काल.. वेळ होता म्हणून, संध्याकाळी बाजारात किराणा मालाची खरेदी करायला गेलो होतो..
सायकलवरून गेलो होतो, हो.. हे आवर्जून सांगावं लागतंय आता. आपलं कामच आहे, कोण कधी माझं अनुकरण करेन ते सांगता येत नाही. ( जवळपासच्या ठिकाणी, आजकाल मी सायकलवरूनच जात असतो, तुम्हीही सुरवात करा. ) सायकल चालवून दमल्यामुळे, माझ्या तोंडाला थोडी कोरड पडली होती. म्हणून, दुकानात असणाऱ्या कुलरचं पाणी पिण्यासाठी गेलो. कुलरवर स्टीलचे दोनच ग्लास होते. '

तिथे, चार वर्षांचा एक लहान मुलगा, आणि त्याचे वडील असे दोघे पाणी पिण्यासाठी उभे होते.
त्या मुलाच्या वडिलांनी, जो माझ्यापेक्षा वयाने बराच लहान असावा. त्याने पाण्याने भरलेला एक ग्लास हातात धरला होता. आणि, दुसऱ्या ग्लासने तो मुलाला पाणी पाजत होता. त्याच्या मुलाचं पाणी पिऊन झाल्यावर, त्याने तो उष्टा ग्लास न धुवता तसाच ठेऊन दिला.

त्यानंतर, त्याच्या हातात असणाऱ्या ग्लासने तो पाणी पिऊ लागला. तो पाणी पीत असताना मी फक्त त्याच्याकडे पाहत होतो. तर तो.. मला हाताने आणि नजरेने, कुलरवर ठेवलेला ग्लास घ्या म्हणून सांगत किंवा खुणवत होता. खरं तर लहान मुलाने उष्ट्या केलेल्या ग्लासात पाणी पिण्यात मला कोणताच कमीपणा वाटत नव्हता. पण, शिस्त हा विषय मला फार महत्वाचा वाटत असल्याने. त्याचं खुणवून झाल्यावर मी त्या पोरसवदा बापाला म्हणालो..
तो ग्लास.. तुमच्या मुलाने उष्टा केला होता. तो तुम्ही धुऊन ठेवलात का..?
तसा तो थोडा ओशाळला.. आणि, मानेनेच नाही म्हणत त्याने तो ग्लास हातात घेतला. आणि वरच्यावर त्याला जमेल तसा धुऊन होता त्या ठिकाणी ठेऊन दिला.
आणि, त्याच्या हातातील.. उष्टा केलेला ग्लास, त्याने माझ्या हातात दिला.
आजकाल लोकं कोणत्या धुंधीत असतात, तेच कळत नाही राव..!
आजकाल लोकं कोणत्या धुंधीत असतात, तेच कळत नाही राव..!
No comments:
Post a Comment