Saturday, 28 January 2017

गुलाबी थंडी संपली,
आणि कडाक्याची बोचरी थंडी सुरु झाली.
तसे तर, मी शरीराचे जास्ती लाड करत नाही. पण कधी-कधी, आपल्या वयाचा अंदाज सुद्धा घ्यावा लागतोच कि. तर.. कधी नाही ते, परवा पासून मी कामावर जाताना आमचा खाकी रंगाचा सरकारी स्वेटर घालायला सुरवात केली. पायात शूज असतो, डोक्यावर हेल्मेट असतं. त्यामुळे म्हणावी अशी थंडी जाणवत नाही. सगळ्याची सगळी सोय झाली. पण, माझे हात रिकामे पडले ना..
बाईक चालवताना, गार वाऱ्याने माझे हात चांगलेच गारठत होते.
म्हणून.. काल, हातमोजे खरेदी करण्यासाठी मी एका दुकानात गेलो. तिथे, बऱ्याच प्रकारचे हातमोजे ठेवलेले होते. लेडीज आणि जेन्ड्स असे वेगवेगळे गठ्ठे तिथे रचून ठेवले होते.
पण त्या दुकानातील, एक गोष्ट काही माझ्या नजरेतून सुटली नाही.
पुरुषांचे हातमोजे बऱ्यापैकी विक्री झाले होते. त्यामानाने, महिलांचे हातमोजे दुकानात तसेच पडून होते. एकतर अशा बाबतीत महिला किती जागरूक असतात. ते मी तुम्हाला सांगायला नकोय. तर मग, महिलांचे हातमोजे विक्री का झाले नसतील..?
या प्रश्नाने मला पक्कं भंडावून सोडलं. शेवटी, माझ्या आवडीचे हातमोजे मी विकत घेतले. आणि, त्या दुकानदाराला विचारलं.
का हो शेटजी, महिलांचे हातमोजे विक्री होत नाहीत का..?
तर दुकानदार म्हणाला,
मुली, महिला शक्यतो बाईकवर नवऱ्याच्या किंवा बॉय फ्रेंडच्या पाठीमागे बसून जात असतात. तेंव्हा, त्यांच्या हाताला गारठा जाणवला. कि त्या, त्यांच्या नवऱ्याच्या किंवा बॉय फ्रेंडच्या जर्किनच्या खिशात त्यांचे दोन्ही हात घालून त्यांना घट्ट चिटकून बसतात.
त्यामुळे, सहसा कोणी महिला किंवा मुली हातमोजे विकत घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
आणि, हातमोजांपेक्षा..
जर्किन मधील शारीरिक मायेची ऊब कधीही सरसच कि हो..!

No comments:

Post a Comment