Saturday, 28 January 2017

त्या.. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोन कलाकारांचे सिनेमे मी अगदी लहान असल्यापासून पाहत आलोय. पण ते सिनेमे पाहताना मला अगदी मनापासून हसू आलं आहे. असं कधी घडलंच नाही. त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता.
म्हणून..व्हिडियो किंवा टीव्हीवर, म्हणजे फुकटात जे सिनेमे पाहायला मिळतील, ते गपगुमान पाहायचे. आणि, स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचं. हे अगदी ठरलेलं होतं.
त्याकाळी.. सोशल मिडिया नसल्याने, हि दोघं आणि तो " महागुरू " अडाणी लोकांचं फालतू मनोरंजन करून बक्कळ पैसा कमवून मोकळे झाले होते. आणि आजही कमवत आहेत.
असो, हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे.
पण त्या महेश कोठारेने, जवळजवळ त्याच्या प्रत्येक सिनेमात.. " इन्स्पेक्टर " ची भूमिका केली होती.
आणि, आता त्याचा मुलगा सुद्धा तोच कित्ता गिरवत आहे.
हो.. मी, त्या " शंभर दिवसा " बद्धलच बोलतोय..!
बापसवाई बेटा होतो, हे मला माहित होतं. पण, बाप करत होता किंवा करतोय.. तसच, बेट्याने सुद्धा अनुकरण करावं. हे आपल्याला बिलकुल पटलं नाही.
शेवटी काय आहे, तुम्हा आम्हाला वेड्यात काढून त्यांना पैसे कमवायचे आहेत. त्यामुळे, त्यांना या गोष्टीची काहीच फिकर नसते.
पण, आता नव्याने या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या त्या लक्षाच्या पोराला माझं एकच सांगणं आहे..!
मित्रा.. किमान, तू तरी " पोलीस " होऊ नकोस..!
तो.. भरत जाधव, कसाही असुधेत. पण त्याने हिंदी सिनेमात हरकाम्या म्हणून काम करणार नाही. अशी शप्पत घेतली. आणि आजही, तो त्याच्या शब्दावर ठाम आहे.
अभिनय.. तुझ्या, ती सध्या काय करते..!
या सिनेमासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. बेट्या, लोकांचा भ्रमनिरास करू नकोस रे..!
लक्षाने तुझं " अभिनय " नाव ठेवलं आहे. ते सार्थक करून दाखव.

No comments:

Post a Comment