#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- १४ )
=====================
काही वेळात..आम्ही पेंगोंग लेकच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलो.
लेकच्या निळ्याशार किनाऱ्यावरून आमच्या बस पुढे निघाल्या होत्या. थ्री इडियट सिनेमातील सगळा नजारा आता आमच्या नजरेच्या टप्प्यात आला होता. त्या निळ्याशार पाण्यावरून नजर हटता हटत नव्हती. शेवटी त्या छोट्याशा निळ्याशार हिमालयीन समुद्रापाशी आमच्या बसेस थांबल्या..
निळ्याशार आभाळात पांढरेशुभ्र विविध आकाराचे ढग, बाजूला उंचच उंच हिमालयाच्या पर्वतरांगा, आणि त्यावर असणारा पांढराशुभ्र बर्फ, आणि मधोमध असणारा हा सरोवर,
अहाहा काय वर्णावा तो सोहळा.
पेंगोंग लेक, समुद्रसपाटीपासून ४३५० मीटर ( १४,२७० फुट ) उंचीवर आहे. इतक्या उंचावरील, जगातील एकमेव असं हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. याचं क्षेत्रफळ सहाशे चार वर्ग किलोमीटर आहे. हा लेक, एकशे चौतीस किलोमीटर लांब असून, पेंगोंग लेक.. लदाख पासून तिबेट पर्यंत लांबलचक असा पसरलेला आहे. या सरोवराचा साठ टक्के भाग हा चीनमध्ये आहे. आणि बाकी हिस्सा भारतामध्ये आहे.

त्या सरोवराच्या किनारी, सगळीकडे पर्यटकांची भलतीच गर्दी ओसंडून वाहत होती. आबालवृद्ध अगदी तरुण झाले होते. त्या सरोवराच्या किनाऱ्यावर, सगळीकडे पिवळ्या रंगाच्या स्कूटर्स पार्क केलेल्या दिसत होत्या. थ्री इडियट सिनेमात करीना कपूरने केलेली वेशभूषा तिथे फक्त पन्नास रुपयात भाड्याने मिळत होती. ते कपडे परिधान करून, सर्व महिला फोटो टिपण्याचा मनमुराद आनंद लुटत होत्या. मी त्या सरोवरापाशी गेलो, आणि तो निळाशार हिमालयी समुद्र पाहून बेहद खुश झालो. ते पाणी इतकं स्वच्छ होतं, कि त्या पाण्यातून अक्षरशः तळ दिसत होता.
मी त्या सरोवरापाशी गेलो, तिथे एक फलक लिहिला होता. हे पवित्र जल आहे, त्यामुळे या पाण्यात कोणी उतरू नका. पण बरेच पर्यटक या विषयाला वाटाण्याच्या अक्षता लावत होते. मी त्या लेकपाशी गेलो, आणि सहजच म्हणून ते पाणी मुखात घेतलं. आणि काय सांगू, ते पानी चक्क खारट होतं. बापरे.. या हिमालयाच्या कुशीत वाळवंट पाहून मी चक्रावून गेलो होतो. आणि त्यावर कोटी म्हणजे, आता हे पाणी समुद्रासारख खारट लागत होतं. माझ्यासोबत असणाऱ्या सहकार्यांना याची बिलकुल खबरबात नव्हती. ज्यावेळी मी त्यांच्या निदर्शनास हि गोष्ट आणून दिली. त्यावेळी ते सगळे जन अगदी अवाक झाले. निसर्गाच्या चामत्कारापुढे आम्ही सगळे नतमस्तक झालो होतो.
याठिकाणी आज आमचा मुक्काम असल्याने, आम्हाला घाई अशी बिलकुल नव्हती. फिरण्या बागडण्यात वेळ कसा गेला तेच समजलं नाही, सायंकाळचे पाच वाजत आले होते. सूर्य आठ वाजता मावळणार होता, त्यामुळे चिंता करायची काहीच गरज नव्हती. सगळे जन मनसोक्त फोटो आणि चित्रफिती काढण्यात दंग झाले होते. वृद्ध महिला सुद्धा करीना झाल्या होत्या. आणि त्यांचे मिस्टर अमीर खान होऊन स्कूटरच्या मागील बाजूस थांबून आपले फोटो टिपून घेत होते.

थ्री इडियट सिनेमामुळे तेथील लोकांना एक नवीनच रोजगार उपलब्ध झाला होता. करीनाचे कपडे घालून, स्कूटरवर बसून फोटो काढण्यासाठी एका महिलेकडून ते शंभर रुपये घेत होते. तर.. त्या ढुंगण खाजव्या खुर्चीवर बसून फोटो काढण्यासाठी पन्नास रुपये आकारात होते. तिथे आलेले पर्यटक सुद्धा कसलीही घासाघीस न करता अगदी मुक्तहस्ते त्यांना मागेल त्या रकमा देऊ करत होते. कारण या लोकांचं पोट फक्त पर्यटन या विषयावरच अवलंबून आहे. आणि ते सुद्धा फक्त..
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यातच. बाकी इतर महिने त्या भागात फक्त बर्फ आणि बर्फच असतो. तोच काय तो त्या भागातील एकमेव हिरो असतो.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात, हा लेक पूर्ण बर्फाचा झालेला असतो. कधी कधी हा बर्फाचा थर इतका जाड असतो, कि त्यावर चक्क गाड्या सुद्धा चालवल्या जातात. पण त्या काळात, ट्रीप करणं म्हणावं इतकं सोपं सुद्धा नसतं. आणि फारच खर्चिक सुद्धा असतं. त्यामुळे.. फारच शौकीन, धाडसी आणि लक्ष्मी पुत्रच यावेळी तिकडे सफर करत असतात.

सायंकाळी सहा वाजता आम्ही आमच्या कॉटेजमध्ये पोहोचलो. आजच्याला आम्ही एका वेगळ्याच अशा वुडन कॉटेजमध्ये राहणार होतो.
सहा वाजले नाहीत, तोवर त्या भागात भयानक थंडी पडायला सुरवात झाली. मी कसंबसं तोंडावर पाणी मारलं, आणि मला निरोप आला. हरिपाठाला सुरवात झाली होती. आमच्या सोबत ट्रीपला आलेली जवळपास सगळी मंडळी भक्ती संप्रदायातील वारकरी मंडळी होते. मी सुद्धा लगबगीने हॉटेलमध्ये असणाऱ्या जेवणाच्या ठिकाणी हरिपाठाला जाऊन बसलो. आजचा हरिपाठ फारच अविस्मरणीय असा होता.
पेंगोंग लेक आज मला, अगदी मानस सरोवरासारखा भासत होता. चहुबाजूला बर्फाच्या पर्वतरांगा, हाडं गोठवणारी थंडी, आणि टाळांचा किनिकीनाट आसमंतात भरून पावला होता. आजच्या दिवशी पुण्यात पालख्यांचं प्रस्थान सुद्धा झालं होतं. एकुणात हा सगळा मस्त असा शर्करायोग जुळून आला होता.

आज रात्री जेवण बनवायचा काही त्रास नव्हता. आजचं आमचं जेवण इथेच हॉटेलमध्ये होणार होतं. रात्री आठ वाजता आम्ही जेवणाला सुरवात केली.. जेवणात मस्तपैकी मंचाव सूप, अंडा करी, चपाती, दोन तीन शाकाहारी भाज्या, शेवयाची खीर, वरण भात, पिण्यासाठी गरम पाणी असा भरगच्च कार्यक्रम होता. आजच्याला. फक्त जेवायचं आणि झोपायचं होतं. त्यामुळे कोणीही हयगय केली नाही. सर्वांनी जेवणावर आडवा हात मारला. आणि भरल्या पोटी सगळे आपापल्या कॉटेजमध्ये निघाले. तितक्यात तिथे असणारा कामगार म्हणाला..
कॉटेजमध्ये गेल्यावर, पाण्याची बादली भरून ठेवा. नाहीतर इथे रात्री पाईपलाईन गोठते, रात्री बाथरुमला जायची पंचायत होईल. प्रथम सर्वांनी हे काम उरकून घेतलं. आणि राम कृष्ण हरी म्हणत, सगळे झोपी गेले.

( पेंगोंग लेक येथील अद्भुतरम्य नजारा पाहण्यासाठी, खालील लिंक क्लिक करा. हा विडीयो सर्वांनी नक्की पहा. मस्त सफर घडून येईल. )
क्रमशः
No comments:
Post a Comment