मुल जेंव्हा जन्माला येतं. किंवा, त्याआगोदर.. त्या मुलाची आई, त्या बाळाची किती काळजी घेत असते. ते.. मध्यंतरी मला पाहायला मिळालं.
एकामागोमाग एक.. माझ्या दोन्ही पुतण्यांना, मोठ्या पुतणीला दोन जुळ्या मुली आणि छोट्या पुतणीला मुलगा झाला.
या दोघीही... त्यांच्या बाळांची इतकी काळजी घ्यायच्या. कि ते पाहून, मी अगदी थक्क होऊन जायचो.
रात्रीत तीन चार वेळा उठून त्यांना दुध पाजनं. स्वतःची झोप मोड करून त्यांना रात्र रात्र खेळवत राहणं. त्याला काय होतंय ते कळत नसताना सुद्धा, बोबड्या बोलाने त्याला विचारणार.. कुठं दुखतंय बाळाला. काय-काय म्हणून करत नाहीत त्या आया..!

पण हे सगळं कां..?
कारण, त्या जीवाला आपण जन्म दिला आहे. त्याला, योग्य रीतीने सांभाळनं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून. हे तर झालं, प्रत्येक माता पित्याचं कर्तव्य.
परंतु...
त्यांनी केलेल्या कष्टाचं, आपण चीज करतो का..?
स्वतःला विचारण्या साठीचा, हा फार मोठा प्रश्न आहे..!

मोठेपणी हीच मुलं, जेंव्हा त्यांच्या आईबापाला जाब विचारतात.
तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे..?
तेंव्हा त्या आईबापाचे, खऱ्या अर्थाने पांग फेडले जातात.
मित्रहो, आपल्या आईबापाने आपल्यासाठी काय केलं आहे. ते, आपल्याला सहजासहजी समजत नाही. ते, इतरांच्या तोंडून समजत असतं. त्याकरिता, तितकी चाचपणी करता आली पाहिजे. कि खरोखरच, त्यांनी आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत.
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. असं होता कामा नये. आई वडिलांचा योग्य आदर सत्कार करणं, हे आपलं कर्तव्य आहे.
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. असं होता कामा नये. आई वडिलांचा योग्य आदर सत्कार करणं, हे आपलं कर्तव्य आहे.
आजवर..आईच्या प्रेमाविषयी, आपना सर्वांनाच बर्याच गोष्टी माहिती असतील, किंवा तुम्ही कोणाकडून तरी त्या ऐकल्या असतील. पण मी आज, एका बापाची प्रेमकहाणी तुम्हाला सांगणार आहे.
बर्याच वर्षांपूर्वी, आमच्याइथे एक कुटुंब राहायला होतं. दुर्दैवाने, त्यांच्यापैकी आता कोणीच हयात नाहीये. त्या मुलाचे वडील, सरकारी नोकरीत कामाला होते. उभ्या आयुष्यात, त्या व्यक्तीने कोणतं व्यसन केलं नाही. कि कसली हौस मौज केली नाही.
संपूर्ण आयुष्य, त्यांनी पांढर्या लेंगा शर्टा वरच घालवलं होतं.
दहा बाय बाराच्या भाड्याच्या खोलीमध्ये, हे त्रिकोणी कुटुंब अगदी गुण्यागोविंदाने नांदत होतं.
संपूर्ण आयुष्य, त्यांनी पांढर्या लेंगा शर्टा वरच घालवलं होतं.
दहा बाय बाराच्या भाड्याच्या खोलीमध्ये, हे त्रिकोणी कुटुंब अगदी गुण्यागोविंदाने नांदत होतं.
साठ वर्षांच्या नोकरी नंतर, त्या काकांना सेवानिवृत्ती घ्यावी लागली. त्यावेळी त्यांना.. फंड, ग्रॅज्युटी मिळून, काहीतरी दोनेक लाख रुपये मिळाले होते.
त्यांनी, भरपूर स्वप्नं रंगवली होती. आलेल्या पैशात जागा घेऊयात, घर बांधुयात, राजूच्या लग्नाचा बार उडवून देऊयात. पण हे स्वप्न, त्या परमेश्वराला सुद्धा पाहवलं नसावं.
त्यांनी, भरपूर स्वप्नं रंगवली होती. आलेल्या पैशात जागा घेऊयात, घर बांधुयात, राजूच्या लग्नाचा बार उडवून देऊयात. पण हे स्वप्न, त्या परमेश्वराला सुद्धा पाहवलं नसावं.
साध्या तापाचं निमित्त झालं. आणि, राजू भयंकर आजारी पडला. खूप दवाखाने केले. पण, गुण काही येत नव्हता. शेवटी एका मोठ्या इस्पितळात निदान झालं, कि त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. म्हाताऱ्याने तर हातच टेकले. हा धक्का त्यांना सहन होणारा नव्हता. एकुलता एक मुलगा. आता काय करायचं..?
राजूला, त्यांनी फार मोठ्या दवाखान्यात भरती केलं होतं. त्याकाळी, उपचारासाठी दवाखान्यात रोजचा हजार दीड हजार रुपये खर्च येत होता. महिना झाला, राजू दवाखान्यातच होता.
शेवटी... त्या डॉक्टरांना सुद्धा राहवलं नाही..

ते म्हणाले, काका.. तुमच्या मुलाचा आजार काही बरा होणार नाहीये. तुम्ही त्याला, घरी घेऊन जावा..
त्यावर... त्या, बापाचं उत्तर होतं..
डॉक्टर... माझ्याजवळ अजून दीड लाख रुपये शिल्लक आहेत. जोवर माझ्याकडे पैसे आहेत, तोवर त्याला जिवंत ठेवा. माझे पैसे संपल्यावर, मी त्याला घरी घेऊन जाईन. इथं राहिला..तर, तेवढाच महिनाभर जास्त जगल त्यो. घरी न्हेल्यावर, काय खरं हाये ओ. एवढं बोलून त्यांच्या अश्रूचा बांध फुटला.
आई बापाचं प्रेम खूप वेडं असतं हो. त्यांना, कधीच अंतर देऊ नका.
No comments:
Post a Comment