#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- १८ )
=====================
बालताल मध्ये सगळीकडे तंबूच तंबू दिसत होते, आता यातला आमचा तंबू कसा ओळखायचा हा फार मोठा प्रश्न होता. पण आमचा तंबू मालक आमची वाट पाहत पार्किंग असणाऱ्या ठिकाणा मध्ये उभा असल्याने आम्हाला थोडं हायसं वाटलं. आज बालताल मध्ये गर्दी खूपच कमी होती. चौकशीअंती आम्हाला समजलं, कि.. गेल्या आठवड्यात अमरनाथ येथे फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे यात्रा बंद होती. शिवाय, बुर्हाण वाणी प्रकरणामुळे गेली तीन दिवस जम्मुवरून बालताल किंवा पेहेलगाम कडे यात्रेकरू लोकांना सोडलं गेलं नाहीये. सगळे यात्रेकरून जम्मू मध्ये अडकून पडले होते. आणि दर्शन झालेले यात्रेकरू बालताल आणि पेहेलगाम येथे अडकून पडले होते. सगळी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. याला एकमेव कारण म्हणजे, तो बुर्हाण वाणी होता. आजही त्या भागात अतिरेकी लोकांचा फार मोठ्या प्रमाणात उदोउदो चालू असतो. हे मला फार जवळून पाहायला मिळालं.

आम्ही तंबूकडे निघालो होतो.. वाटेमध्ये एकाच लाईनीत मला पाच लंगर ( भंडारा ) दिसले. तिथे भाविकांच्या पोटपूजेची उचित व्यवस्था करण्यात आली होती. आम्ही प्रथम आमच्या तंबूत जाऊन विसावलो. तंबूत सामान ठेवलं, चहापाणी केलं, पण जेवायला जाण्यासाठी कोणी उठेना झालं होतं. वडापाव खाल्ल्याने त्रास होईल, म्हणून मी काही वडापाव खाल्ला नव्हता. शेवटी आम्ही दोनचार जन मिळून लंगरमध्ये चहा पिऊन आलो.
तोवर आमच्या तंबूमध्ये घोडे मालक दाखल झाले होते. आमच्या सोबत असणाऱ्या ड्रायव्हरने कमिशन एजंट होऊन या घोडे वाल्यांना आम्हाला घोडा लावण्यासाठी आणलं होतं. आम्हाला सगळं कळत होतं, पण आमचा राकेश नामक ड्रायव्हर आम्हाला असं दाखवत होता. कि जसा काही आमची तो सेवा करत आहेत. आमच्या ड्रायव्हरला सव्वीस लोकांचं कमिशन मिळणार होतं. त्यामुळे आज तो आमची फारच अजिजी करत होता.

घोडेवाल्याने आम्हाला रेट सांगितला.. एका घोड्याचे जाऊन येऊन तीन हजार होतील म्हणाला. एकतर चार दिवस झाले यांना धंदा नव्हता. सगळे घोडे एका जागेवर बसून होते. घोडेमालक लंगरमध्ये जाऊन जेवण करून येत होते. म्हणून त्यांचं भागून जात होतं. आम्ही त्यांना स्पष्ट नकार दिला, इथे घोडे मालक स्वतः काहीच बोलत नसतात. इतकच नाही, तर घोडे मालक तिथे येत सुद्धा नसतात. सगळा खेळ एजंट लोकं करत असतात. तंबूवाला स्वतः कमिशन खाणार, त्यात आमचा ड्रायव्हर सुद्धा सामील. पण आम्ही काही त्यांची डाळ शिजू दिली नाही.
बाजारभाव सुरु झाला, विषय तीन हजारावरून अडीच हजारावर आला, अशी दोनदा बैठक मोडली. कि पुन्हा अर्ध्या तासाने सल्ला मसलत करून ते पुन्हा फिरून यायचे, पुन्हा भाव करायला सुरवात व्हायची. शेवटी नाय होय करता, एक घोडा दीड हजार रुपयाला ठरला. सौदा पक्का झाला. पहाटे तीन वाजता एजंट आम्हाला घोड्याच्या मुक्कामस्थळी घेऊन जाणार होता. या बोलाचालीत रात्रीचे दहा वाजून गेले होते. आता झोपायचं किती आणि पहाटे उठायचं कधी हा विषय होता.

अजून काही लोकं जेवण करायची बाकी होती. मी सुद्धा जेवलो नव्हतो, तसं मला काही जास्ती खायचं नव्हतं. लंगरमध्ये अगदी पंचपक्वान्नाचे जेवण होते. लाडू, जिलेबी, रोटी, राजमा भाजी, मेगी, मसाले भात, पराठे, मसाले दुध, चहा कॉफी सगळं काही होतं. ज्याला जे हवं आहे, त्याने पाहिजे तसं जेवण केलं. बराच उशीर झाला होता. आता झोपून सकाळी लवकर उठायचं होतं. त्यामुळे आम्ही लंगर मधून लवकरात लवकर तंबूत गेलो. सकाळच्या अंघोळीसाठी आणि प्रवासाकरिता घालण्याची कपडे बाजूला काढून ठेवली. रात्री दहा वाजल्यापासूनच अंघोळीसाठी पाणी गरम करण्याच्या भट्ट्या सुरु झाल्या होत्या. काही वयोवृद्ध लोकं या कामाला लागली होती. आता रात्रभर त्यांना फक्त भट्टीला जळण घालण्याचं काम होतं. अखंड कामच काम, सेवानिवृत्ती काही त्यांच्या नशिबी नव्हती.
( बालतालच्या अलीकडे घाटातून टिपलेली चित्रफित पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा. जुना रस्ता पावसाने वाहून गेला होता. त्यामुळे नवीन रस्ता सुरु करण्यात आला होता. )
क्रमशः
No comments:
Post a Comment