#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- १० )
=====================
कालच्या प्रवासात जवळपास प्रत्येकाची उपासमार झाली होती. उपवास असणाऱ्या लोकांचे तर फारच हाल झाले होते. त्यामुळे सकाळी, सर्वांनी कांदे पोह्याच्या भरपेट नाश्ता केला.
पोहे बनवत असताना, आमच्या मदतीला तिथे असणारा एक लढाकी व्यक्ती आला होता. तो न सांगताच, आम्हाला कांदे चिरू लागायला मदत करत होता. आम्हाला वाटलं असेल कोणीतरी हौशी. पोहे बनवून झाल्यावर, आम्ही त्या हौशी मुलाला सुद्धा एक प्लेट पोहे देऊ केले. त्याने सुध्द ते फार आवडीने खाल्ले.
आज बाकी सर्वांच्या चेहऱ्यावर मला फारच तरतरी वाटत होती. आम्ही आता जम्मू आणि काश्मीर भागात पोहोचलो होतो. इथून पुढच्या प्रवासासाठी, आम्हाला त्या भागातील स्थानिक बसमध्ये प्रवास करावा लागणार होता. त्या भागातील ट्रान्सपोर्ट संघटनेने तसा नियमच करून ठेवला आहे. कि बाहेरच्या टुरिस्ट गाड्या ( प्रायव्हेट चालतात ) आपल्या इथे व्यवसाय करता कामा नये. आणि तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळावा. हा त्यामागील मुख्य उद्देश होता..

आजचा आमचा प्रवास.. लेह ते खारदुंगला आणि तिथून पुढे आम्ही नुब्रा व्हॅली येथे मुक्कामाला जाणार होतो. एक दिवसाच्या मुक्कामाची कपडे आम्ही सोबत घेतली. आणि बाकीचं सामान आहे त्याच हॉटेलमध्ये ठेवलं. आज आम्ही दोन नव्या मिनी बसमध्ये विराजमान झालो. आणि एक गम्मत घडली.. मगाशी आम्हाला कांदे चिरू लागणारा तो लडाखी व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही, तर आमच्या नवीन बसचा ड्रायव्हर होता. सोनम असं त्याचं गोंडस नाव होतं.
प्रवासाला सुरवात झाली, लेह ते खारदुंगला हे एकूण एकोणचाळीस किलोमीटरचं अंतर होतं. आणि लेह ते नुब्रा व्हॅली हे एकूण एकशे तीस किलोमीटरचं अंतर होतं. आजच्या प्रवासात आम्हाला खूप कमी अंतर कापायचं होतं. पण हा प्रवास काही सोपा नव्हता. लेह ते खारदुंगला हा अगदी कच्चा रस्ता आहे. समुद्रसपाटीपासून १८३६० फुट अंतरावर खारदुंगला हे ठिकाण आहे. जगातील सर्वात उंच ठिकाणी भारतीय सेना ( B.R.O.) बॉर्डर रोड ऑरगनायझेशन यांनी हा रस्ता बनवला आहे. जगभरातून बरेच पर्यटक निव्वळ हा रस्ता पाहण्यासाठी, आणि.. त्या ऐतिहासिक ठिकाणी आपली हजेरी लावण्यासाठी इथे येत असतात. लेह ते खारदुंगला हा रस्ता काही व्यक्ती बाईकवर सर करतात, तर काही हौशी व्यक्ती हा रस्ता सायकलवरून सुद्धा सर करतात. बाकी आमच्या सारखे इतर हौशे, नवशे, गवशे.. चारचाकी मधून येत असतात.
लेह सोडलं.. आणि आम्ही आता एक उंचावरील घाट चढायला सुरवात केली. जसजसे आम्ही वरील बाजूस जाऊ लागलो. तसं खालील भागातील दृश्य फारच मनोहारी दिसू लागलं. ते छोटसं लेह गाव, तिथे असणारी ती भव्य मॉनेस्ट्री वरील बाजूने खूपच सुंदर दिसत होती. एका बाजूला लेह पेलेस दिसत होता. छोटी छोटी घरं, तर खूपच मस्त दिसत होती.
सोनम इतकी मस्त ड्रायविंग करत होता, कि सांगता सोय नाही. मी स्वतः सुद्धा इतकी शिस्तबद्ध ड्रायविंग करत नसेल. विनाकारण हॉर्न वाजवनं नाही, कि जास्तीचा स्पीड नाही, कि ओव्हरटेक नाही. आजवर मी भारतातला बराच भूभाग फिरलो असेल. पण, घाट माथ्यावरील इतकी सुंदर आणि सेफ ड्रायविंग मी आजवर कधीही पाहिली नव्हती.

आम्ही आता खारदुंगला पासून फक्त वीस किलोमीटर अंतर दूर होतो. आणि अचानक तिथे ट्राफिक जाम लागला. या भागात.. ट्राफिक जाम, पाऊस, स्नो फॉल आणि दरड कोसळणे हे विषय कधीही घडू शकतात. आणि पुढे रस्त्यात नेमकी दरड कोसळली होती. माती आणि दगड काढण्याचं काम चालू होतं. हवेमध्ये भलताच गारवा निर्माण झाला होता. एकीकडे सूर्य चमकत असताना अचानक वातारणात बदल झाला. आणि एकाकेकी ढगाळ वातावरण होऊन चक्क स्नो फॉल होऊ लागला. त्या भागातील लहरी हवामानाचा आम्हाला प्रत्यय येऊ लागला होता. माझ्या आयुष्यात मी पाहिलेला हा सर्वात मोठा स्नो फॉल होता. यापूर्वी एकदा.. वैष्णोदेवीला गेलो असताना, अगदी पंधरा वीस सेकंद स्नो फॉल झाल्याचं माझ्या आठवणीत होतं. मी लागलीच बसच्या बाहेर गेलो. आणि तो कापसी पाऊस माझ्या अंगावर घेतला. मस्त मजा वाटली.
मी पुन्हा बसमध्ये येऊन बसलो..
तितक्यात माझ्या मुलाचा फोन आला. तो बोलत असताना त्याच्या ध्यानात आलं. कि बोलताना मला दम लागत आहे. बायकोला फोन दिला, बायकोला तर अगदी बोलता सुद्धा येत नव्हतं. तिला भयंकर धाप लागली होती. आणि थोड्याफार फरकाने, बसमधील प्रत्येकाला हा त्रास होऊ लागला होता. वातावरणात ऑक्सिजनची मात्रा कमी होऊ लागली होती. आम्हाला काय होत आहे, ते माझ्या मुलाने बरोबर ताडलं. त्यावेळी माझा मुलगा म्हणाला.. तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सोबत घेऊन गेलात कि नाही..? मी त्याला नाही म्हणालो, आणि अपुरी माहिती घेऊन निघाल्यामुळे स्वतःला कोचू सुद्धा लागलो. मला सुद्धा भरपूर धाप लागत होती. माझा जीव अत्यंत घाबरा झाला होता. असं वाटत होतं, इथूनच माघारी निघून जावं. अगदी जीव जातोय कि काय असं झालं होतं. मुलाची आठवण येऊन जीव कासावीस आणि रडवेला झाला होता.

सहज म्हणून आमच्या ड्रायव्हरला मी विचारलं, इथे कुठे ऑक्सिजन सिलेंडर मिळू शकेल का..? तर तो म्हणाला.. इथे नाही, खाली लेह मधेच तुम्हाला सिलेंडर मिळाला असता. आणि म्हणाला.. का काय झालं, कोणाला त्रास होत आहे का.?
तसे मी त्याला बसमधील तीनचार महिला दाखवल्या, तो ताबडतोब बसच्या मागील बाजूस गेला. आणि ऑक्सिजनचा एक भला मोठा लोखंडी बाटला घेऊन आला. पटकन त्याने ज्यांना त्रास होत आहे, त्यांना ऑक्सिजन दिला. ऑक्सिजन दिल्यावर अगदी पाचव्या मिनिटाला माणूस ओके होऊन जात होता. खरोखर सोनम अगदी परमेश्वरा सारखा आमच्या मदतीला धावून आला होता. इतकं होऊन सुद्धा, या प्रवासात मी त्या कृत्रिम ऑक्सिजन वापर केला नाही. मनात ठरवलं, बघुयात.. कुठवर होतंय तिथवर सहन करूयात. आपली विल पावर कधी कामाला येणार. आणि खरं सांगतो, संपूर्ण प्रवासादरम्यान दोनचार वेळा मला असा त्रास झाला. पण मी, अगदी धीराने वेळ मारून नेली.

खरं तर या प्रवासाला जाण्या अगोदर आपण आपल्या सगळ्या शारीरिक चाचण्या, तपासण्या करूनच इकडे गेलं पाहिजे. पण आपण तसं करत नाही, त्यामुळे असे गंभीर प्रसंग उद्भवू शकतात. जर त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाला नसता. तर ते कितीत पडलं असतं.? चुकून एखाद्याला आपला जीव सुद्धा गमवावा लागला असता.
शरीराला ऑक्सिजन कमी पडल्यावर, मरण येताना नेमकं कसं होत असेल. याची एक अंधुकशी झलक सुद्धा मला यावेळी दिसून गेली. मृत्युसमयी.. माणसाचा जीव काही लगोलग जात नसतो. ते काम सुद्धा अगदी स्टेप नुसार होत असणार आहे. त्या विषयाची रंगीत तालीमच मला त्याठिकाणी बघायला किंवा अनुभवायला मिळाली, असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

क्रमशः
खारदुंगला टोप, आणि तिथे होत असणारा स्नो फॉल पाहण्यासाठी खालील लिंक ओपेन करून क्लिप पहा.
No comments:
Post a Comment