#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- १६ )
=====================
=====================
लेह पेलेस आणि बाजारात थोडी भटकंती केली. तिथे मिळणारा, स्पेशल खारट काश्मिरी चहा पिला. लेहमध्ये हा चहा अगदी शोधून प्यावा लागतो बरं का, माझ्या घराशेजारी पूर्वी एक तिबेटी महिला राहायला होती. ती मला हा चहा आणि त्यासोबत छेपरी ( ड्राय चीज ) खाऊ घालायची. तो विषय मला अचानक आठवला, आणि चौकशीअंती मला वरील दोन्ही वस्तू मला मिळाल्या. छेपरीची चव मला विशेष भावली नाही. पण खारट चहा बाकी खूपच अप्रतिम होता. या चहा मध्ये बटर मिक्स केलं जातं.
लेहच्या बाजारात मी बरीच भटकंती केली. तिथे असणारी मटणाची दुकानं पाहिली, इथे असणाऱ्या बकऱ्यांना मटणात चरबी खूप असते. ते बहुतेक तिथे असणाऱ्या थंड वातावरणामुळे असावं. बाजार भटकंती केली, तिथे असणाऱ्या एका मोनेस्त्री मध्ये जाऊन दर्शन करून आलो. आठ वाजत आले होते. मग मी हॉटेलमध्ये गेलो.

जेवणं तयार झाली होती.. रूममध्ये जाऊन थोडं फ्रेश होऊन आलो. मेसमध्ये थोडी गर्दी होती, पाहतो तर तिथे पन्नास ते सत्तर वयातील काही महिलांचा गट खारदुंगला फिरायला मुंबईहून आला होता. त्यांना पाहून माझ्या मनात अगदी धडकी भरली. कारण त्यातील काही महिला इतक्या बोजड होत्या, कि त्यांचं त्यांना चालवत नव्हतं. तर मग खारदुंगला येथे गेल्यावर त्यांना तेथील वातावरण सूट होईल कि नाही या विचारात मी आकंठ बुडालो होतो. सहज वार्तालाप करावा म्हणून, मी त्यांच्याशी गप्पागोष्टी करायला गेलो. तिथे असणारी सगळी परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. काय कराल, कसे जाल, काय घेऊन जाल, याची सगळी माहिती पुरवली. खारदुंगला येथे श्वसनाचा फार त्रास होतो. हे सुद्धा सांगितलं. त्या सगळ्या महिला, कमावत्या आणि पेन्शनर होत्या. त्यामुळे त्या थोड्या पुढचं बोलत होत्या. श्वसनाचा त्रास होतो असं सांगितलं. तर त्यातील एक बाई म्हणाली, आम्ही खारदुंगला येथे गेल्यावर डान्स करणार आहोत. मी मनोभावे त्यांची इच्छा पूर्ण व्हावी असं परमेश्वराला साकडं घातलं. पण एक चूक केली, मी त्यांचा नंबर घ्यायला विसरलो, तिथे गेल्यावर त्यांनी कोणत्या नृत्यावर डान्स केला ते मला ऐकायचं होतं. कि.. ती भयंकर थंडी पाहून आगे जान्देव म्हणाल्या असतील.
आजच्या जेवणात.. मसालेभात, भाकरी, भरल्या वांग्याची भाजी, तळलेले पापड, असा बेत होता. आजचा बेत पाहून, मुंबई मधील महिला सुद्धा आमच्या सोबतच जेवत्या झाल्या. त्या हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक यात्री आमच्या जेवणाचा आस्वाद घेत होता. तिथे असणारी मुलं तर आमच्या मध्ये इतके मिसळून गेले होते. कि आम्ही त्याठिकाणी अगदी घरी असल्या सारखं मोकळं वावरत होतो. आजच्या जेवणात हॉटेलमध्ये मिळणार जेवण कोणतं आणि आम्ही बनवलेलं जेवण कोणतं काहीच कळत नव्हतं. ज्याच्या हाताला जे लागेल ते तो खात होता. त्या वातावरणात आम्ही त्या लेहला पक्कं महाराष्ट्र करून सोडलं होतं. असं म्हणलं, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
जेवणं उरकली सगळं काही आवरून घेतलं. भांडी वगैरे एका बाजूला पोत्यात बांधून आवरून ठेवली. किराणा सामान सुद्धा व्यवस्थितपणे ठेऊन दिलं. हे सगळं सामान आजच गाडीच्या डिकीमध्ये ठेऊन दिलं. उद्या सकाळी जास्ती तारांबळ होऊ नये, म्हणून हे सगळं आत्ताच उरकून आम्ही सगळे जन आपापल्यापरीने मदत करत होतो. सगळं काही आलबेल झालं आहे असं पाहून आम्ही रूममध्ये जाऊन निश्चिंत मनाने पहुडलो.

सकाळी लवकर उठून सगळी आवराआवर केली, सगळं सामान गाड्यावर लादलं. महिलांनी नाश्ता तयार केला होता. आज नाश्त्याला तिखट शेवया केल्या होत्या. मुंबईच्या महिलांना सुद्धा आजचा नाश्ता फारच आवडला, त्यातील एका महिलेने तर या तिखट शेवया एका डब्यात घालून घेतल्या. म्हणाली.. पुढे काही चांगलं मिळेल कि नाही माहित नाही. त्यावेळी या शेवयाच खाईन म्हणते.
चहा नाश्ता उरकला.. आमच्या महिला आणि आम्हा सर्वांचे त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या वेटर, मेनेजर ते अगदी स्वयपाक्या पर्यंत सर्वांशी स्नेह जुळले होते. त्यामुळे तिथून बाहेर पडताना, सर्वांचे डोळे भरून आले होते. त्या सर्व मुलांनी साश्रू नयनांनी आम्हाला अलविदा केला. आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो.
आजच्या प्रवासात आम्हाला लेह ते कारगिल हा दोनशे पन्नास किलोमीटर अंतराचा टप्पा पार करायचा होता. हा प्रवास जवळपास आठ तासांचा होता.
सुरवातीला आम्ही लेह येथील मिलिटरी संग्रहालय ( हॉल ऑफ फेम ) पाहून पुढे जाणार होतो. अगदी काही वेळात ते संग्रहालय आलं, लेहच्या विमानतळा पासून अगदी जवळच हे फोटो आणि शस्त्र संग्रहालय आहे. संग्रहालय अतिशय मस्त होतं. इथे सर्वांनी फोटोग्राफी केली आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो. वाटेमध्ये असणाऱ्या पत्थर साहिब नामक गुरुद्वाराला भेट दिली. तिथे मनोभावे मस्तक टेकलं, आणि भाजी चिरून देण्याची सेवा सुद्धा केली. तिथे आम्हाला जेवण करण्याचा फार आग्रह झाला. पण वेळेचं गणित पाहता. जेवण दुपारी बारा वाजता सुरु होणार होतं. आणि आताशी अकरा वाजले होते, त्यामुळे आम्ही सेवा करून तेथून पुढील प्रवासाला निघालो.
तिथून पुढे गेल्यावर.. मेग्नेटिक हिल नामक एका ठिकाणी आमच्या गाड्या थांबल्या. तिथे समोर असणाऱ्या पर्वत रांगेत लोह चुंबकीय शक्ती असल्याने,अगदी चढावर असणाऱ्या गाड्या सुद्धा बंद अवस्थेत सामोरी बाजूस ओढल्या जात होत्या. हे सगळं अगदी आहे तसच घडत होतं. पण त्यामागे नेमकं काय शास्त्र आहे, ते मी सुद्धा सांगू शकत नाही. तिथून पुढे दहा एक किलोमीटर अंतरावर लेह लदाख मध्ये वाहणाऱ्या इंडस आणि झंस्कार नद्यांच्या संगमाच मनमोहक दृश्य पाहिलं. या नद्यांना लडाखी भाषेत.. अल्ची आणि लम्यारू अशी नावं आहेत. हा संगम पाहून आम्ही पुढील प्रवासाला निघालो.

आता इथूनपुढे कारगिल पर्यंत आम्हाला नॉनस्टोप प्रवास करावयाचा होता. या भागात अजूनही रस्त्याची बरीच महत्वाकांक्षी कामं चालू आहेत. इथे काम करणारी जवळपास सगळेच कामगार हे बिहारी आहेत. हे इथे मला आवर्जून सांगावं सं वाटतंय. एकेठिकाणी आमची गाडी लघुशंकेसाठी थांबली होती. तर तिथे रस्त्यावर एक बिहारी मुलगा उभा होता. मी त्याला इथे थांबण्याचं कारण विचारलं. तर म्हणाला.. डोंगरच्या वरील बाजूस काम चालू आहे. चुकून वरून एखादा मोठा दगड खाली आला तर त्यावर लक्ष ठेऊन वाहतुकीला वेळीच थांबवून कोणताही अपघात घडू नये म्हणून इथे माझी ड्युटी लागली आहे. फारच छोट्या मोठ्या गोष्टी इथे अगदी खुबीने पाळल्या जात होत्या. हे पाहून मला फार बरं वाटलं. बारा तासाच्या कामाला रोज म्हणून फक्त पाचशे रुपये हजेरी त्या मुलाला मिळत होती.
त्यानंतर कारगिलच्या रस्त्यार असणाऱ्या कारगिल वार मेमोरियलला आम्ही भेट दिली. इथे कारगिल विजयाच्या बऱ्याच गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. सायंकाळी सहाच्या दरम्यान आम्ही कारगिलमध्ये पोहोचलो. खोटं सांगत नाही, तिथे पोहोचल्यावर अगदी पाकिस्थानात आल्यासारखं वाटत होतं. सगळीकडे कर्फ्यू लागल्या सारखं वातावरण होतं. आम्हाला काही हा भाग फिरायचा नव्हता. फक्त आजची रात्र इथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्हाला बालताल येथे मुक्काम करून अमरनाथ यात्रेसाठी जायचं होतं.
मुक्कामस्थळी उतरल्यावर, सकाळच्या नाश्त्यासाठी काही खरेदी करण्यासाठी मी कारगिलच्या बाजारात निघालो. सोबत माझी बायको, माझ्या भाच्या आणि एक भाचा होता. कारगिलच्या बाजारात फिरताना, तेथील लोकं आमच्याकडे संशयास्पद रित्या पाहत आहेत. असं विनाकारण वाटून जात होतं. त्या बाजारात सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेड आणि बटाटे खरेदी केले. उद्या सकाळी वडापाव बनवणार होतो. हा सगळा बहुल मुस्लीम भाग असून सुद्धा, मला या भागात एकही महिला बुरखा घातलेली आढळून आली नाही हे विशेष. शिवाय रात्री आठच्या सुमारास दोन मुली अगदी बिनधास्तपणे मारुती व्हान मधून आपल्या घरी निघालेल्या मला दिसल्या.
नंतर.. फक्त मुलींनी गच्च भरलेली एक मिनीबस आमच्या समोरून गेली. त्यात असणाऱ्या सगळ्या मुली जोरात गाणी लाऊन नाचत निघाल्या होत्या. हे सगळं दृश्य पाहून, तिथे असणाऱ्या मुलींना खूपच स्वातंत्र्य आहे, हे समजायला मला उशीर लागला नाही.

जिथे आम्ही ब्रेड घेतले, तो दुकानदार आम्हाला म्हणाला. इथून जवळच अगदी सहा किलोमीटर अंतरावर भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. तिथे तुम्हाला पाकिस्तान अगदी नजरेच्या टप्प्यात दिसून येईल. खूप मस्त ठिकाण आहे, कारगिलमध्ये युद्धातील काही वस्तू सुद्धा तिथे ठेवल्या आहेत. तुम्ही ते ठिकाण नक्की बघून या. मी त्याला माझा होकार कळवला, रूमवर आल्यावर सर्वांना हि माहिती सांगितली. पण तिकडे यायला कोणीच तयार होईना. सगळ्यांच्या मनामध्ये एक अनामिक भीती दडून बसली होती. कारण वातावरण फारच गंभीर झालं होतं.
( चोखांग विहार.. लेह, याची चित्रफित पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.. )
झंस्कार आणि इंडस नदीचा संगम पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा..
मेगनेटिक हिल लडाख, पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा..
क्रमशः
No comments:
Post a Comment