Saturday, 28 January 2017

कधीही रात्रपाळीला न थांबणारे..
आमचे एक रखवालदार कर्मचारी. परवा त्यांची दुपार पाळी संपल्यावर रिलिव्हर न आल्याने, त्यांना रात्रपाळी सुद्धा करावी लागली.
आजवर, आमच्या रात्रपाळीतील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या गप्पा चालू असायच्या. आपल्या ऑफिसमध्ये भूत आहे बरं का. आणि ते कधीही कोणालाही दिसू शकतं. त्यामुळे, स्वतःची सावली बघून घाबरणारे सुद्धा तिथे बरेच आहेत. तर परवा रात्रपाळी केल्यानंतर, ते रखवालदार काल पुन्हा दुपार पाळीला आहे होते.
आणि आल्याबरोबर, त्यांनी आम्हाला रात्रीची हकीकत सांगायला सुरवात केली.
लोकांच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नव्हता, पण.. या बिल्डिंगमध्ये खरोखर भूत आहे राव. काल रात्रपाळीत मला सुद्धा ते भूत दिसलं.
आता.. आम्ही सगळे दिवसपाळी वाली माणसं. आम्हाला त्याचं कितीसं गांभीर्य असणार आहे..?
तर, आमच्या ग्रुपमधील एक महिला कर्मचारी. त्या रखवालदाराला म्हणाल्या.
तुमचा " गण " कोणता आहे..?
( माणूस गण, किंवा देवगन असणाऱ्या व्यक्तींना भूत वगैरे दिसतं. अशी जुजबी माहिती त्या महिलेला होती. )
आता गंमत अशी झाली,
तो रखवालदार व्यक्ती त्याच्या कपाळावर देवपूजा केल्यावर नेहेमी देवाचा गंध लावत असतो. आणि त्याला वाटलं, त्या बाईंनी विचारलं आहे. कि, तुमचा गंध कोणता आहे..?
तर ते म्हणाले..
" नाही हो, आज बी आणि त्या दिवशी बी मी " गंध " लावलाच नव्हता..! "
नेमका काय विनोद झाला आहे, ते त्या रखवालदाराला काहीच समजलं नाही, पण त्यांच्या या वक्तव्यावर आम्ही मात्र पोट धरून हसत सुटलो होतो.

No comments:

Post a Comment