२००८ साली कुलू मनाली येथे आमचा भीषण अपघात झाला होता. परवाच्या आंबेनळी घाटात झालेल्या अपघातातील कर्मचारी, महाबळेश्वर येथे कामगार प्रशिक्षण वर्गाला निघाले होते. तसेच आम्ही सुद्धा या वर्गासाठीच त्या भागात गेलो होतो.
अपघात झाला त्यावेळी, स्टार माझा ( आत्ताचा ए.बी.पी. माझा ) या वृत्तवाहिनीने सर्वप्रथम हि बातमी टीव्हीवर दाखवली होती. आणि.. त्यानंतर सतत तीन चार दिवस, ते या बातमीचा पाठपुरावा करत होते.
त्यावेळी.. पुणे महानगर पालिकने अगदी तत्परतेने कुलू वरून आम्हा अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना विमानाने पुण्यात आणलं. त्याकरिता.. कलकत्त्यावरून एक स्पेशल विमान कुलू पर्यंत मोकळं आणलं होतं. आणि तिथून पुढे, उड्डाण केल्यावर ते जयपूरला पेट्रोल भरण्यासाठी थांबलं. आणि नंतर थेट पुण्यात आलं. हा सगळा खर्च आमच्या पालिकेने केला होता. आणि हा खर्च नक्कीच फार मोठा, म्हणजे काही लाखाच्या घरात असणार आहे. पुण्यात आपल्या कुटुंबीयात आल्यावर, आम्ही निर्धास्थ झालो. आणि आमचे प्राण वाचले.

त्यावेळी पालिकेने.. मृत व्यक्तींना पाच लाख आणि जखमी लोकांना दोन लाख रुपये द्यायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे.. मृत व्यक्तींच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि पाच लाख रुपये दिले गेले. पण जखमी लोकांना पैसे वगैरे मिळाले नाहीत.
मी तर या विषयावर ठाम होतो. कि.. " जान बची लाखो पाये. " मला पालिकेकडून पैशाची बिलकुल अपेक्षा नव्हती. पण आमच्यातील कोणीतरी वर्षभराने हि बातमी पुन्हा एकदा वर काढली. आणि आपल्याला त्याचा मोबदला कसा मिळेल. याची चाचपणी सुरु केली.
मग कोणीतरी एका टीव्ही पत्रकाराला भेटलं. त्याने सल्ला दिला, कि जीवित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला पाच हजार रुपये द्या. मी सलग, चार दिवस हि बातमी लाऊन धरतो. काम झालं, तर तुमचा फायदा. नाही झालं तर विषय सोडून द्या.

पैसे द्यायचे म्हणाल्यावर कोणीच पुढे येईना. आणि खरं सांगतो, मला तर या विषयात काहीच रस नव्हता. नंतर मुंबई मधील एका वकिलाने, आमच्यातील कोणाला तरी भेटून परस्पर स्वतःच्या खर्चाने केस दाखल केली. आणि इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळाल्यावर मला त्यातील पन्नास टक्के रक्कम द्या म्हणून सांगितलं. या गोष्टीला सुद्धा दहा वर्ष होत आली, पण अजूनही त्याचा निकाल लागला कि नाही त्याचा काहीच तपास नाही.
त्यानंतर आणखीन एका वकिलाने सल्ला दिला, तुम्ही पालिकेवर केस दाखल करा. म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील. ज्यावेळी हि बातमी माझ्या कानावर आली, त्यावेळी या विषयाला मी स्पष्ट नकार दिला. ज्या नोकरीच्या जीवावर आपलं कुटुंब उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्यावर केस दाखल करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. हि म्हणजे, फार मोठी नमक हरामी झाली. शेवटी कितीही झालं तरी, पालिका आम्हा कुटुंबियाचा पोशिंदा आहे. त्यांच्या विरोधात जाण्याचा शहाणपणा करण्यात काहीच अर्थ नव्हता. पैसा काय.. आज आहे तर उद्या नाही. पण पालिकेने येवढा मोठा खर्च करून आम्हाला स्पेशल विमामाने पुण्यात आणलं आमच्यावर योग्य ते उपचार केले. हे सगळं केलं नसतं. तर.. कुलू मधील त्या सरकारी दवाखान्यात आमच्यातील आणखीन दोनचार जन तरी नक्कीच गेले असते. पुणे पालिकेचे हे उपकार सुद्धा काही कमी नाहीत. आणि हे सगळं करण्यासाठी पालिकेला प्रत्येकी दोन लाखाच्यावर नक्कीच खर्च झाला असेल. तेच आपल्याला मिळालं म्हणून समजायचं..!
No comments:
Post a Comment