Saturday, 28 January 2017

सुरवातीच्या काळात..
माझ्या डीपीवर, मी माझा स्वतःचा फोटो ठेवत नसायचो.
त्यामागे कारण एकच, आपल्या फोटोपेक्षा इतर सिने कलावंतांचे फोटो ठेवले. तर त्यानिमित्ताने कोणीतरी, त्यांची खास आठवण किंवा माहिती नक्की सांगायचं. आणि त्या माहित्या वाचून, माझा आणि इतर मित्रांचा दिवस सुद्धा अगदी रंगीन असा जायचा. हा त्यामागचा एकमेव आणि मुळ उद्देश होता. आणि, हे डीपी चेंज प्रकरण.. मी अगदी, दर आठवड्याला आणि ते सुद्धा रविवारी मध्यरात्री १२ वाजता करायचो. तरी सुद्धा, त्या मध्यरात्री माझ्या मित्रांच्या त्यावर खूप उड्या पडायच्या.
त्याच बरोबर, माझं गुलछबू लिखाण वाचून, बरेच मित्र मैत्रिणी माझ्या लेखनाचे अगदी दिवाने आणि चाहते झाले होते. आता, सगळ्यात मोठी गडबड हि होती..
कि.. हा, " पंडीत पॉटर " म्हणवणारा व्यक्ती. नेमका स्त्री आहे कि पुरुष..?
कारण, या माध्यमात सुरवातीच्या काळात मी माझी कोणतीच ठोस माहिती इथे ठेवली नव्हती. पण ज्या लोकांनी, माझी सगळी वॉल चाळली होती. त्यात त्यांना, माझा आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो सुद्धा पाहायला मिळाला होता. पण.. हे, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांसाठी मर्यादित होतं. हे सगळं करण्यामागे कारण एकच होतं,
 मला इथे बिनधास्त वावरायचं होतं. माझ्या मनाप्रमाणे मनमोकळं लीखाण करायचं होतं. मला माझ्या लिखाणात, कोणाचाही अडसर किंवा सल्ला नको होता,
परंतु.. हे सगळं करत असताना, मला कोणालाही फसवायचं नव्हतं, हे सर्वात मुख्य आणि खरं कारण होतं बरं का..!
तर त्यावेळी.. माझ्या लिखाणावर फिदा होऊन, पुण्यातील आणि पुण्याबाहेरील बऱ्याच उच्चभ्रू मित्रांनी माझ्या भेटीसाठी मला गळ घातली होती.
मी तर अगदी साधाभोळा माणूस,
मला कोणाचं मन मोडावंसं वाटायचं नाही. पण माझ्या मनात थोडी भीती असायचीच. कि, मी पुणे महापालिकेतील एक साधा ड्रायव्हर मनुष्य आहे. आणि, मला भेटायला येणारी व्यक्ती तर अगदी मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे.
पण.. मला भेटायला येण्यापूर्वी त्यातील काही लोकांनी माझी माहिती काढत मला विचारलं होतं.
कि.. तुम्ही स्त्री आहात कि पुरुष, आणि तुम्ही काय आहात आणि नेमकं काय आणि कुठे काम करता..?
आजवर.. या माध्यमात मी कधीही आणि कोणाशीही खोटं बोललो नाही. त्यामुळे, त्या संभाव्य व्यक्तींना मी माझी खरी आहे ती सगळी माहिती पुरवली होती.
पण त्यावेळी.. अनपेक्षित अशा दोनतीन वाईट घटना घडल्या,
माझी खरीखुरी माहिती वाचून. मला वेळ देऊन भेटायला येणाऱ्या व्यक्ती, पुण्यात येऊन किंवा पुण्यात असून सुद्धा प्रत्यक्ष मला न भेटता. आणि, दुसऱ्याच कोणालातरी भेटून त्या परस्पर निघून गेलेल्या असायच्या. मी मात्र, संपूर्ण दिवस त्यांच्या फोनची वाट पाहत असायचो.
आणि, त्या व्यक्ती परत स्वगृही गेल्यावर. त्यांनी टाकलेल्या, पोस्टवरून मला ते समजून यायचं.
कि हा व्यक्ती पुण्यात येऊन किंवा असून मला न भेटता दुसऱ्याच कोणाला तरी भेटून निघून गेला आहे. परंतु, या गोष्टीचा मी कधीही राग मानला नाही. आणि, कोणालाही त्याचा जाब सुद्धा विचारला नाही.
पण त्या वेळचं ते संभाव्य स्टेटस वाचून.. मी मात्र फार दुक्खी व्हायचो.
पण काय आहे,
शेवटी.. हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि निवडीचा विषय आहे.
परंतु.. असं दोनतीनदा घडल्या नंतर, मला कोणाला म्हणजे अगदी कोणालाच भेटावंसं वाटत नव्हतं. आणि आजही, मला या भेटीगाठी अगदी नकोशा वाटतात. तरी सुद्धा, त्यातल्या त्यात मी माझ्या बऱ्याच मित्रांना विनासंकोच भेटलो आहे. मग त्यात सगळ्या प्रकारचे मित्र आणि मैत्रिणी सुद्धा आल्याच. मी बाकी सगळ्यांना अगदी एकसमान मानतो. त्यात कोणताही भेदभाव ठेवत नाही. पण त्याचबरोबर, या माध्यमात मला काही अशा व्यक्ती सुद्धा भेटल्या, कि ज्या माझ्यापेक्षा अगदी उच्च पदावर कार्यरत होत्या.
पण, भुतोनभविष्यती मला भेटताच.. त्यांनी अगदी माझे चरणस्पर्श सुद्धा केले आहेत..!
तर काही अनोळखी मित्रांनी मोठमोठ्या भेटवस्तू पाठवून मला आश्चर्याचे सुखद धक्के सुद्धा दिले आहेत. शेवटी नाण्याला दोन बाजू अस्ततातच. हि सगळी, त्या सरस्वतीची ताकत आणि किमया होती, कारण..माझ्या लेखणीत तेवढी कमाल होती. त्यामुळे, या माध्यमात दुटप्पी भूमिका बजावणाऱ्या लोकांना मी नेहेमी टाळत असतो. आता तर, सरावाने मला सगळं काही अगदी ताबडतोब समजतं. कोण काय आहे आणि कोण काय नाहीये..!
या फेसबुक वरील मैत्रीला, नक्कीच आभासी म्हणता येणार नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे हि नक्कीच एक " मायावी " दुनिया आहे. यात माझं बिलकुल दुमत नाही..!
कोण आपला, आणि कोण तुपला..?
याचा, तुम्हाला इथे कधीच आणि उभ्या जन्मात थांगपत्ता लागणार नाही..!
हे सगळं लिहून, मी स्वतःला खूप ग्रेट वगैरे समजतोय अशातला भाग नाहीये, फक्त.. बरेच दिवस झाले, काही मनातलं लिहायचं राहून जात होतं.
हवं तर.. आज, ते सगळं काही लिहिण्याचा योग जुळून आला असं म्हणा.
धन्यवाद मित्रहो..!
परवा.. काही कामाने एका मित्राच्या घरी मी गेलो होतो.
त्याच्या घराच्या बाजूलाच, एक लेडीज ब्युटीपार्लरचं दुकान होतं. फारच प्रशस्थ आणि आकर्षक असं ते दुकान होतं. सहजच माझं लक्ष, त्या दुकानाबाहेर असणाऱ्या चपलांवर गेलं. तर त्या ठिकाणी, जवळपास दहा पंधरा लेडीज चपलांचे जोड पडले होते.
मी मनातच ठोकताळा बांधला, कि या इथे पार्लरचं कामही चांगलं होत असावं, आणि भरपूर व्यवसाय सुद्धा होत असावा. त्यामुळे, इथे महिलांची भरपूर गर्दी सुद्धा आहे.
मित्राच्या घरात, माझं चहापाणी उरकलं. आणि बोलता-बोलता मी सहजच विषय काढला.
आणि, मित्राच्या बायकोला म्हणालो.
वहिनी.. तुमच्या घराच्या बाजूच्या पार्लरमध्ये भरपूर व्यवसाय होत असावा..!
तर त्या म्हणाल्या..
नाही हो, काही खास विषय नाहीये. पण भाऊजी तुम्हाला काय माहित हो..?
तर मी त्यांना म्हणालो..
अहो बघा ना, त्या पार्लरच्या बाहेर महिलांच्या चपलांचा अगदी ढीग लागला आहे.
त्यावरून समजतय कि.
माझ्या या वक्तव्यावर, आमच्या वहिनी अगदी खळखळून हसल्या.
आणि म्हणाल्या,
अहो.. त्या पार्लरची मालकीन खूप हुशार आहे. तिने स्वतःच, तिच्या दुकानाबाहेर दहा बारा चपलांचे जोड ठेवून दिले आहेत. त्यामुळे, नवीन येणाऱ्या महिलेला वाटतं. इथे बऱ्याच महिला येतात, म्हणजे इथे काम सुद्धा मस्त होत असेल. त्यामुळे, बऱ्याच नवीन येणाऱ्या महिला या नकली " दिखाव्याला " भुलतात. आणि, त्यामुळे तिचा व्यवसाय सुद्धा बऱ्यापैकी होतो.
खरच.. पुणेकरांची डोकी कशी चालतील, त्याचा काही नेम नाही..!
बांगडा तंदूर. ( माझी घरगुती पद्धत )
साहित्य :- दोन ताजे आणि मोठे बांगडे, हळद, मीठ, तांबडं तिखट, एक मोठा कांदा, दोनचार कोथंबीरच्या काड्या , दोनेक पुदिना काड्या, लिंबू, चाट मसाला, धना पावडर, टूथपिक आणि फॉईल पेपर. ( तेलाची आवश्यकता नाही. )
कृती :- बांगडे खरेदी केल्यावर, त्यांना स्वच्छ करून घ्यावं. आणि, पोटातील काट्याच्या मधोमध त्यांना एक लांबसर काप द्यावा. आणि वरील बाजूस चिरा मारून घ्याव्यात.
बांगड्याला हळद, मीठ आणि लिंबूरस चोळून मस्तपैकी अर्धा तासभर मुरवत ठेवावं.
कांदा गोलसर चकत्या करून कापून घ्यावा, त्याची प्रत्येक रिंग हाताने चुरडून वे
त्यात.. मीठ, हळद, बारीक चिरलेली कोथंबीर आणि पुदिना, एका मोठ्या लिंबाचा रस, चाट मसाला, धना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून हे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यावं.




गळी करून घावी.
हे एकत्र केलेलं मिश्रण, बांगड्याच्या उभ्या कापात ( पॅटिस सारखं ) भरून घ्यावं. फुटभर आकाराचा फॉईल पेपरचा तुकडा घ्यावा. आणि त्यात, हा भरलेला बांगडा चांगला लपेटून घ्यावा. चारी बाजूने झाकलेल्या फॉईल पेपरला टूथपिकणे टोचे मारून घ्यावेत.
हा बांगडा, गॅसवर तारेची जाळी ठेऊन दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजून घ्यावा. भाजताना, त्यातील पाण्याची वाफ फॉईल पेपरला टूथपिकणे केलेल्या होलमधून बाहेर पडेल. आणि सोबतच या पाककृतीचा सुगंध सुद्धा घरभर दरवळेल. थोडसं दोन्ही बाजूला फिरवून, दहाबारा मिनिटे हा बांगडा मंद आचेवर भाजून घ्यावा.
तंदूर बांगडा तयार झाल्यावर गरम असतानाच त्याला फॉईल पेपर मधून मोकळा करून घ्यावा. जास्ती उशीर केलात, तर फोइल पेपरच्या आत दडलेल्या वाफेचं पाण्यात रुपांतर होऊन, हा बांगडा ओला होऊ शकतो.
त्यानंतर.. विशिष्ट पेयाबरोबर किंवा जेवणाबरोबर तुम्ही या तंदूर बांगड्याचा आस्वाद घेऊ शकता.
( याच पद्धतीने, तुम्ही इतर फिशचे तंदूर सुद्धा बनवू शकता. )
शेफ
~PΔΠDIT PΩTTΣR~ 
इलेक्शन्स म्हणजे, काही मोजक्या कार्यकर्त्यांकरिता अगदी सुगीचे दिवस असतात.
बरेच दिवस, गावामध्ये असून सुद्धा पडद्याआड गेलेले काही व्यक्ती पाच वर्षांनंतर अचानकपणे आपल्याला गावामध्ये दिसू लागतात. त्यावेळी आपण सुद्धा अगदी कोड्यात पडतो.
आयला.. गेली पाच वर्ष हा माणूस नेमका होता तरी कुठे..?
तेंव्हा कोणताही ठोकताळा न मानता, तुम्ही समजून जावा. आता इलेक्शन जवळ आले आहेत.
तसं पाहायला गेलं तर, हि " धुमकेतू " लोकं त्या पिढीजात राजकारणी लोकांचे हुकमी एक्के असतात. त्यांच्या अंगात, सतत राजकारण सळसळत असतं.
मी तर म्हणेन, त्यांना राजकारण या विषयाचं व्यसनच लागलेलं असतं. पण खिशात पैसा नसल्याने, हि लोकं इतर उमदेवारांना मदत करत या क्षेत्रात आपली वाटचाल करत असतात.
आणि.. या ना त्या कारणाने, स्वतःची राजकारणाची हौस ते भागवून घेत असतात.
कारण कोणत्याही परिस्थितीत, यांना त्यांच्या आवडत्या विषयाला अलविदा करायचा नसतो.
आणि, नेमका या गोष्टीचा गैरफायदा घेत.
काही राजकारणी मंडळी, अशा लोकांना त्यांना जमेल तसं पोसत असतात. किंवा, यांच्या सगळ्या नाड्या तरी त्यांच्या हातात असतात.
त्यामुळे, ती हौशी लोकं..
अहोरात्र, आणि हवं तेंव्हा फक्त यांच्या करीताच झटत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
खरं तर, राजकारण या विषयाचा मला फार तिटकारा आहे.
कारण, आजच्या घडीला प्रत्येक व्यक्तीला नगरसेवक व्हायचं आहे. खरं तर.. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारे लोकं आता राहिलेतच कुठे..? त्यामुळे, कधी-कधी माझ्या मनात विचार येतो.
कि चालू जमान्याप्रमाणे,
आता " नगरसेवक " हे नाव बदलून. ते आता, " नगरमालक " असं करायला हवं.
खरं आहे हो,
तुम्ही सांगा, कोणते आणि किती नगरसेवक आपल्या सेवेला हजर असतात..?
ते आपले सेवक आहेत, तर त्यांनी आपल्याला साहेब म्हणायला हवं. आपली हवी ती सामाजिक सेवा करायला हवी. पण आज तसं नाहीये ना,
आजच्या घडीला, आपल्यालाच त्यांना साहेब म्हणावं लागतं. त्यांच्या मागेपुढे करावं लागतं.
काय करता.. कलियुग आहे, जोपर्यंत जनतेची सेवा करणारा खरा नेता मिळणार नाही. तोपर्यंत शहराचा विकास सुद्धा होणार नाही.

निवडणुकीचा प्रचार, हा एक भलताच आणि अजब अनुभव आहे. हे नुकतंच मला समजलं.
गेल्या पंधरा-वीस दिवसापासून, आमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार मित्राबरोबर प्रचारफेरीत मला वेळ मिळेल तसा मी सहभागी होत असतो.
अशा ठिकाणी, प्रत्येक घराशी आणि त्या घरातील किंवा वस्तीमधील लोकांशी आपल्याला संवाद साधायला मिळतो, किंवा तो कटाक्षाने साधायचा असतोच.
परवा रविवार असल्याने, अगदी सकाळीच मी घोरवडेश्वराच्या डोंगरावर जाऊन आलो होतो. आणि त्यानंतर, संपूर्ण दिवसभर आमची प्रचाराची रणधुमाळी चालू होती.
वीसेक वर्षांपूर्वीच्या जुन्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नावाचा प्रकार नसतो. त्यामुळे, एखाद दुसर्या मताकरिता सुद्धा, आम्हाला दोनचार मजले चढून जावं लागत होतं.
सकाळच्या डोंगर चढाईमुळे, आणि दुपारच्या प्रचार फेरीमुळे मी थोडा थकून गेलो होतो. त्यामुळे, संध्याकाळच्या सत्रात, दोनचार बिल्डिंगमध्ये मी प्रचार केला.
पण त्यानंतर, जसे माझे पाय मला शिव्या द्यायला लागले. तसा मी सुद्धा शहाणा झालो. आणि, प्रचारा ठिकाणी त्या ठराविक बिल्डिंगच्या खाली किंवा तेथील रस्त्यावर मी थांबू लागलो.
आमच्या सोबत, पाच पन्नास मित्र असल्याने, आमच्या काहीतरी गप्पागोष्टी चालूच असायच्या.
पूर्वी.. मोबाईलची भाषा खूप फेमस होती, किंवा त्यावर आपल्या चल जीवनात भयंकर विनोद सुद्धा निर्माण झाले होते. आणि, आजही ते विनोद प्रत्येक व्यक्तीचा ध्यानात सुद्धा आहेत.
उदा :- मिस कॉल, चार्जिंग आणि इत्यादी-इत्यादी.
तर परवा.. इंटरनेट आणि मोबाईल संबंधित एक नवीन आणि थोड्या वेगळ्या प्रकारचा विनोद या प्रचारा दरम्यान मला ऐकायला मिळाला. तो मी, तुमच्यासमोर सादर करत आहे.
तर.. त्या दिवशी, माझा मित्र आणि त्याच्यासोबत आमचे काही मित्र प्रचार करण्यासाठी एका बिल्डिंगमध्ये गेले होते. माझे पाय दुखत असल्याने, मी त्या बिल्डींग खालीच खालीच उभा होतो. आणि तितक्यात,
एक दारू पिलेला मध्यमवयीन मुलगा तिथे आला. आणि, आमच्या ग्रुपमधील एका ओळखीच्या मित्राला जाऊन तो भिडला. आता, माझा तो मित्र सुद्धा थोडा मिश्किल स्वभावाचा आहे.
तर.. तो तरुण मित्र त्याला भेटल्या बरोबर म्हणाला..!
भाई.. कोण आलय रे..?
त्यावर माझा मित्र म्हणाला.. अरे आपले फारूक भाऊ तुमच्या भागात प्रचारासाठी आले आहेत.
दारू पिलेल्या माणसाला, लैच चौकशा असतात हो. तर तो पिलेला मुलगा माझ्या मित्राला म्हणाला, आपल्याला फारूक भाऊला भेटायचं आहे..!
माझ्या मित्राला तर ताबडतोब समजलं, कि हा गडी तर जाम पिऊन आला आहे.
त्यामुळे, माझा मित्र त्याला म्हणाला..
किती घेतलीस तू..? छोटा रिचार्ज आहे, कि मोठा रिचार्ज..?
( म्हणजे, तू अख्खी कोर्टर लावली आहेस, कि नाइंटी लावली आहेस..? )
तर.. तो मुलगा म्हणाला,
नाय रे मित्रा, मी छोटा " रिचार्ज मारलाय..!
( म्हणजे, हा गडी नव्वद मिली लावून आला होता. )
बराच वेळ झाला.. शेवटी, प्रचार संपवून फारूक भाऊ सुद्धा त्या बिल्डींग मधून खाली आले.
आणि.. हा हौशी " टाकेश " मित्र त्यांना भेटला.
एकतर, आमचा फारूक भाऊ दारू वगैरे पीत नाही. आणि त्यात, या टाकेश मुलाने त्यांना पाहिल्याबरोबर डायरेक्ट त्यांची गळाभेटच घेतली. आणि, नको तो गंध आमच्या फारूक भाईना त्याने मोफत देऊन टाकला.
शेवटी वैतागून, त्या मुलाशी गळाभेट घेत असताना फारूक भाऊ आमच्या 'त्या' मिश्किल मित्राला म्हणाले..
कशाला राव तुम्ही अशा लोकांना थांबवून ठेवता..? लगेच घरी पाठवून द्यायचं ना..!
त्यावेळी, माझा तो छैलछबीला आणि रंगरंगीला मित्र फारूक भाऊला म्हणाला..
फारूक भाऊ, आता काय करता..
तो सध्या " ऑनलाईन " ( म्हणजे दारू पिऊन आला आहे. ) आहे ना. त्यामुळे त्याला नकार सुद्धा देता येत नाहीये हो..
आता.. ऑनलाईन म्हणल्या बरोबर, त्या पिताड मुलाला सुद्धा लकवर काही समजलं नाही. त्यामुळे, तो सुद्धा अगदी प्रश्नांकित मुद्रेने माझ्या त्या मिश्किल मित्राकडे पाहत होता.
शेवटी एकदाची, ती गळाभेट उरकली.
आणि कसाबसा आम्ही आणि फारूक भाऊंनी त्या हौशी " टाकेश " मतदार मित्रापासून सुटकारा मिळवला.
योग्य वेळी, ठराविक ठिकाणी आणि नेमका हातोडा मारता आला पाहिजे.
एकदा जर, ती कला अवगत झाली.
तर..
बोनी कपूर सारख्या जाड्या भरड्या लोकांना सुद्धा.
श्रीदेवी सारखी " स्वप्नसुंदरी " अलगद पटून जाते..!
बऱ्याच दिवसापासून, असं पाहायला मिळतंय..
प्रत्येक फळविक्रेता,
त्याच्याकडे असणाऱ्या फळांवर इंग्रजीत नाव असलेल्या अंडाकृती स्टीकरवर " एक्स्पोर्ट कॉलिटी " लिहीलेलं असतं. ते स्टीकर तो प्रत्येक फळावर चीटकवत असतो.
वास्तविक पाहता, एक्स्पोर्ट कॉलिटीची फळं फार मोठ्या मॉल मध्येच मिळत असतात.
पण जाहिरातीचा विषय पाहिला, तर प्रत्येक गिऱ्हाईक आपण घेत असलेलं फळ हे एक्स्पोर्ट कॉलिटीचं आहे. अशी आपल्या मनाची समजूत घालून घेतो. 
शेवटी काय आहे, हा सगळा जाहिरातीचा जमाना आहे.
पण त्या फळावर स्टीकर लावण्यामागचं नेमकं गणित तुम्हाला माहित नसावं. ते मी आज तुम्हाला सांगणार आहे.
अशी स्टीकर लावलेली जी फळं असतात. त्या फळातील ठराविक फळांवर काहीतरी काळा किंवा किडका डाग असतो. आणि, तो छोटा डाग झाकण्याकरिता ती लोकं हा उपद्व्याप करत असतात.
आणि आपल्याला वाटतं. कि आपण, एक्स्पोर्ट कॉलिटीची फळं विकत घेतली आहेत. आहे की नाही गंमत..!
मध्यंतरी.. माझा एक मित्र, माझ्या खूप मागे लागला होता.
आज तुला वेळ आहे, तर माझ्याबरोबर एका लग्नाला चल ना राव..! तुझी वहिनी अगोदरच पुढे गेली आहे, आणि आता माझ्यासोबत जायला कोणीच नाहीये.
खरं तर.. सुट्टी दिवशी पुण्याला जायचं म्हणजे माझ्या खूप जीवावर येतं. रोज पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याकरिता कामासाठी मला पुण्यात जावच लागतं. आणि, सुट्टी दिवशी सुद्धा पुण्याला जायचं म्हंटलं. तर ते बाकी माझ्या अगदी जीवावर येतं. मला अगदी कामावर गेल्यासारखंच वाटतं. त्यामुळे, सुट्टीदिवशी मी शक्यतो पुण्याला जाणं टाळत असतो.
तर तो मित्र मला म्हणाला,
चल राव.. माझ्यासोबत लग्नाला यायला कोणीच नाहीये. तेवढीच मला तुझी कंपनी होईल.
शेवटी, नाय हो करता मी त्याच्याबरोबर जायला तयार झालो.
त्याच्या कार मधेच आम्ही निघालो होतो.
जाताना, मी त्याला विचारलं.. ते सगळं खरं आहे, पण लग्न कोणाचं आहे..?
तर, गालावर स्मितहास्य आणत तो म्हणाला..
" माझ्या मैत्रिणीचं आहे..! "
बेगाने शादिमे अब्दुल्लाह दिवाना,
लग्न मैत्रिणीच, आणि हा बाकी जाम खुश झाला होता..!
असो.. तर आम्ही दोघे त्या लग्नसमारंभात जाऊन पोहोचलो. मारवाड्याचं लग्न होतं. आता यापुढे मी जास्ती काही सांगावं म्हणजे ती फार मोठी अतिशयोक्ती ठरेल. मांडवात सगळं काही अगदी मारवाडी थाटामाटात चालू होतं. कोणत्याच गोष्टीची कसलीच कमतरता नव्हती.
मारवाडी मुलगी म्हंटल्यावर दिसायला ती एक नंबर असणारच, यात काही शंका नव्हती.
त्यामुळे.. मी सहजच त्या मित्राला म्हणालो.
" तुझी मैत्रीण, दिसायला एकदम खास असेल नाही...! "
बस्स.. मी फक्त हे वाक्य बोलायची खोटी होती, आणि हा गडी लगेच सुरूच झाला.
अरे.. आमच्या कॉलेजमध्ये तिचा हात धरणारी दुसरी मुलगीच नव्हती. तुला काय सांगू सगळं कॉलेज हिच्या मागे पडलं होतं. पण ती कोणालाच पटली नाही. अगदी सरळमार्गी पोरगी रे.
आणि... ह्याव, त्याव.. जे होतं नव्हतं ते सगळं काही तो मला सांगून बसला.
या ना त्या कारणाने, तो माझा टाइमपास करत होता.
शेवटी.. नवरा नवरीला भेटण्यासाठी आम्ही स्टेजवर निघालो. आणि जवळ जाताच, माझं त्या नवरी मुलीकडे लक्ष गेलं.
तुम्हाला काय सांगू.. लोकाच्या लेकीला नावं ठेऊ नयेत. पण, जे आहे ते अगदी खरं आहे.
ती मुलगी.. रंगाने अगदी गोरीपान होती,
पण दिसायला अगदी जेमतेम होती. तिच्या मेकपचा थर सुद्धा, तिच्या चेहेर्यावरील खड्डे मुजवू शकला नव्हता. आणि दुसरीकडे, नवरा बाकी एखाद्या हिरोला ठार करून टाकेल इतका सुंदर होता. आता, या दोघात नेमकं नशीब कोणी काढलं होतं. ते खुद्द परमेश्वरालाच माहिती.
शेवटी.. स्टेजवर चढता-चढताच, मला खोटं बोलणाऱ्या त्या मित्राकडे एक रागीट कटाक्ष टाकत,
मी त्याला म्हणालो.
हि आहे तर तुझी सुंदर मैत्रीण,
तर.. सावरासावर करत माझे शब्द हवेत दाबत मला तो म्हणाला..
माझी नाहीये रे,
ती, माझ्या " बायकोची " मैत्रीण आहे..!
एकाच प्रकारची भाजी..
एकसारखं.. तेल,मीठ, मिरची, मसाला. एकाच प्रकारची कढई, एकाच प्रकारचं उलातनं, एकसारखीच चूल..!
पण ती पाककृती तयार करणाऱ्या, दहा वेगवेगळ्या महिला असतील..
तर, त्या प्रत्येक भाजीची चव निराळी असणारच.
आहे कि नाही गंमत..
कालपासून, मला वेळ मिळेल तसा माझ्या एका नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवार मित्राबरोबर. आमच्या येथील परिसरामध्ये, त्यांच्यासोबत मी फेरफटका मारत आहे.
पूर्वी, आमच्या इथे एक छोटासा स्लम एरिया होता. पिंपरी महापालिकेने, तिथे राहत असणाऱ्या लोकांना. एस. आर. ए. स्कीम अंतर्गत अत्यल्प रकमेत सुंदर अशी दर्जेदार घरं बांधून दिली आहेत. सात मजल्याच्या एका बिल्डिंगमध्ये, प्रत्येक मजल्यावर एकूण सोळा घरं आहेत. अशी एकूण, एकशे बारा घरांची एक इमारत आहे.
झोपड्यातून फ्ल्याट मध्ये आलेल्या लोकांनी, त्यांची घरं सुद्धा अगदी चकाचक ठेवली आहेत. छोट्या घरात मस्तपैकी रंगरंगोटी करून.. त्यात छोटसं फर्निचर, एका कोपऱ्यात टीव्ही, भिंतीला टेकून एखादा दिवान, आणि नजरेत भरावा असा नीटनेटकेपणा. आता, आमची आणि त्या लोकांची फार जुनी ओळख असल्याने, प्रत्येक घरातील महिला आणि पुरुष आमच्या Faruk Inamdar च्या माथ्यावर मनमोकळेपणाने आशीर्वाद देत होते. आम्हाला तर, आम्ही अगदी आमच्या घरीच आल्यासारखं वाटत होतं.
संध्याकाळी सातची वेळ, आमचा.. प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार चालू होता.
संमिश्र समाजाच्या लोकांची वसाहत असल्याने, आम्ही एका विशिष्ट घराचा दरवाजा ठोठावला, आणि तो दरवाजा उघडला..
कि.. प्रत्येक घरातून, वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाचा सुवास माझ्या नासिकात दौडायचा.
कोणाच्या घरातून.. घमघमीत " मटन " पुलावाचा सुवास दरवळायचा, तर कोणाच्या घरातून मेथीच्या भाजीचा खुमासदार ठसका अनुभवायला मिळायचा. तर, कोणाच्या घरातून लसून मिरचीच्या झणझणीत खरड्याचा झटकेबाज गंध नाकाला सुखद अनुभूती द्यायचा. तर कोणी, वाटण घाटन करून केलेल्या विविध रस्सा भाज्यांचा सुवास मला वेडंपिसं करून सोडायचा.
त्या प्रत्येक घरातील ताया बायांना, माझ्या मित्राला मत द्या म्हणून साकडं घालत असताना. सोबतच, माझ्या मनातल्या मनातच मी म्हणायचो..
" मला, तुमच्या घरी जेवायला कधी बोलावताय..! "
मी एक नंबरचा खवय्या माणूस आहे. निव्वळ खाण्यासाठी, मी जगत आहे किंवा या जगात आहे. असं म्हणलं तर, ती अतिशयोक्ती ठरणार नाही. माझ्या अंतर्मनातील आवाज, त्या महिलांच्या पर्यंत भले पोहोचत नसेल. पण, त्या गरिबा घरच्या घरातून जेवणाचा येणारा सुवास मला पक्कं वेडं करून टाकत होता. फक्त, त्या बेधुंद सुवासाने माझी क्षुधाशांती होत होती.
मी पूर्वीपासून पाहत आलोय, जी लोकं जेमतेम पैसा आडका कमवत असतात. ती लोकं, फक्त आपल्या पोटासाठी झटत असतात. त्या कष्टकरी घरातील महिलांना माहित असतं,
आपला माणूस.. भलं मोठं काबाडकष्ट करून घरी येणार असतो. त्याच्या मुखात, दोन चमचमीत आणि चांगले घास घातले. तरच तो, नव्या दमाने आणि जोमाने कामाला लागेल. हे गणित या महिलांना अगदी तंतोतंत माहित असतं.
एक गोष्ट इथे प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो.
गरीब घरातील मुलींना, दुर्दैवाने शिक्षण मिळत नसेल. पण त्याच मुली, घरातील इतर कामात बाकी महिलांना कधीच मागे सोडून देत असतात. हा, माझा स्वानुभ आहे.
आईच्या पट्टीत, आणि सुगरणीच्या भट्टीत ज्या मुली घरगुती मुदपाकखान्यात तयार झाल्या आहेत. त्यांच्या हातच्या जेवणाला, एक आगळी आणि वेगळीच चव असते. आणि, त्यामुळेच त्यांच्या स्वयपाकघरात सदैव अन्नपूर्णा सुद्धा नांदत असते. माझा मित्र निवडून आला, कि त्या ठराविक घरात मी नक्कीच जेवायला जाणार आहे. सोबत माझी सगळी मित्रमंडळी, आणि खुद्द भावी नगरसेवक फारूक इनामदार सुद्धा असतीलच.
कधीही रात्रपाळीला न थांबणारे..
आमचे एक रखवालदार कर्मचारी. परवा त्यांची दुपार पाळी संपल्यावर रिलिव्हर न आल्याने, त्यांना रात्रपाळी सुद्धा करावी लागली.
आजवर, आमच्या रात्रपाळीतील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या गप्पा चालू असायच्या. आपल्या ऑफिसमध्ये भूत आहे बरं का. आणि ते कधीही कोणालाही दिसू शकतं. त्यामुळे, स्वतःची सावली बघून घाबरणारे सुद्धा तिथे बरेच आहेत. तर परवा रात्रपाळी केल्यानंतर, ते रखवालदार काल पुन्हा दुपार पाळीला आहे होते.
आणि आल्याबरोबर, त्यांनी आम्हाला रात्रीची हकीकत सांगायला सुरवात केली.
लोकांच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नव्हता, पण.. या बिल्डिंगमध्ये खरोखर भूत आहे राव. काल रात्रपाळीत मला सुद्धा ते भूत दिसलं.
आता.. आम्ही सगळे दिवसपाळी वाली माणसं. आम्हाला त्याचं कितीसं गांभीर्य असणार आहे..?
तर, आमच्या ग्रुपमधील एक महिला कर्मचारी. त्या रखवालदाराला म्हणाल्या.
तुमचा " गण " कोणता आहे..?
( माणूस गण, किंवा देवगन असणाऱ्या व्यक्तींना भूत वगैरे दिसतं. अशी जुजबी माहिती त्या महिलेला होती. )
आता गंमत अशी झाली,
तो रखवालदार व्यक्ती त्याच्या कपाळावर देवपूजा केल्यावर नेहेमी देवाचा गंध लावत असतो. आणि त्याला वाटलं, त्या बाईंनी विचारलं आहे. कि, तुमचा गंध कोणता आहे..?
तर ते म्हणाले..
" नाही हो, आज बी आणि त्या दिवशी बी मी " गंध " लावलाच नव्हता..! "
नेमका काय विनोद झाला आहे, ते त्या रखवालदाराला काहीच समजलं नाही, पण त्यांच्या या वक्तव्यावर आम्ही मात्र पोट धरून हसत सुटलो होतो.
पूर्वी.. माझं, एक कटलरी दुकान होतं.
त्या दुकानात, मी प्रत्येक सिझनल आयटम्स विक्रीला ठेवायचो.
जसे कि..
दिवाळीत.. आकाश कंदील, राखी पौर्णिमेला राख्या, रास गरभा असेल तेंव्हा दांडिया, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये..
भोवरा, गोट्या आणि हिवाळ्यात पतंग सुद्धा मी विक्रीला ठेवायचो.
त्यातल्या त्यात, पतंग उडवण्याची मला भारी हौस, पण उभ्या आयुष्यात हा खेळ प्रकार मला काही जमलाच नाही. हजारो रुपयाच्या पतंग आणि मांजा मी माझ्या हाताने विकला असेल. पण.. त्याच हाताने, सफाईदारपणे पतंग काही मला उडवता आली नाही.
तिकडे काहीही असुध्यात, मला पतंग उडवायला येत नव्हती. पण माझ्याकडे असणाऱ्या अस्सल कागदी पतंग, आणि बरेलीचा मांजा खरेदी करण्यासाठी फार दूरदूरहून माझ्या दुकानात हौशी पतंगबाज यायचे. आणि त्यामुळे, आमच्या पंचक्रोशीत माझं चांगलच नाव झालं होतं..
पतंग का सामान लेनेका, तो पंडित भाई के पासीच..!
त्यावेळी, मी एक व्यावसाईक होतो. पण धंद्यात मी कधीही कोणालाही आणि कधीही फसवलं नाही. नकली माल देणं म्हणा, फाटक्या पतंग विकणं म्हणा, किंवा मांजा देताना दोनपाच आट्या चोरनं म्हणा. असली कामं मी कधीही केली नाहीत.
त्यामुळे, माझं दुकान बंद होऊन आता जवळपास वीसेक वर्ष तरी झाली असतील.
पण आजही, काही शौकीन भुले भटके पतंगबाज मित्र माझ्या दुकानाच्या बाजूच्या दुकानात येऊन विचारात असतात.
ये.. बाजूवाला पतंग का दुकान आज बंद है क्या..?
कारण, त्याकाळी पतंग उडवणारी मुलं. हवेच्या झोक्यावर आणि शिक्षणावर हुकुमत गाजवत. जोरदार फर्लांग मारून, पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वीदेशी निघून गेलेले होते.
आणि, पुन्हा फिरून त्याच गावात आणि स्वदेशात आल्यावर. त्यांना फक्त एकमेवाद्वितीय आणि प्रसिद्धीस पात्र ठरलेला " पंडित पतंगवालाच " आठवणार ना..!
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, आपला वर्ष भरातील पहिला भारतीय सन, म्हणजे,.
" मकर संक्रात "
देश विदेशात, संक्रातीत फार मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. गुजरात मध्ये तर, पतंग या खेळामध्ये या महिन्यात अक्षरशः करोडो रुपयांची विक्रीची उलाढाल होते.
पण.. माझ्या सर्व पतंग शौकीन मित्रांना माझं एकच सांगणं आहे. तुम्ही पतंग उडवा, आपले सन साजरे करा. पण.. फक्त आणि फक्त आपल्या देशी मांजानेच.
विनाकारण, " चायनिस मांजा " खरेदी करून तुम्ही पतंग उडवताल. आणि हकनाक, पक्ष्यांच्या किंवा माणसांच्या बळीला कारण ठरताल. तो चायनिस मांजा खूप वाईट आहे,
परवाच.. मी एका पक्षी मित्राकडून त्या चायनिस मांज्यामध्ये अडकलेल्या एका पक्षाची सुखरूप सुटका केली आहे. हा माझा अगदी ताजा अनुभव आहे.
तर.. सर्व भारतीयांनी मिळून हा सन अगदी जोरदार पद्धतीने साजरा करा,
पण.. देशी सन साजरे करत असताना.
फक्त स्वदेशी मालालाच प्राधान्य द्या. आणि, आपल्या भारतीय सणाचा आनंद आणखीन द्विगुणित करा..!
गुलाबी थंडी संपली,
आणि कडाक्याची बोचरी थंडी सुरु झाली.
तसे तर, मी शरीराचे जास्ती लाड करत नाही. पण कधी-कधी, आपल्या वयाचा अंदाज सुद्धा घ्यावा लागतोच कि. तर.. कधी नाही ते, परवा पासून मी कामावर जाताना आमचा खाकी रंगाचा सरकारी स्वेटर घालायला सुरवात केली. पायात शूज असतो, डोक्यावर हेल्मेट असतं. त्यामुळे म्हणावी अशी थंडी जाणवत नाही. सगळ्याची सगळी सोय झाली. पण, माझे हात रिकामे पडले ना..
बाईक चालवताना, गार वाऱ्याने माझे हात चांगलेच गारठत होते.
म्हणून.. काल, हातमोजे खरेदी करण्यासाठी मी एका दुकानात गेलो. तिथे, बऱ्याच प्रकारचे हातमोजे ठेवलेले होते. लेडीज आणि जेन्ड्स असे वेगवेगळे गठ्ठे तिथे रचून ठेवले होते.
पण त्या दुकानातील, एक गोष्ट काही माझ्या नजरेतून सुटली नाही.
पुरुषांचे हातमोजे बऱ्यापैकी विक्री झाले होते. त्यामानाने, महिलांचे हातमोजे दुकानात तसेच पडून होते. एकतर अशा बाबतीत महिला किती जागरूक असतात. ते मी तुम्हाला सांगायला नकोय. तर मग, महिलांचे हातमोजे विक्री का झाले नसतील..?
या प्रश्नाने मला पक्कं भंडावून सोडलं. शेवटी, माझ्या आवडीचे हातमोजे मी विकत घेतले. आणि, त्या दुकानदाराला विचारलं.
का हो शेटजी, महिलांचे हातमोजे विक्री होत नाहीत का..?
तर दुकानदार म्हणाला,
मुली, महिला शक्यतो बाईकवर नवऱ्याच्या किंवा बॉय फ्रेंडच्या पाठीमागे बसून जात असतात. तेंव्हा, त्यांच्या हाताला गारठा जाणवला. कि त्या, त्यांच्या नवऱ्याच्या किंवा बॉय फ्रेंडच्या जर्किनच्या खिशात त्यांचे दोन्ही हात घालून त्यांना घट्ट चिटकून बसतात.
त्यामुळे, सहसा कोणी महिला किंवा मुली हातमोजे विकत घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
आणि, हातमोजांपेक्षा..
जर्किन मधील शारीरिक मायेची ऊब कधीही सरसच कि हो..!
ऐन विशीत असताना, मी हा विनोद ऐकला होता. त्यावेळी, हा विनोद ऐकून मी खूप हसलो होतो. पाहूयात तुम्हाला हसू येतंय कि नाही.
एक सुखवस्तू त्रिकोणी कुटुंब असतं. आईवडील निवृत्तीचं जीवन व्यतीत करत असतात. तर त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न झालेलं असतं. सगळं घर अगदी गुण्यागोविंदाने नांदत असतं. या उभयतांच्या मुलाला.. एका ऋषी महाराजांनी, विशिष्ट काष्ठ औषधापासून बनवलेल्या काही गोळ्या दिलेल्या असतात. त्या गोळ्या सेवन केल्याने, ते दोघे नवरा बायको आजन्म चिरतरुण राहणार असतात. हि गोष्ट, त्या मुलाच्या वडिलांना समजते. पण मुलाला मिळालेली संजीवनी आपण कशी मागावी..? म्हणून, ते गप्प बसून असतात.
एके दिवशी.. कंपनीच्या कामाने तो मुलगा पाच सहा दिवसांकरिता बाहेरगावी जातो. तेथील काम उरकून तो जेंव्हा घरी येतो. घरात आल्याबरोबर, त्याला फक्त त्याची बायको दिसते.
आणि बघतो, तर घरामध्ये त्याचे आईवडील नसतात. तो तडक तसाच घरामध्ये जातो,
तर.. घरामध्ये, एक सुंदरशी दिसणारी अनोळखी महिला तिच्या मांडीवरील लहान मुलाला खेळवत बसलेली असते.
हा प्रकार पाहून, तो अगदी चक्रावून जातो. आणि त्याच्या बायकोला विचारतो.
आपल्या घरात, हि सुंदर दिसणारी महिला कोण आहे..?
त्यावर, त्याची पत्नी म्हणते..
ती, तुमची आई आहे..!
हे न पेलणारं उत्तर ऐकून, तो भलताच अवाक होतो. त्याची बायको म्हणते, ऋषी महाराजांनी चिरतरुण राहण्याच्या ज्या गोळ्या आपल्याला दिल्या होत्या. त्यातील, सासुबाईंनी एकदम दहा गोळ्या खाल्ल्या. आणि, त्यांना हे तरुणपण प्राप्त झालं.
त्यावर मुलगा म्हणतो..
पण, माझे पप्पा कुठे आहेत..?
त्यावर त्याची बायको म्हणते. तुमच्या पप्पांनी त्यातील एकदम वीस गोळ्या खाल्ल्या, त्यामुळे ते अगदी लहान बाळ होऊन बसले आहेत.
ते काय, तुमच्या आईच्या मांडीवर तुमचे पप्पाच आहेत..!
लग्नाळू मुलांसाठी एक मौलिक सल्ला..
लग्न करण्यासाठी, जेंव्हा तुम्ही मुलगी पाहायला जाल. त्यावेळी.. मुलीला, नाकी डोळा व्यवस्थितपणे पाहून तर घ्याच. सोबतच, काही शिक्षण किंवा तुम्हाला ईतर काही गोष्टी विचारायच्या असतील. तर, त्या सुद्धा तुम्ही विचारून घ्या. लग्नानंतर मुलीला बिलकुल दोष देऊ नये. पदरी पडलं आणि पावन झालं. अगदी असच वागावं. मुलीची पसंती झाल्यावर, कुंडली जुळल्यावर, तुमचं असं ठरलं.
कि आता.. तुम्हाला याच संभावित मुलीशी लग्न करायचं आहे..!
तेंव्हा, एक शेवटचा सोपस्कार तुम्ही नक्की पार पाडा, तो मी तुम्हाला सांगतो.
त्यावेळी तुम्ही, त्या नवरी मुलीच्या आईला पाहायला बिलकुल विसरू नका. त्या गर्दीमध्ये, मुलीची आई कोण आहे..? हे तुम्हाला माहित नसेल. तर, तशी आगाऊ माहिती काढून घ्या.
आणि, काहीही करून तुम्ही मुलीची आई नक्की पहाच.
कारण.. तिच्या आईमध्ये,
तुम्हाला, तुमची होणारी बायको " या वयात " गेल्यावर कशी दिसू शकेल.
 याची एक निर्व्याज्य झलक मिळून जाईल. आणि, ते महत्वाचं सुद्धा असतं बरं का. कारण आपणाला, वर्तमानापेक्षा भविष्याची चिंता फार सतावत असते..!
( हे गणित, अगदी तंतोतंत आहे बरं का. माझ्या निरीक्षणानुसार, या देखरेखी मध्ये, फक्त पाच दे दहा टक्केच फरक पडू शकतो..! )
तिरुपती बालाजी देवस्थानातील भयंकर लुटमार.
आणि, आशाळभूत कर्मचारीवर्ग
गतवर्षी, श्रीनिवास मंगापूरम येथून आम्ही सगळे मित्र पायी प्रवास करत तिरुमला सप्तगिरी पर्वतावर पोहोचलो. अवघ्या तास दिडतासात आमचा पायी प्रवास पूर्ण झाला होता. सगळ्याच मित्रांना चालायची सवय नव्हती. त्यामुळे, पायी चालून प्रत्येक मित्राला खूप थकवा आला होता.
रात्री दहा वाजता झोपल्यावर.. सकाळी आठ वाजेपर्यंत, कोणताच मित्र अंथरुणाच्या बाहेर पडला नाही. साधारण नऊ वाजेपर्यंत आमची सगळी आवराआवर झाली, नाश्ता पाणी उरकलं. काही मित्रांनी घरून आणलेले पारंपारिक वेश परिधान केले होते. तर काही मित्रांनी आपला रोजचा पेहेराव केला होता. आम्ही सगळे मित्र रुमच्या बाहेर पडलो. आणि मुख्य रस्त्यावर आलो.
रस्त्यारील सगळी लोकं, तेथील स्थानिक भाषा बोलत असल्याने, कोणाला जास्तीची विचारपूस करत न बसता. आम्ही एका जीप चालकाला थांबवून, त्या जीपमधून देवदर्शनासाठी पोहोचलो.
सर्वदर्शनमच्या मुख्य प्रवेशद्वाराला ओलांडत.. आम्ही फ्री दर्शन, ( सर्व दर्शन ) दिव्य दर्शन आणि त्याशेजारी असणाऱ्या तीनशे रुपयाच्या दर्शन बारीतून आतमध्ये प्रवेशित होणार. तितक्यात तेथील रखवालदाराने आम्हा चार पाच जणांना अडवलं. कारण, आम्ही पारंपारिक वेश परिधान केला नव्हता. मंदिरात दर्शनासाठी जाताना,
तेथील स्थानिक पेहेराव.. पुरुषांसाठी लुंगी, धोतर किंवा नेहरू शर्ट आणि पायजमा. आणि महिलांसाठी साडी, झंपर, परकर किंवा सलवार कुर्ता. याव्यतिरिक्त .. पेंट शर्ट, किंवा जीन्स टी शर्ट आणि लेगीस वगैरे घालून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही..
आम्ही चार मित्रांनी, दर्शन बारीतून बाहेर येत, तिथे विक्रीला असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या लुंग्या खरेदी केल्या. आणि चेंजिंग रुममध्ये जाऊन आम्ही त्या लुंग्या परिधान केल्या. एका पिशवीत आपापल्या प्यांटा ठेवून आम्हाला पुन्हा दर्शन बारीला जावं लागलं.
तोवर आमचे मित्र, आमची वाट पाहत देवस्थान मार्फत असणाऱ्या मोफत चहा, कॉफी, आणि मसाला दुधाचा आस्वाद घेत होते.
पहिल्या चेकिंग कौंटर वर, आमचे दर्शन पास तपासले गेले. दरवर्षी, ग्रुपमधील फक्त एका व्यक्तीचं ओळखपत्र पाहिलं जायचं. पण आता पुन्हा नियमावली बदलली आहे. इथून पुढे, दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी सरकारी ओळखपत्र असणं क्रमप्राप्त आहे.
झालं.. आम्हा पाच सहा जणांकडे ओळखपत्र नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला दर्शन बारीतून बाहेर यावं लागलं. आता पुन्हा रूमवर जाऊन आम्हाला ओळखपत्र आणावी लागणार होती. वेळ वाढत चालला होता, त्यामुळे जीप करून जाऊयात असं ठरलं. तर जीपवाला आम्हाला पाच जणांचे शंभर रुपये मागू लागला. त्यामुळे, आम्ही पुढे चालत निघालो.
तर आमच्यातील एक मित्र म्हणाला. मला तर वाटतय, त्या समोरील सर्कलच्या अलीकडे आपली रूम आहे. मला तर काहीच कळेना, सगळा भुलभुलैय्या रस्ता. आणि काय सांगायचं, पाचेक मिनीटाचं अंतर चालून गेल्यावर. समोरच आमची रूम होती.
आमच्या रूमपासून, दर्शन बारी अगदी हाकेच्या अंतरावर होती. पण त्या जीपवाल्याने आम्हाला विनाकारण लांबचा वळसा मारून मुद्दाम मंदिराच्या पलीकडच्या बाजूला आणून सोडलं होतं.
आणि आत्ता तर, रूम अगदी आमच्या समोर होती. तरीसुद्धा त्या जीप चालकाने आम्हाला पत्ता सांगण्याचं सौजन्य दाखवलं नाही. पर्यटकांची किती फसवणूक करावी. याला सुधा काही मर्यादा असतात हो. शेवटी, रूमवर जाऊन आमच्या पेंटी ठेऊन आमची ओळखपत्र घेऊन आम्ही पुन्हा एकदा दर्शनासाठी निघालो.
आणि, वेंकट रमणा गोविंदाच्या जयघोषात अवघ्या दीड तासात दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर सुद्धा आलो.
त्यानंतर, सर्व मित्रांचा लाडूचा प्रसाद घेण्यासाठी आमच्यातील एक मित्र गेला. सर्वांनी आपली कुपनं त्याच्याकडे दिली. एका कुपनवर चार लाडू मिळणार होते. असे अकरा व्यक्तींचे एकूण चव्वेचाळीस लाडू मिळायला हवे होते. पण तिथे सुद्धा ते लाडू देणारे कर्मचारी आपला गोंधळ करून सोडतात. त्यामुळे, त्या लाडू देणाऱ्या व्यक्तीने बरोबर दोन लाडूचा 'गाळा' केला. नंतर लाडू मोजल्यावर आम्हाला समजलं. प्रसादाचे दोन लाडू कमी आले आहेत. आणि, असे फसवणूक केलेले लाडू, बाहेर काळ्या बाजारात विकले जातात. याच वर्षी, आमच्या एक मित्राने सोळाशे रुपये मोजून वीस लाडू खरेदी केले.
हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे, देव तर देवळात दगड होऊन बसलाय हो. विनाकारण त्याला नावं ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. पण हाच देव, ज्या कामगारांची झोळी अगदी लाखो रुपयांनी भरत असताना. त्यांना लाचलुचपत करण्याची हि अवदसा का सुचावी..?
तेथील पुजार्यांना सुद्धा, अगदी लाखामध्ये पगार आहेत.
इतर कामाच्या ठिकाणी.. सगळीकडे, आठ तासाची ड्युटी असते. पण बालाजी देवस्थानच्या नाभिक (न्हावी ) कर्मचाऱ्यांना फक्त सहा तासांची ड्युटी आहे. का तर, सहा-सहा तासांच्या एकूण चार पाळ्या होतात. त्यामुळे, जास्तीत जास्ती लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. हे, त्याच्या मागचं खरं कारण आहे. या नाव्ह्यांना सुद्धा, त्याठिकाणी भरपूर पगार आहेत. तरी सुद्धा, केशवपन करायला आलेल्या भाविकांकडून हि लोकं पाच पन्नास रुपयाची मागणी करत असतात. आणि त्यांची मागणी पूर्ण केली नाही, तर त्या धारधार वस्तऱ्याने ते आपल्या डोक्याची केसं काढताना. निश्चितच आपल्या टकलावर दोनचार वार हमखास करतात.
हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यानंतर, मी कधीही त्याठिकाणी गेलो तर, त्या लोकांच्या हातात मी दहा वीस रुपये ठेवतोच.
यावेळी तर.. त्या न्हाव्याने अगदी कळसच केला. केस कापताना, मी त्याला दोन व्यक्तींचे पन्नास रुपये देऊ केले. तर.. नजरेची खून करून तो मला म्हणाला. बाहेर माझा व्यक्ती उभा आहे. त्याच्याकडे पैसे दे, इथे सीसी टीव्ही केमेरे बसवले आहेत. किती नालायकपणा म्हणायचा हा..!
कितीही भरभरून दिलं तरी, लोकांची झोळी काही भरत नाहीये. सगळं काही नश्वर आहे, हे माहित असताना सुद्धा मनुष्य हावरटपणा काही कमी करत नाहीये.
खरोखर, काही प्रश्नांना उत्तरं नसतात हे अगदी खरं आहे..!
त्या.. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोन कलाकारांचे सिनेमे मी अगदी लहान असल्यापासून पाहत आलोय. पण ते सिनेमे पाहताना मला अगदी मनापासून हसू आलं आहे. असं कधी घडलंच नाही. त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता.
म्हणून..व्हिडियो किंवा टीव्हीवर, म्हणजे फुकटात जे सिनेमे पाहायला मिळतील, ते गपगुमान पाहायचे. आणि, स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचं. हे अगदी ठरलेलं होतं.
त्याकाळी.. सोशल मिडिया नसल्याने, हि दोघं आणि तो " महागुरू " अडाणी लोकांचं फालतू मनोरंजन करून बक्कळ पैसा कमवून मोकळे झाले होते. आणि आजही कमवत आहेत.
असो, हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे.
पण त्या महेश कोठारेने, जवळजवळ त्याच्या प्रत्येक सिनेमात.. " इन्स्पेक्टर " ची भूमिका केली होती.
आणि, आता त्याचा मुलगा सुद्धा तोच कित्ता गिरवत आहे.
हो.. मी, त्या " शंभर दिवसा " बद्धलच बोलतोय..!
बापसवाई बेटा होतो, हे मला माहित होतं. पण, बाप करत होता किंवा करतोय.. तसच, बेट्याने सुद्धा अनुकरण करावं. हे आपल्याला बिलकुल पटलं नाही.
शेवटी काय आहे, तुम्हा आम्हाला वेड्यात काढून त्यांना पैसे कमवायचे आहेत. त्यामुळे, त्यांना या गोष्टीची काहीच फिकर नसते.
पण, आता नव्याने या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या त्या लक्षाच्या पोराला माझं एकच सांगणं आहे..!
मित्रा.. किमान, तू तरी " पोलीस " होऊ नकोस..!
तो.. भरत जाधव, कसाही असुधेत. पण त्याने हिंदी सिनेमात हरकाम्या म्हणून काम करणार नाही. अशी शप्पत घेतली. आणि आजही, तो त्याच्या शब्दावर ठाम आहे.
अभिनय.. तुझ्या, ती सध्या काय करते..!
या सिनेमासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. बेट्या, लोकांचा भ्रमनिरास करू नकोस रे..!
लक्षाने तुझं " अभिनय " नाव ठेवलं आहे. ते सार्थक करून दाखव.
आज, एका चौकात..
निधन झालेल्या व्यक्तीला, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्याचा फ्लेक्स लागला होता. माझं, त्या भागात काही काम चालू होतं. म्हणून, मी सुद्धा नेमका तिथेच उभा होतो. तितक्यात, त्या भागातील एक इच्छुक उमेदवार आणि त्याचा एक साथीदार तिथे आले.
तो इच्छुक उमेदवार,
त्या फ्लेक्स वरील फोटोकडे पाहून, दुक्खी अंतकरणाने नकारात्मक मान हलवत होता.
त्यावर, त्याच्या सोबत असणारा मित्र त्याला म्हणाला..
भाऊ, आपलं काही खास रिलेशन होतं का..?
तर.. तो इच्छुक उमेदवार म्हणाला.
सुरवातच बेक्कार झाली राव, आपलं एकदम हक्काचं मत होतं..! 
अवखळ चाल, तू पूर्ण करून घे आत्ता,
जवाणीच्या बहरावर, नाही कुणाचीच सत्ता.
तुझ्या ओठावरील तीळ, आज आहे तेजस्वी बिंदू,
उमर पुढे सरता, लोक त्याला हि लागतील निंदु.
पूर्वी आस्तिक होता..
पण हल्ली..देवाला न मानण्याचा विचार, चारचौघात स्पष्टपणे मांडणाऱ्या व्यक्तींची मते म्हणजे.
पूर्वी दर शनिवारी,
मारुतीच्या मस्तकावर केलेल्या तेल अभिषेकाच्या खर्चाची गोळाबेरीज करण्यासारखं झालं..!
संकल्प, जर पूर्णत्वाला जाणार नसतील.
तर " संकल्प " या शब्दाचा अवमान तरी का करावा..!
आजच्या दिवसाची काय खासियत असेल, ती मला माहित नाही.
पण, एरवी वर्षभर दारूला हात सुद्धा न लावणारा व्यक्ती, आज बाकी मद्याचे चशकं च्या चशकं रिचवत असताना आपल्याला पाहायला मिळतो.
खरं तर, दारूला नावं ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. परंतु काही लोकं अशी असतात.
" करून करून भागलो. आणि, देवपूजेला लागलो "
मला, अशा लोकांचा फार तिटकारा आहे. सुरवातीला, स्वतः चिक्कार ऐश करून बसलेले असतात. पण आजच्या दिवशी, ती लोकं सगळ्यांना उपदेशाचे डोस पाजयचं काही सोडणार नाहीत.
या सगळ्या वस्तू आपल्यासाठीच निर्माण केलेल्या असतात. पण त्याला मर्यादेत ठेवता आलं पाहिजे.
जगात निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूचा भोग हा घेतलाच पाहिजे, असा माझा अट्टाहास नाहीये. पण आवड असेल तर, कधीतरी थोड्याफार प्रमाणात आपलं शरीर सुद्धा आपल्याला सूट देत असतंच कि.
सो.. जास्ती धांगडधिंगा करू नका. हिशोबात घ्या, आपल्या घरात बसून एन्जॉयमेंट करा. आपल्या कुटुंबासमवेत, नव्या वर्षाचं स्वागत करा.
तरुण मुला मुलींनी, शक्यतो पब मध्ये वगैरे जायच्या भानगडीत पडू नका. आजचा दिवस फारच विचित्र असतो. आज, कोणाच्या वाट्याला काय लिहून ठेवलं असेल..? ते कोणालाही सांगता येत नाही. म्हणून थोडं आवरतं घ्या, आजच्या दिवशी तुम्हाला घराबाहेर नेणाऱ्या मित्र मैत्रिणींना शक्य तितकं टाळण्याचा प्रयत्न करा.
या वारुणीच्या विषयात, मी थोडा हौशी माणूस असल्याने.
कालच, एका फेसबुक मित्राने " अँटिक्युटि ब्लु " ची एक फुल बॉटल मला भेट म्हणून पाठवली आहे. तुम्ही काहीही म्हणा, पण या क्षेत्रात मी खरोखर नशीब घेऊनच आलो आहे. बरेच हौशी मित्र, मला आवर्जून काहीनाकाही भेटवस्तू पाठवत असतात. त्या सर्वांना एकदा, धन्यवाद मित्रहो..!
आता, मला ती बाटली कोणत्या मित्राने दिली..? असं म्हणून, त्या मित्राचं नाव विचारू नका. कारण, त्यांनी इथे नाव न लिहिण्याचं माझ्याकडून वचन घेतलं आहे.
चला तर मग, आता जास्ती वेळ दवडण्यात काहीच अर्थ नाहीये..!
चांगभलं मित्रहो..!
🌱🌲🌳🌴🌵🌾🌿🍀🍁🍂🍃

Like
Love
Haha
Wow
Sad
Angry
डोळ्यात आसवे थिजताना, मी फार त्रासतो.
तर, कोणी म्हणत होतं..
चकाकणाऱ्या नेत्रातही, तू फार छान दिसतो.
" माणुसकीची भिंत "
या सोशल मिडीयाचं एक बरं आहे.
इथे.. चांगलं, वाईट काहीही असो. त्याचा लगेच प्रसार आणि प्रचार होतो. सगळं काही ताबडतोब खपून जातं. फक्त, लोकांना कळायची खोटी असते. लगेच सगळी लोकं त्या बाजूने आपली जोरदार धाव घेऊ लागतात. त्याचं, एक साधं उदाहरण म्हणजे..
" माणुसकीची भिंत "
नागपूर आणि सोलापूर मधील एका विशिष्ट ठिकाणचा या आशयातील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल काय झाला.
आणि, बघता-बघता ते लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. परंतु एक साधी गोष्ट कोणीच ध्यानात घेतली नाही..!
पुण्या, मुंबई, नागपूर, सोलापूर सारख्या उच्च दर्जाच्या शहरात अशा प्रकारच्या भिंती निर्माण करून खरोखर सत्कार्य साध्य होणार आहे का..?
मला आठवतंय असं..
पूर्वी.. म्हणजे माझ्या लहानपणी, माझे वडील मला वर्षातून फक्त दोन वेळा नवीन कपडे घ्यायचे.
एकदा दिवाळी मध्ये, आणि.. एकदा शाळा सुरु होत असताना एकच गणवेश ते मला घ्यायचे. खरं तर, आता शाळामध्ये सुद्धा दोन तीन प्रकारचे वेगवेगळे गणवेश असतात. एक सुशिक्षितपणा म्हणा, किंवा जनमानसातील चंगळवाद फार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे असं म्हणा.
खरं तर, या सर्व गोष्टी या विषयाला कारणीभूत आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि, हे काही मी तुम्हाला नव्याने सांगायला नको आहे.
तर.. काही दिवसांपूर्वी, आमच्या भागात सुद्धा काही होतकरू मंडळींनी. एक सामाजिक आवड म्हणून, माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरु केला. खरं तर, त्यावेळी तिथे असलेला तो डामडौल पाहून, मला खूप हसू येत होतं. पण, मी मुद्दाम अशा गोष्टींकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करत असतो.
मला सांगा.. आज माझ्यासारखा जेमतेम कमाई असणारा सरकारी नोकर व्यक्ती सुद्धा, काहीतरी कारण शोधून दर महिन्याला एखादी नवीन प्यांट किंवा शर्ट खरेदी करत असतो. काहीच नाही तर, माझा मुलगा किंवा माझी बायको तरी काही छोटे मोठे कपडे नक्कीच खरेदी करत असतात.
हि झाली माझ्या घरची गोष्ट,
पण.. या पुण्यात मी अशी लोकं सुद्धा पाहिली आहेत. कि जे, अगदी प्रत्येक हफ्त्याला शॉपिंगच्या नावाखाली भरमसाठ नवनवीन कपडे खरेदी करत असतात.
जमाना बदलत चालला आहे, तशा नवनवीन फेशन सुद्धा येतात, तसा कपड्यांचा ट्रेंड सुद्धा बदलत राहतो. आणि नेमक्या अशा लोकांना, हि माणुसकीची भिंत फार प्रिय वाटू लागली.
तर त्यात, नवल ते कसलं..?
आमच्या येथील, माणुसकीच्या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी..
त्याठिकाणी, जुन्या कपड्यांचा अगदी खच पडला होता. सगळी लोकं अगदी रांगा लाऊन घरातील जुने कपडे तिथे आणून देत होते. त्या उपक्रम करत्यांचे लोकं खूप कौतुक करत होते. कोणी त्यांची मुलाखत घेत होते, तर कोणी त्यांच्या समवेत फोटो काढून घेत होते. पण त्याठिकाणी, ते जुने कपडे घेणारा एकसुद्धा व्यक्ती तिथे हजर नव्हता.
माझ्या माहितीप्रमाणे, जेमतेम आठवडाभर हा धुमाकूळ चालू होता.
त्यानंतर, मला त्या माणुसकीच्या भिंती शेजारी एक सुद्धा माणुसकी असलेला माणूस फिरकलेला दिसत नव्हता. बहुतेक, सर्व लोकांनी आठवडाभरात आपल्या घरातील अडगळीत पडलेली आणि अडगळ असलेली सगळी कपडे तिथे आणून टाकली होती. खुद्द, त्या उपक्रमाचे प्रायोजक सुद्धा मला त्या ठिकाणी दिसत नव्हते.
आणि एके दिवशी..
मी कामावरून घरी येत असताना, त्या माणुसकीच्या भिंती शेजारी एक व्यक्ती मला दिसला. रात्रीचे आठेक वाजले असावेत, तर तो मनुष्य त्या अंधाऱ्या ठीकाणी जमा झालेल्या कपड्यातून काही चांगली आणि ठीकठाक कपडे आहेत का ते शोधत होता.
आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून..
मोडीवर भांडी..ssssss अशी आरोळी देत गल्लोगल्ली फिरणारा एक व्यवसायिक व्यक्ती होता. त्या लोकांचा हा पारंपारिक व्यवसाय आहे. लोकांच्या घरातील जुनी कपडे घ्यायचे. आणि त्याच्या बदल्यात त्यांना, स्टील किंवा प्लास्टिकच्या वस्तू परतावा म्हणून द्यायच्या.
तर, त्याठिकाणी तो व्यक्ती खूप चाचपत होता, आणि, त्या माणुसकीच्या भिंती शेजारी त्या व्यक्तीला रग्गड 'माल' सुद्धा मिळाला होता. तो सगळा माल, त्याने त्याच्या पोत्यात भरला होता. कारण, तो व्यक्ती खरोखर याचक आहे कि व्यवसायिक..?
हे पाहायला.. त्याठिकाणी कोणताच आयोजक, संयोजक किंवा कार्यकर्ता हजर नव्हता.
जाऊदेत, त्या व्यक्तीचं सुद्धा हातावरील पोट आहे. त्यांनी तेथील कपडे नेले याबद्धल मला राग वगैरे नाहीये.
पण.. उदार मनाच्या लोकांनो, कोणत्या गोष्टी कुठे कराव्यात याचं तुम्ही काही तरी भान ठेवा..!
फक्त, प्रसिद्धीला हापापून मनाला वाटेल ते कार्य करण्यात काय अर्थ आहे..?
ज्यांना खरोखरच देशाची किंवा समाजाची सेवा करायची आहे.
ती लोकं, मेळघाट आणि आदिवाशी पाड्यात केंव्हाचे जाऊन पोहोचले आहेत. जमल्यास, तुम्ही अशा लोकांशी संपर्क साधा. किंवा अशा कोणत्या सामाजिक संस्था आहेत, त्यांची माहिती उपलब्ध करून घ्या.
अशाने, तुमचे उपक्रम कामी सुद्धा येतील. आणि ते योग्य रीतीने मार्गी सुद्धा लागतील.
विनाकारण, फालतू शो शायनिंग करण्यात आपला अमुल्य वेळ खर्ची घालून काहीच उपयोग नाहीये.
आणि खरोखरच, तुम्हाला या देशातील गरीब जनतेची काळजी किंवा कळकळ वाटत असेल.
तर.. विदेशात ती लोकं करतात त्याप्रमाणे,
तुम्ही सुद्धा, तुमच्या घरातील तुम्हाला अडगळ वाटत असलेल्या वस्तू,..
उदाहरणार्थ.. तुमच्या घरातील जुन्या वस्तू,
जसे..
फ्रीज, टीव्ही, कपाट, रेडियो, टेपरेकॉर्डर, भांडी, ब्लांकेट, बूट, चप्पल..
आणि, त्याचबरोबर तुमचे आवडते जुने कपडे सुद्धा.
आपल्या घरासमोरील, " माणुसकीच्या " दरवाजात ठेवायला तुम्ही सुरवात करा.
खरोखर, ज्या व्यक्तीला त्या गोष्टीची आवश्यकता असेल. तर तो व्यक्ती, विनासंकोच त्या वस्तू त्याच्या घरी घेऊन जाईल. कालांतराने, हे लोन संपूर्ण गावात, शहरात पोहोचेल. प्रत्येक व्यक्ती हिरीरीने कामाला लागेल. आपल्या घरातील जुन्या वस्तूंचा योग्य उपयोग होईल.
आणि नाहीच जमलं तर, एक आठवडाभर वाट पहा.
काळजी कशाला करायची, नाहीतरी.. महापालिकेची कचर्याची गाडी आपल्या दिमतीला असतेच कि.
तुम्ही सुरवात तर करा हो,
पण.. चुकुनही माणुसकीच्या नावाखाली अशा गोष्टींचा तुम्ही कुठेही कुठेही गवगवा करू नका. किंवा तशा आशयाचं श्रेय लाटायचं काम तुम्ही करू नका.
माझ्या अंगात, अजूनही माणुसकी शिल्लक आहे. किमान, याचं तरी प्रदर्शन तुम्ही नक्कीच करू नका. जमल्यास असं काही तरी करून दाखवा. ज्याचा, तुम्हाला आणि आपल्या समाजाला नक्कीच काहीतरी फायदा होईल.
हल्ली बाजारात, फारच वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन आणि आकर्षक बाईक्स आल्या आहेत.
काल रस्त्यावर मी पाहिलेली ती बाईक कोणत्या कंपनीची होती. ते मला माहित नाही. पण त्या बाईकची बैठक व्यवस्था मला फारच विचित्र वाटली.
बाईक चालक, अगदी खड्ड्यात बसल्या सारखा वाटतो. आणि त्याच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती अगदी उंच टेकाडावर बसल्या सारखी, आणि अगदी उठून दिसते.
काहीवेळा, अशा बाईक्स वर..
प्रेमी युगुल स्वार झालेलं असतं, त्यावेळी त्या बाईकवर पाठीमागे बसलेली मुलगी. त्या मुलाला अगदी चिकटून बसलेली असते. अशावेळी तो प्रसंग पाहात असताना..
ती मुलगी,
अगदी त्या मुलाच्या " बोकांडीवर " बसल्यासारखाच मला भास होतो..!
😀