फार जुनी गोष्ट आहे...
माझ्या कामातल्या एका ओळखीच्या व्यक्तीला इंग्रजी असं बिलकुल येत नव्हतं. पण त्याच्याकडे, भारीतला मोबाईल मात्र होता. तो जर चुकून, माझ्या सोबत असला. आणि, त्याने कोणाला फोन लावला. आणि, काही कारणास्तव तो फोन समोरच्या व्यक्तीला लागला नाही. म्हणजे एंगेज असल्यावर.. त्याला, इंग्रजीमध्ये असणारी एक विशिष्ट टेप ऐकू यायची. आणि, ते काही त्याला समजायचं नाही.
शेवटी... तो मोबाईल माझ्या हातात द्यायचा आणि म्हणायचा..

बघ रे, ती बाई काय म्हणतीय..?
मग मी त्याला सांगायचो. ती बाई असं म्हणतेय, कि.. तो माणूस, आता दुसऱ्या कॉलवर व्यस्थ आहे. किंवा, आता तो रेंजमध्ये नाहीये... किंवा, वगैरे-वगैरे,
आता, माणूस कितीही अनपड असला. तरी... नेहेमीची तीच-तीच वाक्य ऐकून त्याच्या सुद्धा ते ध्यानात येत असतं. पण, हे लैच 'गंड' माणूस.
पण, अशाच गंड माणसांनी मला नवनवीन किस्से दाखवून माझ्या लिखाणाला बळकटी आणली. हे सुद्धा, तितकंच खरं आहे, आणि ते मी.. कदापि विसरणार नाहीये..

मध्यंतरी, असाच एकदा तो व्यक्ती मला भेटला. मी, कसल्या तरी गूढ विचारात होतो. आणि, नेमका त्याने कोणाला तरी फोन लावला. आणि पुन्हा, तीच इंग्रजी टेप लागली.
नेहेमीप्रमाणे, त्याने माझ्याकडे फोन दिला. आणि म्हणाला,

बघ रे ती बाई काय म्हणतीय...!
एक तर, त्यावेळी मी जाम वैतागलेलो होतो. मी मोबाईल घेतला, आणि कानाला लावला. नेहेमीची तीच रटाळ टेप ऐकली..आणि, तो मोबाईल मी त्याच्याकडे दिला.
म्हणाला... काय म्हणतीय ती बाई..?
मी म्हणालो, ती म्हणतेय...
आता तुम्ही ज्या व्यक्तीला फोन लावला आहे. ती व्यक्ती, संडासला गेली आहे. आता, त्याच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये..!

माझे हे वाक्य ऐकून, तो तर अगदी हक्का बक्काच झाला.
म्हणाला.. आयला, हे सगळं त्यांना कसं माहित पडतंय..?

मी म्हणालो, अरे जग खूप पुढं निघून गेलं आहे. आणि तू मात्र, अजून आहे त्याच जागेवर आहेस..!
आणि तो सुद्धा, वेड्यासारखा मान हालवून मला होकार देत होता.
No comments:
Post a Comment