परवा काही कामासाठी मी एका सरकारी इस्पितळात गेलो होतो..
पाहतो तर, तिथे..बावीस तेवीस वर्षाचा एक मुलगा पोट धरून स्ट्रेचरवर बसून होता. जिवाच्या आकांताने ओरडत होता, आणि, बघता-बघता एक मोठी उचकी देत, त्या मुलाने.. काळ्या निळ्या रक्ताची एक फार मोठी उलटी केली. बापरे.. हा प्रकार पाहून, मी पुरता घाबरून गेलो.
तो मुलगा डॉक्टरांना हात जोडून विनंती करत होता. डॉक्टर माझी काहीएक चूक नाहीये हो. मला खूप तहान लागली होती. मी फक्त पाणी पिलो, वाचवा हो मला.. यात माझी काहीएक चूक नाहीये. येवढं बोलून, त्याने आणखीन एक रक्ताची उलटी केली. आणि काकुळतीने हात जोडून डॉक्टरांना तो पुन्हा विनंती करू लागला. त्याच्या जीवाची होणारी तळमळ मला अक्षरशः पाहवत नव्हती.

हे सगळं पाहून, तिथे ड्रायव्हर म्हणून कामाला असणारा माझा मित्र डॉक्टरांना म्हणाला. भाऊसाहेब.. त्याच्यावर काहीतरी उपचार करा हो. खूप त्रास होत असेल त्याला.
त्यावर डॉक्टर म्हणाले.. बरेच उपचार केलेत, पण आता काहीही होऊ शकणार नाहीये. खूप वेळ होऊन गेला आहे, तासाभरात त्याच्या डोळ्यातून, कानातून आणि नाकातून सुद्धा रक्त येऊ लागेल. आणि,फारच दुःखी अंतकरणाने ते म्हणाले..

उद्या सकाळी, तुम्हाला त्याची डेड बॉडी घेऊन जावं लागणार आहे..!
एका इमारतीत असणाऱ्या फ्ल्याट मध्ये, रिन्युएशनचं काम चालू होतं. हा इलेक्ट्रिकल की दुसरं काहीतरी काम करणारा मुलगा. उन्हातून थकून भागून तिथे काम पाहण्यासाठी गेला होता.
काम पाहिलं, हिशोब ठरला, तहान लागलीय म्हणून.. तिथे असणाऱ्या प्लास्टिकच्या बाटली मधील पाणी तो घटाघटा प्याला. सुरवातीला त्याला काहीच कळलं नाही.

कारण.. काही प्रकारचं ऍसिड सुद्धा अगदी पाण्यासारखंच दिसतं..!
काही समजे पर्यंत.. एक दोन घोट त्याच्या पोटात गेले. आणि शेवटी व्हायचं तेच झालं.. तो मुलगा जे काही पिला होता, ते पाणी नव्हतं.. त्या घरात काही कामासाठी आणलेलं, ते ऍसिड होतं.
तो मुलगा सुद्धा डोक्यात कमी होता की काय, काय माहिती. त्याला थोडं तरी समजायला हवं होतं. पण म्हणतात ना, होनी को कौन टाल सकता है..!!

पूर्वी हेच ऍसिड विशिष्ट प्रकारच्या जाडसर काचेच्या बाटलीत यायचं.
पण आजच्याला, जास्तीचा दोन पैसे नफा कसा होईल, हा विषय ध्यानात घेऊन. व्यापारी मंडळींनी ते ऍसिड आता प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये विकायला सुरवात केली आहे. आणि तेंव्हापासून हे जीवघेणे प्रकार घडू लागले आहेत. पाण्याची बाटली आणि ऍसिडची बाटली, यामधील फरकच समजेनासा झालाय. या प्रकारामुळे, आजवर असे किती जीव गेले असतील त्याची गनती नसेल.

दुनियेने काहीही करुध्यात..कमी गुंतवणुकीत जास्ती पैसे कमावण्यासाठी लोकं अगदी वेडीपिशी झाली आहेत. कोणाचं कोणाला पडलं नाहीये. परंतु, आपण मात्र सतर्क राहिलं पाहिजे.
माहिती नसलेल्या ठिकाणी, माहिती नसलेल्या बाटली मधील पाणी कधीही पिऊ नका. मोजक्या आणि शक्यतो ब्रांडेड कंपन्याच्या आणि खात्रीच्या दुकानातूनच पाण्याच्या बाटल्या विकत घेत चला. त्यांचं सील अवश्य तपासून पहा, नाहीतर.. आपल्या घरातील पाणी सोबत ठेवत चला. हे नियम जर तुम्ही पाळले नाहीत.
तर.. तुमच्या हातात, पाण्याच्या नावाखाली..

कदाचित, ते ऍसिड सुद्धा असू शकतं..!!
हे सगळं का घडलं, कसं घडलं, कोणामुळे घडलं.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसण्यात आता काहीच अर्थ नाहीये. भारतात फार मोठा जन्मदर, आणि.. मृत्युदर तर अगदी स्वस्त आहे.
फक्त एवढी एकच दक्षता घ्यायची आहे. त्यात आपण भरडलं जाऊ नये याची काळजी घ्या. स्वतः सतर्क राहा, आणि इतरांना सतर्क करा. या घटनेतून हा एकमेव बोध आपण घेतला पाहिजे..!!

( पोस्ट शेअर करण्यासाठी परवानगीची गरज नाही. हि पोस्ट जमेल तितकी, आणि.. जास्तीत जास्त शेअर करा. मानवी जीव वाचवायला सहकार्य करा. )
No comments:
Post a Comment