ऑक्टोबर.. मार्च, ऑक्टोबर.. मार्च, करत-करत..
कसाबसा एकदाचा मी कॉलेजमध्ये दाखला केला. त्यावेळी, एडमिशनसाठी कॉलेजमध्ये मला दोन हजार रुपये डोनेशन भरायचं होतं, माझ्या वडिलांनी अगदी नाखुशीने ते पैसे मला देऊ केले होते. आणि नेमकं त्याचवेळी, काही मुलांनी कॉलेजमध्ये आंदोलन छेडलं..

कोणीही डोनेशन देता कामा नये, डोनेशन न देता एडमिशन करा, तुम्हाला कोणी पैसे मागत असतील. तर आम्हाला येऊन सांगा..!
हा सगळा लवाजमा पाहून, अगदी घाबरत घाबरत.. मी कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायला गेलो. माझ्या हातामध्ये असणाऱ्या फॉर्म सोबत, दोन हजार रुपये मी त्या क्लार्क समोर धरले. तर त्याने.. अगदी नाखुषीने मानेनेच मला त्याचा नकार कळवला. आणि माझ्या हातातील फॉर्म तेवढा घेतला.
नाहीतर.. मला तरी कुठे त्याला पैसे द्यायची हौस आली होती. ते पैसे मी तसेच घेतले, आणि घरी गेल्यावर माझ्या वडिलांना नेऊन दिले.

पण त्यावेळी.. या पैशात कॉलेजमध्ये जाण्यासाठी आपण नवनवीन ड्रेस वगैरे घेऊयात. असं माझ्या मनात सुद्धा आलं नाही. चुकून जरी त्या पैशाचे मी ड्रेस घेतले असते, तर माझ्या घरी ते कळलं सुद्धा नसतं.
कारण.. उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुट्ट्यात मी कुठेतरी कामाला वगैरे जायचो. त्याचे पगार म्हणून मिळालेले पैसे सुद्धा मी अगदी [प्रामाणिकपणे घरीच द्यायचो.
पण मला..खोटंच सांगता आलं असतं.. कि, पगारातून मी थोडे पैसे बाजूला साठवले होते.. असं सांगून मला सहज वेळ मारून नेता आली असती. पण साला, मला खोटं बोलायची सवयच नाही हो. त्यामुळे.. ते ड्रेस वगैरे, सगळे विषय फक्त माझ्या मनातच राहिले.

माझा कॉलेजचा पहिला दिवस..
नवीन ठिकाण, मोठ्ठा प्रशस्थ असा वर्ग, समोर शिक्षकांना थांबण्यासाठीचा चौथरा. विद्यार्थ्यांना बसण्यासाठीचे बेंचेस. सगळं काही, अगदी वेगळंच वाटत होतं. त्यावेळी माझं अवघं सोळा वर्षाचं वय. हे सगळं पाहून, मला खूपच नवल आणि आनंद वाटत होता. मुळात मी कॉलेजमध्ये आलोय, हेच माझ्यासाठी स्वप्नवत होतं. कारण, दहावी मध्ये मी दोनवेळा डुबकी जी मारली होती.
कॉलेजच्या वर्गामध्ये.. दोन रांगात मुली आणि दोन रांगात मुलं बसली होती. सगळी मुलंमुली, अगदी चोराला धरून आणल्या सारखे गंभीर चेहेरे करून वर्गामध्ये चिडीचूप बसले होते. आम्ही, वर्गात शिक्षक येण्याची वाट पाहत होतो.

तेवड्यात कोणी तरी आवाज दिला, स्टँड अप..!
वर्गात शिक्षक आले होते. आम्ही, सगळ्यांनी उभे राहून त्यांना गुड आफ्टरनून केलं.
बसा.. मुलांनो, बसा.. सरांचा धीरगंभीर आवाज.
आज, तुमचा कॉलेजचा पहिला दिवस. कस वाटतंय तुम्हाला..?
मुलांकडे, मुलींकडे हात करून ते विचारू लागले.
मस्त, छान, सुंदर..
अशी उत्तर, मुला मुलींनी दिलीत.
उत्तर देण्यासाठी उभ्या असणाऱ्या मुलामुलींना सरांनी आदेश दिला. बसा खाली.
आणि, ते फळ्याकडे वळाले.
फळ्यावर त्यांनी मोठ्या अक्षरात JAPAN हा शब्द लिहिला.
आणि म्हणाले, सांगा..या, शब्दाचा अर्थ काय आहे.?
आम्ही सगळेजन एकमेकाच्या तोंडाकडे पाहतोय. हे तर, एका देशाचं नाव आहे. आणि, याचा अर्थ काय सांगायचा..?
सरांनी बऱ्याच मुलामुलींना या शब्दाचा अर्थ विचारला. सगळ्यांच्या तोंडून उत्तर तेच.

सर, हे एका देशाचं नाव आहे..!
ते तर मला सुद्धा माहित आहे, हे एका देशाचं नाव आहे. पण याचा अर्थ काय .?
वर्गात, पूर्ण शांतता पसरली होती. आणि, बाहेरून जोरात एक आवाज आला.

सत्या... सर आलेत रे, आवरतं घे..!
तरी सुद्धा, आम्हाला काहीच समजलं नाही. सरांनी, आता आवरतं घेतलं..आणि, म्हणाले. JAPAN या शब्दाचा अर्थ आहे.
" JUMPING AND PUMPING ALL NIGHT "
येवढं बोलून, त्या सरांनी आमच्या वर्गातून काढता पाय घेतला.
'JAPAN' या शब्दाचा 'खरा' अर्थ आणि उकल समजल्यावर. मुलं आणि मुली दोघांचेही चेहेरे लाजेने अगदी चूर झाले होते. आणि, तितक्यात खर्याखुऱ्या सरांनी वर्गात प्रवेश केला.
आम्ही, पुन्हा उभे राहिलो.
तोतया सर, आम्हाला फसवून निघून गेला होता.
खर्या सरांनी, फळ्यावरील 'JAPAN' हा शब्द पहिला. ते काय समजायचं ते समजून गेले.
आणि म्हणाले, तो आत्ता बाहेर जो गेला.. त्याने 'JAPAN' या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजावून सांगितला कि नाही.?
सरांच्या या प्रश्नावर आम्ही कोणी, काहीच बोललो नाही.
सर म्हणाले, याला कॉलेज म्हणतात कॉलेज.. हे कॉलेज आहे, शाळा नाही. कॉलेजमध्ये लोकं ओळखायला शिका..!

तर गम्मत अशी झाली होती, आम्हाला सर म्हणून शिकवायला आलेला तो सर नामक मुलगा.. कॉलेजमधील, एम.कॉम. चा विध्यार्थी होता. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी, त्या तोतया सराचा आम्हाला फार मोठा झटका बसला होता.
पण त्या दिवशी, सगळी मुलं मुली खूपच खुश होती. आणि, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी, रॅगिंग या शब्दाचा अर्थ सुद्धा आम्हाला समजला होता.!

No comments:
Post a Comment