सायकल सारखं इतकं सुंदर वाहन आपल्या दिमतीला असताना, आपण विनाकारण महागड्या बाइक्स घेऊन त्या पेट्रोलच्या नावाने उगाचच टाहो फोडत असतो. ( कृपया या विषयात कोणी राजकारण आणू नका. हा राजकारणाचा विषय नाही. हा एक, सामाजिक विषय आहे. )
सायकलचे असंख्य फायदे असताना.. आपण मोटर बाईकच्या नादाला का लागतो.? तेच मला समजत नाही. लाखो रुपयांच्या दुचाक्या घ्या, त्यासाठी पेट्रोलवर हजारो रुपये खर्च करा. फक्त लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचण्या पलीकडे, आणि चार चौघात शो शायनिंग मारण्या पलीकडे, मला तरी त्या दुचाक्यांचा काही खास उपयोग वाटत नाहीये. ( काही लोकांना खरोखरच त्याची व्यवसायिक गरज आहे. त्या सर्वांना मी यातून वगळत आहे. ) अन्यथा याच्या वापरणे, मनुष्य भयंकर आळशी होणार, यात बिलकुल शंका नाही. आता तर बटन स्टार्ट बाइक्स आल्या आहेत. त्यामुळे किक मारण्याचा किचकट विषय सुद्धा इतिहासजमा झाला आहे.
त्यामानाने सायकलचा विषय किती मस्त आहे.
एकदा सायकल विकत घेतल्यावर, हवा भरणे आणि कधीतरी तेल घालणे..! याव्यतिरिक्त दुसरा कोणताच अतिरिक्त खर्च नाही. मुख्य म्हणजे पेट्रोलचा खर्च नसल्याने, आपला खिसा सुद्धा कायम भरगच्च राहतो. आणि सगळ्यात एक नंबर फायदा म्हणजे.. रोज सायकलिंग केल्याने, जिममध्ये व्यायाम करायला जाण्याची गरज भासत नाही. आणि त्यामुळे आपले, वर्षाचे किमान दहा ते पंधरा हजार रुपये तरी नक्कीच वाचतात.
सायकलिंग केल्याने.. भूक चांगली लागते, पचनक्रिया वाढीस लागते, वजन नियंत्रित राहतं. हाताचे, पायाचे आणि कंबरेचे स्नायू अधिक बळकट होतात, शरीरातून घाम गेल्याने जास्तीचं ताजंतवानं वाटतं, संपूर्ण शरीर सुडौल होतं.

इतके सारे फायदे असताना.. आपण सायकल का चालवत नसू..? हे मला पडलेलं फार मोठं कोडं आहे. बरं.. अजच्याला आपल्याला सायकल विकत घेण्याची सुद्धा गरज राहिली नाहीये. पुण्यात अगदी जागोजागी सहा रुपये तासाने, आणि.. फक्त शंभर रुपये महिना भाड्याने अद्ययावत अशा सायकली आपणाला सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत.
त्याचा लाभ काहीजण मस्त घेत आहेत, तर काही नालायक मानसिकतेची लोकं, त्या सायकल्स डॅमेज करून कुठेही अस्थाव्यस्त फेकून देत आहेत, तर कोणी त्यांच्या मऊ मुलायम सीट्स चोरून नेत आहेत. मनाला वाट्टेल तसा सावळा गोंधळ चालू आहे.

आपल्याला फक्त सुविधा हव्या असतात, तर मग.. त्या मिळाल्यावर त्यांची अवहेलना करण्यात कोणतं मोठं शहाणपण आहे.?
बाजारात आलेल्या त्या सायकल्स इतक्या दणकट आणि महागड्या आहेत, की सर्वसामान्य मनुष्य ती नक्कीच खरेदी करू शकत नाही. ट्युबलेस टायर असल्याने पंक्चर होण्याचा त्रास नाही. अद्ययावत डिस्क ब्रेक असल्याने, कितीही स्पीड असला तरी, काही सेकंदात सायकल कंट्रोल होते. हँडल शेजारी इनबिल्ट खणखणीत अशी कर्णमधुर बेल दिली आहे. किरकोळ सामान वाहतुकीसाठी मस्त बास्केट दिली आहे. इतक्या साऱ्या सुविधा दिल्या आहेत.

मग.. फुकटात मिळणाऱ्या वस्तूंची आपल्याला अशी हेळसांड करून चालणार आहे का.?
आपण कायम बोंबलत असतो.. आपला देश खूप पाठीमागे आहे.
पूर्वी विदेशातील या प्रकारच्या विविध सुविधा पाहून, आपण आपल्या मनालाच एक प्रश्न विचारायचो. आपल्या इथे अशी सुवीधा कधी उपलब्ध होईल का.?
आणि आज हि स्वप्नवत गोष्ट घडत आहे. कोणीतरी त्यांच्यातील आणि आपल्यातील ती खोल दरी मिटवण्यासाठी झटत आहे. तर त्याला खो न घालता, आपण त्यांना आपल्या मदतीचा हात द्यायला हवाय की नको.?

सार्वजनिक वस्तूंचा योग्य वापर करत चला.. कारण ती आपली संपत्ती आहे. आणि आपल्या संपत्तीचं कोणीही हनन करू शकत नाही. ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घेतली पाहिजे..!
No comments:
Post a Comment