#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- १३ )
=====================
नुब्रा व्हॅली नंतर आम्हाला पेंगोंग लेक येथे फिरायला जायचं होतं. नुब्रा व्हॅली वरून पेंगोंग लेकला जाण्यासाठी जवळचा रस्ता सुद्धा आहे. पण त्या रस्त्यात काहीतरी बिघाड झाल्याने, आम्हाला पुन्हा लेहला यावं लागलं. नाहीतर या ट्रीप मधील आमचा एक दिवस वाचला असता.
झालं.. पुन्हा एकदा सगळा लवाजमा घेऊन आम्ही लेहला निघालो, पुन्हा एकदा मी नुब्रा व्हॅलीला डोळेभरून पाहून घेतलं. खारदुंगला टॉप सुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

सायंकाळी सहाच्या सुमारास, आम्ही लेहला आमच्या हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो. महिला मंडळी फ्रेश होऊन पुन्हा एकदा स्वयपाकघरात जाऊन तयारीला लागल्या.
त्या हॉटेलच्या स्वयपाकघरात काम करत असणारी मुलं, आमच्या महिलांना प्रत्येक गोष्टीत मदत करत होते. भाजी चिरून दे, कांदा कापून दे, अशा छोट्या मोठ्या मदती ते करत होते.
माझ्याकडे थोडा वेळ होता, म्हणून मी लेहच्या मार्केट मध्ये फेरफटका मारून आलो. बाहेरगावी गेल्यावर, मी खरेदी करण्याच्या भानगडीत पडत नाही. जे आहे ते डोळेभरून पहायचं, आणि माघारी फिरायचं. असा आपला कार्यक्रम असतो.
एकूण पंचेचाळीस वर्ग किलोमीटर मध्ये लेहचा हा भूभाग पसरलेला आहे. आणि येथील लोकसंख्या सुद्धा अवघी, दीड लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे हे ठिकाण म्हणावं इतकं मोठं नाहीये. लेहच्या बाजारात फेरफटका मारायला, माझ्या सोबत माझे भाचा-भाची सुद्धा होते. लेह मधील स्ट्रीटवरील काही स्ट्रीट फूड त्यांना खाऊ घातलं. आणि आम्ही परत एकदा हॉटेलवर परतलो.

स्वयपाक तयार झाला होता, हॉटेलमध्ये असणारे इतर उत्तरभारतीय पर्यटक जेवायला बसले होते. माझ्या मेहुण्याने त्यांना आमचं महाराष्ट्रीयन जेवण ट्राय करणार का म्हणून विचारलं. त्या लोकांनी सुद्धा हे नवीन जेवण खायला आपली पसंती दर्शवली. त्या लोकांनी आजतागायत कधीही ज्वारीची भाकरी खाल्ली नव्हती. त्यामुळे तिथे असणाऱ्या पाच सहा लोकांनी भरपेट जेवण केलं. त्यामुळे हॉटेलमध्ये बनवलेलं जेवण तसच शिल्लक उरलं. शेवटी तिथे काम करत असणाऱ्या मुलांनी, आणि मॅनेजरने आम्हाला विनंती केली, कि.. तुमचं जेवण इतर पर्यटकांनी खाल्लं खरं. पण आमचं जेवण आता शिल्लक राहिलं आहे. आता ते तुम्हाला खावं लागेल. मग आम्ही सर्वांनी मिळून आम्ही बनवलेलं आणि हॉटेलमध्ये बनलेलं जेवण गोळ्यामेळ्याने खाऊन घेतलं. सगळी आवारा आवर केली, आणि सगळे जन आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले.
ऊद्या सकाळी आम्हाला पेंगोंग लेकला निघायचं होतं. लेह ते पेंगोंग लेक हे एकशे वीस किलोमीटरचं अंतर होतं. या प्रवासाला आम्हाला साधारण सहा तास लागणार होते. शिवाय त्या रस्त्यात असणाऱ्या च्यांगला पास या जगातील दोन नंबरवर असणाऱ्या सर्वात उंच ठिकाणच्या मोटर बाईकिंग रस्त्याला सुद्धा आम्हाला भेट द्यायची होती. त्यामुळे मी सुद्धा पटकन झोपी गेलो.

सकाळ झाली.. आजच्याला हॉटेलमध्ये अंघोळीसाठी लवकर गरम पाणी काही येईनाच. त्यामुळे सगळ्यांची एकच तारांबळ उडाली होती. शेवटी सकाळी सात वाजता गरम पाणी सुरु झालं. तोवर काही घाईच्या व्यक्तींनी, चक्क थंड पाण्याने आपल्या अंघोळी उरकून घेतल्या होत्या. आणि नाश्त्याची सोय करण्यासाठी ते कामाला जुंपले गेले होते. काही वेळात आमचं सुद्धा आवरून झालं. सगळ्यांचा नाश्ता उरकला, सगळं काही आवरून झालं. एका दिवसाच्या मुक्कामाच्या हिशोबाने आमची आमचे कपडे सोबत घेतले. आपापल्या रूम लॉक केल्या, आणि हॉटेलच्या बाहेर येऊन थांबलो. दोन्ही टेम्पो ट्रॅव्हलर आमची वाट पाहत बाहेर उभे होते. सगळे जन आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. आणि पुन्हा एकदा लेहच्या मार्गाने आमच्या बसेस धाऊ लागल्या..
सकाळच्या आल्हाददायक वातावरण आम्ही पेंगोंग लेक पाहायला निघालो. मस्त कोवळी उन्हं पडली होती. पावसाचा नामोनिशाण सुद्धा नव्हता. आम्ही निघालो त्याच्या दुसऱ्या दिवशी दलाई लामा यांचा जन्मदिवस होता, आणि त्यानिमित्ताने लेह मध्ये दलाई लामा येणार होते.त्यामुळे तिथे फार मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्याच्याला तिथे सुट्टी घोषित केली गेली होती. आता लेह सोडून आम्ही पुन्हा एकदा टांग लुंग ला च्या रस्त्याला लागलो होतो. काही अंतर गेल्यावर आमच्या गाड्या डावीकडील रस्त्याला वळल्या. हा रस्ता फारच कच्चा होता. थोडं अंतर पुढं गेल्यावर, सगळ्या गाड्या एकामागोमाग थांबलेल्या दिसल्या. बहुतेक समोरच्या बाजूने मिलिटरीच्या गाड्यांची कानवाय येत होती. त्याठिकाणी आमचा तासभर वाया गेला. लेह फाट्यापासून, च्यांगला पास येथे जाण्यासाठी आम्हाला साधारणपणे दोन तास लागणार होते..
लेह फाट्यावर आम्हाला लागलेला खडतर रस्ता काही संपता संपेना. भयंकर कच्चा रस्ता होता, साधारण दहा पंधरा किलोमीटरचा टप्पा अगदी असाच होता. आजूबाजूला दिसणाऱ्या छोट्या मोठ्या मॉनेस्ट्री पाहत आम्ही पुढे निघालो होतो. इथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दगडी भिंतीवरून नजर फिरवली असता. त्या दगडावर काहीतरी कोरीव काम केलेलं आढळून येत होतं. आणि हे कोरीव काम प्रत्येक दगडावर केलं गेलं होतं. त्यावर पाली भाषेत काही धार्मिक वाक्य लिहिली आहेत. असं आम्हाला आमच्या ड्रायव्हरने सांगितलं. मी यातील एखादा दगड घेऊ इच्छित होतो. पण तसं करणं गुन्हा ठरेल, असं सांगितल्यामुळे मी तो मोह आवरता घेतला. हळूहळू डोंगर सर होत होता. तसतसं चांगला पास जवळ येऊ लागलं होतं. डोंगराच्या खालील बाजूस मोहोरीची पिवळी पिकं डोलताना दिसत होती.
शेवटी अवघड घाटमाथा चढून गेल्यावर, च्यांगला पास आलं. च्यांगला पास येथे सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होता. याठिकाणी ऑक्सिजनचा म्हणावा इतका त्रास जाणवत नव्हता. कारण या भागातील वातावरणात आम्ही आता रुळले गेलो होतो. च्यांगला पास हे समुद्रसपाटीपासून सुमारे १७६८८ फुट उंचावर आहे. च्यांग म्हणजे तेथील स्थानिक भाषेत दक्षिण, हा त्या भागातील दक्षिण पास होता. याठिकाणी सुद्धा सगळीकडे बर्फच बर्फ होता. पण या बर्फाच्या ढिगाऱ्याचं आम्हाला आता म्हणावं इतकं कौतुक वाटत नव्हतं. तिथे च्यांगला बाबा देवस्थान होतं. तिथे आम्ही भक्तिभावाने नतमस्तक झालो. याठिकाणी एक आठवण म्हणून आम्ही सर्वांनी फोटो काढून घेतले. आणि पुन्हा एकदा आम्ही पेंगोंग लेकच्या दिशेने मार्गक्रमण केलं.
वाटेत एका ठिकाणी मी दरीभागात पाहिलं, तर तिथे मिलिटरीची एक अपघातग्रस्त जीप पडलेली दिसली. ते पाहून मी समजून गेलो, कि इथे दरीत गेलेली वस्तू परत काही वर येत नाही. रस्त्यावर बर्फ असताना, इथे टायरला लोखंडी चेन लाऊन ड्रायव्हिंग केली जाते. येवढं करून देखील बर्फावरून गाडी चालवत असताना, ब्रेक मारताना फार काळजी घ्यावी लागते. नाहीतर ब्रेक मारताना गाडी घसरली कि ती कोणत्याही परिस्थितीमध्ये कंट्रोल होत नाही. शेवटी दरीत जाउनच ती शेवटचा श्वास घेते. हे भयंकर दृश्य पाहून नाही म्हणता मी सुद्धा घाबरलो होतो. शेवटी तो भयानक टापू ओलांडून पुन्हा एकदा आम्ही सपाटीला लागलो. त्याठिकाणी मिलिटरीचा कॅम्प आणि एक डीझेल पंप दिसून आला. हा भारतातील आणि पर्यायाने त्या भागातील शेवटचा डीझेल पंप होता.

आजूबाजूचं निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवत मी पुढे निघालो होतो. आता पेंगोग लेक कधी येतोय असं झालं होतं. त्याचं निळशार पाणी माझ्या मनाला फार मोठी मोहिनी घालत होतं. वेडीवाकडी वळणं आणि वालुकामय रस्त्यावरून आमची बस मार्गक्रमन करत होती. आणि आमचा ड्रायव्हर म्हणाला.. ते पहा दूरवर पेंगोंग लेक दिसत आहे. आम्ही सगळे जन तो दाखवतोय त्या दिशेने पाहू लागलो. आणि दूरवर हवेत एक निळी ओढणी तरंगावी असं आम्हाला ते पहिलं दृश्य दिसून आलं. हो, तो पेंगोंग लेकच होता..
( च्यांगला पास येथील रमणीय दृश पाहण्यासाठी, खालील लिंक क्लिक करा. )
क्रमशः
No comments:
Post a Comment