माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीला, एक खूप घाण सवय होती.
तो कोणत्याही लग्न समारंभात गेला. कि जाताना, सोबत भरपूर पैसे घेऊन जायचा. नाही म्हंटल तरी, एकावेळी त्याच्याकडे तीस चाळीस हजार रुपये तरी नक्कीच असायचे.
त्या नोटांच्या बंडल मध्ये,
सर्वात खाली हजाराच्या लाल नोटा, त्यावर पाचशेच्या हिरव्या नोटा, आणि नंतर.. शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपये. असा त्या नोटांचा व्यवस्थित क्रम लावलेला असायचा.

प्रत्येक कार्यक्रमात.. पुढे-पुढे आणि मोठेपणा करायची याला भारी हौस. एखाद्या लग्नात किंवा कार्यक्रमात चुकून काही काम निघालं. आणि, छोट्या मोठ्या खरेदीकरिता याला कोणी पैसे मागितले. कि, चार लोकांसमोर हा तो नोटांचा मोठा बंडल खिशातून बाहेर काढायचा. आणि, अगदी मोजून त्यातील दहा वीस किंवा पन्नास शंभर रुपये तो काढून द्यायचा. आणि, नोटा देताना किंवा तो नोटांचा बंडल खिशातून बाहेर काढताना, आपल्याकडे कोण-कोण पाहत आहे. त्याची सुद्धा, तो चाचपणी करायचा. जसा काही, हा एकटाच जहागीरदार असावा.
परवा मी असंच एका लग्नात गेलो होतो. तर, हा " बंडलबाज " गडी सुद्धा नेमका त्या लग्नात आला होता. आणि, थोड्याफार फरकाने त्या दिवशी सुद्धा शेवटी तो प्रसंग घडलाच.
त्याच्या बायकोने, चार लोकात त्याला काही पैसे मागितले. माझं याच्याकडे अचूक लक्ष होतं. त्याने आजूबाजूला पाहत, खिशात हात घातला. आणि, फक्त शंभर रुपयाची एक नोट त्याने बाहेर काढली. आणि, त्याच्या बायकोच्या हातात दिली.
ती नोट घेऊन त्याची बायको तर निघून गेली. पण मला कुठे राहवतय. त्याला त्याची जागा दाखवायची आलेली सुवर्णसंधी मी कसा दवडेल. मी तडक त्याच्या जवळ गेलो, आणि त्याला म्हणालो.

आता तुम्ही, खिशात नोटांचा मोठा बंडल ठेवत नाही का..?
तर म्हणाला, नाय ना ओ.. ह्या नोटांच्या बंदीमुळे खिशात आता पैसाच नसतो बघा. बँकेत सुद्धा पैसे मिळेनासे झालेत. उगाच शेपाचशे रुपये खिशात ठेवावे लागतात. पहिल्या सारखी आता मजाच नाही उरली बघा..!
मला तर, तो मनुष्य फार दुक्खी वाटत होता. कारण, कोणाला कसला नाद जडला असेल. त्याचं काही सांगता येत नाही. तिकडे काहीही असुध्यात, पण त्याची चारचौघात मोठेपणा मिरवायची सवय आता तुटली आहे.

तो सुद्धा आता, थोडासा माणसात आला आहे..!
No comments:
Post a Comment