#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ९ )
=====================
खरं तर.. ड्रायव्हर आणि इतर मंडळींच्या या आजारपणामुळे, आणि.. बसच्या त्रासामुळे आमच्या नियोजित ठिकाणी ठरल्याप्रमाणे आम्ही वेळेवर पोहोचणार नव्हतो. ज्या पत्र्याच्या छोट्या हॉटेलमध्ये आम्ही चहापणासाठी उतरलो होतो. तिथे राहण्याची सुद्धा सोय होती. दहा बारा उबदार बेड होते. पण तिथे मुक्काम केल्याने आमचं पुढील नियोजन ढासळनार होतं. रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही ड्रायव्हरला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. तो उठल्यावर त्याला गरम चहा दिला, उलट्या होतील म्हणून त्याने मॅगी खाल्ली नाही. नाही म्हणता आता त्याला थोडी हुशारी आली होती. आणि तशा अवस्थेत तो पुढील प्रवासाला तयार झाला.
इथून पुढे पंधरा वीस किलोमीटरचा सपाट रस्ता होता, आणि त्यानंतर घाटमाथा आणि हिमशिखर लागणार होता. सुरवातीला बारलाचा पास आणि नंतर टांगलंग ला ( " ला " म्हणजे पास ) हा जगातील दुसऱ्या नंबरच्या उंचीचा रस्ता पार करून आम्हाला लेहच्या बाजूला उताराने खाली जायचं होतं..

आमचा ड्रायव्हर फ्रेश होत होता, तोवर पश्मीना बकऱ्यांचा विषय निघाला. त्यावर तो हॉटेल मालक म्हणाला, आता हे मेंढपाळ सुद्धा फार कमी होऊ लागले आहेत. हि कामं आता कोणी करत नाही, जमात नष्ट होऊ नये म्हणून, सरकार यांना विशेष सेवा आणि अर्थसहाय्य करत असते. यांच्या बकऱ्यांना किंवा त्या मेंढपाळ लोकांना काही त्रास होऊ नये म्हणून, त्यांच्यासोबत माणसाचा आणि जनावराचा डॉक्टर सोबत असतो. हि सोय खास सरकारद्वारे केली गेली आहे. फारच त्रासदायक काम झाल्यास, तातडीची सेवा म्हणून, यांना हेलिकॉप्टरची सोय सुद्धा करून दिली जाते. हे मेंढपाळ लोकं, रोज सकाळी त्यांच्या बकर्यांना फणीने विंचरतात. विंचरताना त्यांच्या कंगव्यात गुंता होऊन जी लोकर येते. ती खरी पश्मीना असते, हि पश्मीना लोकर सरकार तीन हजार रुपये किलोने त्यांच्याकडून विकत घेते.
प्रवास सुरु झाला.. ड्रायव्हरने सर्वांग झाकून घेतलं होतं. त्याला थंडी वाजून येत होती. पण जीवावर उदार होऊन आम्ही पुढील प्रवास करायला निघालो होतो. काही वेळातच सपाटीचा रस्ता संपला, सगळीकडे काळोख पसरला होता. रस्त्याच्या कडेला पांढरेशुभ्र बर्फाचे ढीग दिसू लागले होते. अंधारात समजून येत नव्हतं, पण आम्ही समुद्रसपाटीपासून ५,००० मीटर उंचीवर होतो, भयंकर अंधार पडला होता. पण तिथे माझ्या नजरेसमोरून एक फलक गेला, त्यावर बारलाचा पास असं लिहिलं होतं. त्यांतर काही पुढे गेल्यावर, आम्ही आता ५,३५० मीटर उंचीवर होतो. हे ठिकाण होतं, टांग लंग ला पास.. रात्रीची वेळ असल्याने, इच्छा असून सुद्धा आम्हाला येथे थांबता येणार नव्हतं. त्याठिकाणी BRO ने एक स्मृतीस्तंभ बनवला होता, त्यावर रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. हे ओघवतं दर्शन घेत, आमची गाडी पुढे निघाली होती.
आता मात्र..खालच्या बाजूस भयंकर मोठी दरी दिसत होती. रस्त्यावर चिटपाखरु सुद्धा नव्हतं, कि प्रवास करणारी दुसरी कोणती गाडीही नव्हती. हि संकटं का कमी म्हणून, त्यात नेमकी पावसाला सुरवात झाली, समोरचं काहीच दिसत नव्हतं. मी तर पुरता घाबरून गेलो होतो. मनामध्ये देवाचा धावा करत होतो. पावसाची रिपरिप थांबावी म्हणून आराधना करत होतो. आणि एके ठिकाणी, आमची गाडी दरीच्या अगदी कडेला आली. गाडी चालवत नसताना सुद्धा, त्यावेळी माझे पाय ब्रेकच्या भागात करकचून दाबले गेले. जशी काय माझ्या हातातच ती गाडी असावी, गाडी चालवणाऱ्या व्यक्तींना असं होतं बरं का. गुरबचनला त्याची चूक ध्यानात आल्याने. तो माझ्याकडे पहात सुद्धा नव्हता. त्यानंतर त्याने अगदी सावकाशपणे गाडी चालवायला सुरवात केली. आणि एकाएकी काय चमत्कार झाला, पाऊस आला तसा लगेच निघून गेला. काही वेळात आम्ही टांगलंग ला पासचा एरिया ओलांडून पुढे पोहोचलो होतो.
आता आमच्या ड्रायव्हरच्या अंगात थोडी हुशारी आली होती. तो अगदी फ्रेश झाला होता, मला म्हणाला मगाशी झोपते मस्त घाम फुटला होता. त्यामुळे आता मला ठीकठाक वाटत आहे. जाऊदेत त्याला बरं वाटत होतं, यापेक्षा आनंदाची दुसरी कोणतीच बातमी नव्हती. एका अवघड वळणावरून आमची बस निघाली होती. आणि माझ्या भाचीने बसच्या बाहेर असणारी खोल दरी पाहिली. आणि ती मला म्हणाली.. काका, दरी खूप खोल आहे का हो.? मी तिला मानेनेच काही काळजी करू नको असं खुणावलं. आणि झोपी जाण्याचा इशारा केला. नाही म्हणता थंडीमुळे बस मधील सगळी जनता ढाराढूर झाली होती. फक्त मी आणि ड्रायव्हरच काय ते जागे होतो. आणि आमच्या समोर चालणारी आमची दुसरी बस, हाच आमचा एकमेव साथी होता. रात्रीचे बारा वाजले होते. घाट दरी जवळपास संपत आली होती. आता रस्त्याच्या कडेला, पांढऱ्या रंगातल्या छोट्या छोट्या मोनेस्टरी दिसू लागल्या होत्या. गाव नजीक आलं होतं. तरीही अजून लेह पन्नास किमी अंतरावर होतं.
आता रस्ता जरा बरा होता, त्यामुळे चिंता अशी उरली नव्हती. अवघड टप्पा संपला होता. खरच सांगतो, या घाट माथ्याच्या रस्त्यावर फिरायला जाणं म्हणजे एक प्रकारची शिक्षाच आहे. बघता बघता अंतर मागे पडू लागलं. लेह आता फक्त वीस किलोमीटर अंतरावर उरलं होतं. आणि पुन्हा एकदा आमच्या समोरच्या बसचा टायर फुटला. आता सुद्धा आम्ही सपाटीच्या रोडला होतो म्हणून धोका टळला होता. काही वेळात टायर बदली झाला, यावेळी आमच्या बसचा टायर आम्ही त्या बसला दिला. विचार करा, आमच्या दोन बस नसत्या.. तर इतक्या रात्री त्या प्रवासात आम्ही काय आणि कसं केलं असतं.?
पहाटे तीन वाजता, आम्ही आमच्या लॉजवर पोहोचलो. लॉजची मालकीणबाई आमची वाट पाहून झोपी गेली होती. फोन करून आम्ही तिला उठवलं. सगळं सामान गाडीवर होतं तसच ठेवलं. आणि सगळे जन आपापल्या रूममध्ये गपगार झाले.
पहाटे तीन वाजता, आम्ही आमच्या लॉजवर पोहोचलो. लॉजची मालकीणबाई आमची वाट पाहून झोपी गेली होती. फोन करून आम्ही तिला उठवलं. सगळं सामान गाडीवर होतं तसच ठेवलं. आणि सगळे जन आपापल्या रूममध्ये गपगार झाले.
क्रमशः
जिस्पा व्हॅली,पांग ते लेह रस्ता कसा आहे, ते पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करून क्लिप नक्की पहा..
No comments:
Post a Comment