Saturday, 28 January 2017

सुरवातीच्या काळात..
माझ्या डीपीवर, मी माझा स्वतःचा फोटो ठेवत नसायचो.
त्यामागे कारण एकच, आपल्या फोटोपेक्षा इतर सिने कलावंतांचे फोटो ठेवले. तर त्यानिमित्ताने कोणीतरी, त्यांची खास आठवण किंवा माहिती नक्की सांगायचं. आणि त्या माहित्या वाचून, माझा आणि इतर मित्रांचा दिवस सुद्धा अगदी रंगीन असा जायचा. हा त्यामागचा एकमेव आणि मुळ उद्देश होता. आणि, हे डीपी चेंज प्रकरण.. मी अगदी, दर आठवड्याला आणि ते सुद्धा रविवारी मध्यरात्री १२ वाजता करायचो. तरी सुद्धा, त्या मध्यरात्री माझ्या मित्रांच्या त्यावर खूप उड्या पडायच्या.
त्याच बरोबर, माझं गुलछबू लिखाण वाचून, बरेच मित्र मैत्रिणी माझ्या लेखनाचे अगदी दिवाने आणि चाहते झाले होते. आता, सगळ्यात मोठी गडबड हि होती..
कि.. हा, " पंडीत पॉटर " म्हणवणारा व्यक्ती. नेमका स्त्री आहे कि पुरुष..?
कारण, या माध्यमात सुरवातीच्या काळात मी माझी कोणतीच ठोस माहिती इथे ठेवली नव्हती. पण ज्या लोकांनी, माझी सगळी वॉल चाळली होती. त्यात त्यांना, माझा आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो सुद्धा पाहायला मिळाला होता. पण.. हे, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांसाठी मर्यादित होतं. हे सगळं करण्यामागे कारण एकच होतं,
 मला इथे बिनधास्त वावरायचं होतं. माझ्या मनाप्रमाणे मनमोकळं लीखाण करायचं होतं. मला माझ्या लिखाणात, कोणाचाही अडसर किंवा सल्ला नको होता,
परंतु.. हे सगळं करत असताना, मला कोणालाही फसवायचं नव्हतं, हे सर्वात मुख्य आणि खरं कारण होतं बरं का..!
तर त्यावेळी.. माझ्या लिखाणावर फिदा होऊन, पुण्यातील आणि पुण्याबाहेरील बऱ्याच उच्चभ्रू मित्रांनी माझ्या भेटीसाठी मला गळ घातली होती.
मी तर अगदी साधाभोळा माणूस,
मला कोणाचं मन मोडावंसं वाटायचं नाही. पण माझ्या मनात थोडी भीती असायचीच. कि, मी पुणे महापालिकेतील एक साधा ड्रायव्हर मनुष्य आहे. आणि, मला भेटायला येणारी व्यक्ती तर अगदी मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे.
पण.. मला भेटायला येण्यापूर्वी त्यातील काही लोकांनी माझी माहिती काढत मला विचारलं होतं.
कि.. तुम्ही स्त्री आहात कि पुरुष, आणि तुम्ही काय आहात आणि नेमकं काय आणि कुठे काम करता..?
आजवर.. या माध्यमात मी कधीही आणि कोणाशीही खोटं बोललो नाही. त्यामुळे, त्या संभाव्य व्यक्तींना मी माझी खरी आहे ती सगळी माहिती पुरवली होती.
पण त्यावेळी.. अनपेक्षित अशा दोनतीन वाईट घटना घडल्या,
माझी खरीखुरी माहिती वाचून. मला वेळ देऊन भेटायला येणाऱ्या व्यक्ती, पुण्यात येऊन किंवा पुण्यात असून सुद्धा प्रत्यक्ष मला न भेटता. आणि, दुसऱ्याच कोणालातरी भेटून त्या परस्पर निघून गेलेल्या असायच्या. मी मात्र, संपूर्ण दिवस त्यांच्या फोनची वाट पाहत असायचो.
आणि, त्या व्यक्ती परत स्वगृही गेल्यावर. त्यांनी टाकलेल्या, पोस्टवरून मला ते समजून यायचं.
कि हा व्यक्ती पुण्यात येऊन किंवा असून मला न भेटता दुसऱ्याच कोणाला तरी भेटून निघून गेला आहे. परंतु, या गोष्टीचा मी कधीही राग मानला नाही. आणि, कोणालाही त्याचा जाब सुद्धा विचारला नाही.
पण त्या वेळचं ते संभाव्य स्टेटस वाचून.. मी मात्र फार दुक्खी व्हायचो.
पण काय आहे,
शेवटी.. हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि निवडीचा विषय आहे.
परंतु.. असं दोनतीनदा घडल्या नंतर, मला कोणाला म्हणजे अगदी कोणालाच भेटावंसं वाटत नव्हतं. आणि आजही, मला या भेटीगाठी अगदी नकोशा वाटतात. तरी सुद्धा, त्यातल्या त्यात मी माझ्या बऱ्याच मित्रांना विनासंकोच भेटलो आहे. मग त्यात सगळ्या प्रकारचे मित्र आणि मैत्रिणी सुद्धा आल्याच. मी बाकी सगळ्यांना अगदी एकसमान मानतो. त्यात कोणताही भेदभाव ठेवत नाही. पण त्याचबरोबर, या माध्यमात मला काही अशा व्यक्ती सुद्धा भेटल्या, कि ज्या माझ्यापेक्षा अगदी उच्च पदावर कार्यरत होत्या.
पण, भुतोनभविष्यती मला भेटताच.. त्यांनी अगदी माझे चरणस्पर्श सुद्धा केले आहेत..!
तर काही अनोळखी मित्रांनी मोठमोठ्या भेटवस्तू पाठवून मला आश्चर्याचे सुखद धक्के सुद्धा दिले आहेत. शेवटी नाण्याला दोन बाजू अस्ततातच. हि सगळी, त्या सरस्वतीची ताकत आणि किमया होती, कारण..माझ्या लेखणीत तेवढी कमाल होती. त्यामुळे, या माध्यमात दुटप्पी भूमिका बजावणाऱ्या लोकांना मी नेहेमी टाळत असतो. आता तर, सरावाने मला सगळं काही अगदी ताबडतोब समजतं. कोण काय आहे आणि कोण काय नाहीये..!
या फेसबुक वरील मैत्रीला, नक्कीच आभासी म्हणता येणार नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे हि नक्कीच एक " मायावी " दुनिया आहे. यात माझं बिलकुल दुमत नाही..!
कोण आपला, आणि कोण तुपला..?
याचा, तुम्हाला इथे कधीच आणि उभ्या जन्मात थांगपत्ता लागणार नाही..!
हे सगळं लिहून, मी स्वतःला खूप ग्रेट वगैरे समजतोय अशातला भाग नाहीये, फक्त.. बरेच दिवस झाले, काही मनातलं लिहायचं राहून जात होतं.
हवं तर.. आज, ते सगळं काही लिहिण्याचा योग जुळून आला असं म्हणा.
धन्यवाद मित्रहो..!

No comments:

Post a Comment