#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- १२ )
=====================
नुब्रा व्हॅली. हे समुद्रसपाटीपासून सुमारे दहा हजार फुट उंचीवर असून, या भूभागाला व्हॅली ऑफ फ्लॉवर असं सुद्धा संबोधलं जातं. डिसकीट पासून.. पुढे वीस किलोमीटर अंतरावर नुब्रा गावात आमचा आजचा मुक्काम होता. त्या गावात नव्याने सुरु झालेलं खूप सुंदर असं हॉटेल आज आमच्या दिमतीला हजर होतं. आज रात्रीचं जेवण आणि उद्या सकाळचा नाश्ता, हॉटेलमध्येच असल्याने. आमच्या महिला मंडळीचा त्रास थोडा वाचणार होता. नाही म्हणता, आजच्या प्रवासाने सगळ्या महिला खूपच थकल्या होत्या..
इस्पितळात एडमीट असलेल्या मॅडम पाशी त्यांची मुलगी आणि आमचे एक सिनियर मित्र थांबले होते. बाकी सगळे जन पुढे निघून आले होते.
त्या दवाखान्यात.. योगायोगाने पुण्यातील एक मुलगा सुद्धा एडमीट झाला होता. आयटी सेक्टरमध्ये काम करणारा पंचवीस वर्षांचा हा मुलगा होता. त्याच्या सोबत कामाला असणाऱ्या काही उत्तरभारतीय मुलांसोबत तो बाईकवर या भागात फिरायला आला होता. पण त्याला असलेल्या अस्थम्याचा त्रास त्याने मित्रांपासून लपवून ठेवल्यामुळे वरील प्रकार घडला होता. त्याला श्वास घ्यायला खूपच त्रास होत होता. त्या एका मुलाच्या नालायकपणामुळे, बाकी सर्व मुलांच्या ट्रिपचा फज्जा उडाला होता. त्यामुळे या भागात येताना, कोणीही आपला कोणताही रोग न लपवता इकडे यावं. म्हणजे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही.

आमच्या ग्रुपमधील त्या तिघांची तिथे व्यवस्थित सोय लावली आणि आम्ही पुढे निघून आलो. पुण्यातील त्या मुलामुळे, तिथे थांबलेली उत्तरभारतीय मुलं आमच्या लोकांची सगळी उठाठेव करणार होते. थोडं गोड बोलण्याचं भांडवल, त्यामुळे..ऋणानुबंध असे कुठेही कामाला येतात. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो, त्या हॉटेलमधील सगळी देखभाल एक महिला करत होती. बाकी सगळी पुरुष मंडळी तिच्या हाताखाली राबत होते.
रात्रीच्या जेवणात.. पुरी, चपाती, बटाट्याची भाजी, एक रस्सा भाजी, वरण, भात असं अगदी साधं जेवण होतं. पण त्यांना इतक्या लोकांचा अंदाज न आल्याने, आम्ही सात आठ जन असे एक एक करून जेवायला बसलो.
आयते दोन घास पोटात गेल्यावर सगळ्यांच्या डोळ्यावर लगेच धुंदी आली होती. नव्या खटाखट रूम होत्या, सगळा बिछाना सुद्धा कोरा करकरीत होता. थंडी सुद्धा जाम पडली होती, मग काय.. त्या उबदार बिछान्यात घुसून, सगळे जन पटापट झोपी गेले.

सकाळ झाली.. फ्रेश होऊन मी त्या हॉटेलच्या आजूबाजूला फेरफटका मारला. तर त्या मालकीनीने हॉटेलच्या बाजूला मोकळ्या जागेत फ्लॉवर ( फुल गोबी ) लावले होते. आणि ते पिक खूप जोमात आलं होतं. कारण त्या भागात मंडई वगैरे असला काही प्रकार नाही. असंच काहीतरी स्वतः पिकवायचं आणि स्वतःच खपवायचं, असा काहीसा त्यांचा कार्यक्रम होता.
सकाळच्या नाश्त्याला त्यांनी ओमलेट, ब्रेड आणि पराठे केले होते. त्या भागातील जेवण मला थोडी वेगळीच चव द्यायचं. त्यामुळे मी पोटभर असं काही खातच नव्हतो. सकाळच्या आवरा आवरी नंतर, पुन्हा सगळं सामान आम्ही गाडीत ठेवलं आणि आम्ही त्या छोट्याशा गावाला आणि तेथील लोकांना रामराम केला.

वाटेमध्ये आम्ही नुब्रा मधील वाळवंटात येऊन पोहोचलो, तिथे चहुबाजूला वाळूच वाळू पसरली होती. राजस्थानातल्या जसलमेरला आल्यासारखं वाटत होतं. दूरवर पसरलेल्या त्या विस्तीर्ण वाळवंटात आम्हाला, उंटाचा एक मोठा तांडा बसलेला दिसला.
बापरे.. हे सगळं मला फारच अजबच वाटत होतं. एकीकडे बर्फ दिसत होता. तर दुसरीकडे वाळवंट, एखाद्या व्यक्तीला डोळेझाकून इथे आणून सोडला. तर, आपण नेमकं कुठे आहोत.? याची कल्पना करूनच तो ठार वेडा होऊन जाईल. माझी सुद्धा अगदी अशातली गत झाली होती.
आम्ही सगळे कॅमल सफारी करण्यासाठी त्या उंटाच्या काफिल्यात गेलो. तिथे शंभराहून अधिक उंट होते. एका सफारीसाठी प्रत्येकी दोनशे रुपये असा रेट होता. इथले उंट सुद्धा अगदी वेगळेच होते. त्यांच्या पाठीवर असणारं खुर डबल होतं. आणि त्या दोन्ही खुराच्या बेचक्यात बसून प्रवास करावा लागायचा. सर्व महिलांना आम्ही चांगले मोठेमोठे उंट बघून त्यावर बसवायचं ठरवलं. इथे बाकी एक नवीनच गडबड होती, त्या उंटावर बसताना त्याच्या मागील वशिंडाला पायाचा स्पर्श झाला, कि तो उंट लगेच उठून बसायचा. अशी त्याला शिकवणच होती. त्यामुळे आमच्या काही महिलांची फार पंचायत झाली. उंटावर बसताना त्याला मागील बाजूस पाय लागला कि तो उंट उठायचा आणि आमच्या महिला अगदी पडायला व्हायच्या. पण नशीब, काही अप्रिय घटना घडली नाही. मी सुद्धा एका उंटावर बसलो, आणि आमची सफारी सुरु झाली. सफारी सुरु असताना, अचानक सैन्यदलाचं एक हेलिकॉप्टर अगदी खालून उडत गेलं. आणि त्याच्या आवाजाला घाबरून सगळे उंट उधळले. दुसरे उंट लगेच शांत झाले, पण माझा उंट काही शांत होईना. तो मला पक्का पाडायच्या बेतात होता.
मी त्या व्यक्तीला फार विनवण्या केल्या. बाबा मला खाली उतरव, त्या उंटाला खाली बसव. मला काही हि सफारी करायची नाहीये. पण तुझे पैसे मी तुला देतो. पण तो मुलगा काही ऐकेना, त्याला वाटत होतं, हा मनुष्य उंटाच्या खाली उतरला. तर आपले पैसे बुडतील.
त्यामुळे तो.. उंटाला तसाच पुढे घेऊन निघाला. आणि तो उंट काही उधळायचं कमी करेना. शेवटी मनाचा हिय्या केला. आणि मी उंटावरून खाली उडी मारली. खाली वाळू असल्यामुळे मी हि डेरिंग केली खरी. पण कसलं काय, खालची वाळू सुद्धा घट्ट असल्याने, खाली जंप करताच, माझ्या पायातून मला कटकण असा आवाज आला.

काम तमाम झालं.. मसल क्रॅक होऊन, माझा पाय मुरगळला होता. शेवटी रागारागाने त्या पोराला मी दोनचार मराठी शिव्या हासडल्या आणि तिथून मागे फिरलो. काही वेळात बाकी लोकांची सफारी संपली. आणि पुन्हा एकदा आम्ही डिसकीट गावात येऊन पोहोचलो. दवाखान्यात जाऊन मॅडमच्या तब्बेतीची विचारपूस केली. डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला होता. मग त्यांना घेऊन आम्ही डिसकीट मॉनेस्ट्री येथे गेलो. तिथे भगवान गौतम बुद्ध यांची भलीमोठी मूर्ती चीन आणि पाकिस्तानच्या दिशेने तोंड करून उभारली आहे. खूपच सुंदर मूर्ती होती. मूर्तीला अगदी पाहतच बसावं, इतकी भव्य आणि सुंदर अशी ती मूर्ती होती. तिथे असणारे बौद्ध लामा आम्हाला सांगत होते. हि मूर्ती तिकडे तोंड करून लावण्याचं कारण हेच आहे. हि मूर्ती त्यांना शांततेचा संदेश देत आहे. सगळीकडे शांतता नांदावी.
हि मूर्ती इथे बनवण्यामागचा हा एकमेव उद्देश आहे. पण पलीकडील लोकं काही शहाणी नाहीत, त्यांना खुद्द देवाने येऊन जरी सांगितलं, तरी सुद्धा ते आपल्या कुरघुड्या थांबवणार नाहीत. तर मग, गौतम बुद्धाच्या निर्जीव पुतळ्याचं ते काय ऐकतील.!

डिसकीट मॉनेस्ट्री येथील नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
क्रमशः
No comments:
Post a Comment