो.
आमचा वाटाड्या आलाच होता. तो पुढे निघाला, आणि मिट्ट काळोखात अगदी पावलं मोजत आम्ही त्याच्या मागोमाग चालू लागलो. उशीर होईल म्हणून लंगर मध्ये आम्हाला चहा सुद्धा पिऊ दिला नाही. नाही म्हणता, वाटेत कुठेतरी चहा मिळणारच होता त्यामुळे त्याची विशेष काळजी नव्हती. काही वेळातच तो वाटाड्या आम्हाला घोड्याच्या थांब्यापाशी घेऊन गेला.

त्याठिकाणी शेकडो घोडे उभे होते, जसा काही घोडे बाजारच भरला असावा. त्यातील आमच्या घोडेवाल्यांना त्याने सगळे घोडे बाजूला घ्यायला सांगितलं. एक एक करून आम्ही सगळे घोड्यावर विराजमान झालो. या घोडे तळापासून सुमारे तीन चार किलोमीटर अंतरावर यात्रेसाठीची पहिली चेकपोस्ट होती. आम्ही सगळ्यांनी आपापली ओळखपत्र जवळ घेऊन ठेवली होती. पहाटेच्या अंधारात आमची जत्रा पुढे निघाली, सगळीकडे पूर्ण काळोख होता, आणि आम्ही सगळे तो घोडेवाला घेऊन निघाला आहे. तिकडे मुकाट्याने जात होतो. बराच वेळ झाला, पण मुख्य चेकपोस्ट काही येईना. आणि त्यात या घोडेवाल्याने अंतर कमी पडतंय म्हणून, आम्हाला अगदी आड वळणाने नेलं होतं. त्यामुळे काहीच कळायला मार्ग नव्हता. पण सगळे सोबत असल्याने काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं.
शेवटी एकदाची ती चेकपोस्ट आली. यात्रेसाठी आजच्या दिवशी अगदी मोजून तीन ते चार हजार लोकं असतील. कारण यात्रा पूर्णपणे बंद पडली होती. आणि जी लोकं कारगिल मार्गे आली आहेत. तेच इथवर पोहोचले होते. बाकी सगळे यात्रेकरू जम्मू मध्ये अडकून पडले होते.
आम्ही घोड्यावरून उतरलो आणि चेकपोस्ट असणाऱ्या लाईन मध्ये उभे राहिलो. पहाटेचे चार वाजले होते. सूर्योदयाच्या वेळेवर चेकपोस्ट वरून यात्रेकरूंना सोडलं जाणार होतं. साधारण सव्वापाच वाजता सूर्योदय होणार होता. सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. चारी बाजूने शंभोच्या नावाचा जयकारा सुरु होता. राहून राहून माझं लक्ष आभाळाकडे जात होतं. पण आज बाकी आकाश अगदी स्वच्छ होतं. आकाशात चांदण्या लुकलुक करत होत्या. पावसाचं नामोनिशाण नव्हतं. आमच्यासाठी हि फार मोठी उपलब्धी होती.

सकाळी साडेपाचच्या सुमारास.. यात्रेकरूंना सोडण्यात आलं. पुढील बाजूस थांबलेले आमचे घोडेवाले आमची वाट पाहत उभेच होते. काही लोकं पायी निघाले होते. तर काही लोकं डोलीवरून निघाले होते. तर आम्ही लोकं घोड्यावरून निघालो होतो. इथे सगळा पैशाचा विषय आहे. डोलीवाले एका व्यक्तीला घेऊन जाने आणि परत येण्यासाठी सात ते दहा हजार रुपये आकारत होते. घोडेवाले तोलमोल करून येत होते. काही हुशार लोकं तंबू पासून घोडे घेऊन आले नव्हते. ते या चेकपोस्ट पाशी असणाऱ्या घोडेवाल्यांशी भावताव करत होते. तर काही वृद्ध महिला, पुरुष आणि लहान मुलं पैशा अभावी चालत निघाले होते. वीस रुपयाला विकत घेतलेली लाकडी काठी हाच काय त्यांचा एकमेव आधार होता.
गेल्या आठवड्यात बिलकुल धंदा झाला नसल्याने, आणि आजचा यात्रेचा पहिलाच दिवस असल्याने प्रत्येकाला गिर्हाईक मिळवण्याची घाई लागली होती. मग जो जमेल तसा कमीजास्त भाव करून यात्रेकरूला घेऊन जात होता. त्यात काहीठिकाणी आपण ठरवलेलं गिर्हाईक दुसऱ्या घोडेवाल्याने पटकावल्यानंतर त्यांच्यात हाणामाऱ्या सुद्धा सुरु झाल्या होत्या. अगदी डोकी फुटेपर्यंत मारामाऱ्या झाल्या होत्या. काय करणार.. पैसा कमावण्याचा वर्षभरातील येवढा एकच सिझन असतो. तो सुद्धा खाली गेल्यावर वर्षभर खायचं काय.? हा फार मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो. त्यामुळे दिवस वाया घालवण्यापेक्षा काहीतरी पैसे मिळतील, काहीनाही तर किमान घोड्याच्या चाऱ्याचा विषय तरी सुटेल, या आशेने ते घोडेवाले अगदी कमी भावात जायला तयार होत होते. एका व्यक्तीने माझ्या समोर अगदी आठशे रुपयाला घोडा ठरवला होता. क्या करे पापी पेट का सवाल है..!!
( मी टिपलेल्या अमरनाथ यात्रेची चित्रफीत पाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा. )
भाग एक :- https://youtu.be/GYXHN6CDU90
भाग दोन :- https://youtu.be/ptbCKHePjXU
क्रमशः
No comments:
Post a Comment