'पाऊस ' .... त्याचं येनच मुळी, अगदी धसमुसळं असतं. वादळ, वारा, ढगांचा गडगडाट... आणि, विजेच्या कडकडाटासहित. बहुतेक.. बऱ्याच दिवसांच्या विरहानंतर, या 'धरतीला' भेटण्यासाठी. त्याचं मन, आसुसलेलं असावं. जसा.. एखादा प्रियकर,आपल्या प्रेयसीला बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर. देहभान विसरून, तिच्यावर तुटून पडतो. प्रेमाचा 'वर्षाव' करतो. अगदी तसाच....!
No comments:
Post a Comment