चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- एकोणीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
त्या.. तेलगु महिलेचा याचक चेहेरा, माझ्या नजरेसमोरून जाता जात नव्हता.
सगळ्या सुखसोयी हात जोडून समोर उभ्या असताना, यात्रेत चालत जायची कोणाला हौस आली आहे हो..? पैश्याची मारामार असल्यामुळे, यात्रेत चालत गेलो..
तर, किमान दोन पैसे तरी वाचतील.
या आशेने, जीवाचा आटापिटा करत लोकं पायी यात्रा करत असतात.
गरिबी फार वाईट हो. माझ्यासमोर बरीच म्हातारी माणसं हसतमुखाने चालत जायचे. त्यांना पाहून, माझ्या काळजात कालवाकालव व्हायची.
न जाऊन करतील काय..?
उभ्या आयुष्यात, परमेश्वराला पाहायची आणि स्वर्गात जाऊन परत यायची संधी प्रत्येकाला प्राप्त होतेच असं नाही. आयुष्यभर काबाडकष्ट केले, आता परमेश्वरी चरणी लीन व्हायची घटिका समीप आली असताना. त्यांना ह्या संधीचा लाभ मिळाला होता.
आता.. मरायचं तर आहेच, पण ते मरण या पुण्य ठिकाणी आलं तर आयुष्याचं सार्थक झालं. असं म्हंटल तर ते वावगं ठरू नये. चालत का होईना, त्यांना देव भेटणारच असतो. त्याकरिता, हा सगळा खटाटोप चालू असते.

पुढे एका ठिकाणी, एका पिट्टूचं एका जाडजूड महिलेसोबत काहीतरी बोलनं चालू होतं. ती बिचारी, चालून खूपच थकली होती. तिची देहबोली मला सांगत होती. कि, इथून पुढे तिला बिलकुल चालवणार नव्हतं. त्यामुळे, या पिट्टूशी ती वार्तालाप करत होती.
कारण, जाडजूड महिलांना पाठीवर वाहून न्यायला हे पिट्टू लोकं फार टाळाटाळ करतात.
साहजिक आहे, असली अवजड कामं करायची म्हणजे, लवकर जीव जायची कामं आहेत. परंतु, हा पिट्टू.. अंगाने जरा मजबूत होता. आणि, बऱ्याच बातचिती नंतर, त्याने तो पैजेचा विडा उचलला.
मला सुद्धा, चालायचा जाम कंटाळा आला होता. त्यामुळे, गमती जमती पाहत वेळ काढत मी निघालो होतो. तो सौदा, अगदी माझ्या समोरच झाला. अवघ्या चार हजार रुपयात, बाकीचं अंतर तो पिट्टू त्या महिलेला घेऊन सर करणार होता.
त्या पिट्टू लोकांना, यात्रेकरूंच्या वजनाचं अचूक अंदाजी आकलन असतं. आपली वजनं, त्यांना परफेक्ट कळतात बरं का. मी सहजच त्या पिट्टूला म्हणालो,
बोलो.. मेरा कितना वेट होगा..?
एकवार.. माझ्या शरीरावर त्याने नजर मारली. आणि म्हणाला, आपका वेट साठ किलो होगा. कसला अचूक अंदाज बांधला होता त्याने. मी खुश होऊन, त्याच्या पाठीवर एक थाप मारली. त्याने सुद्धा, त्यावर हसून मला दाद दिली.

महिला.. या फक्त, दिसायला जाड असतात. पण, त्या अंगाने म्हणाव्या इतक्या भरीव किंवा ताकतवर नसतात. याची इत्यंभूत माहिती, त्या पिट्टूला असावी. म्हणून, त्या जाड्या महिलेला घेऊन जायला तो तयार झाला होता. त्या महिलेची, लाकडी बास्केटमध्ये बसण्याची तो तजवीज करू लागला. म्हणजे, बसणाऱ्या व्यक्तीला बास्केटमध्ये बसल्यावर त्याला रुतु नये, त्याचा प्रवास सुखकर व्हावा. म्हणून, त्याठिकाणी.. ते, एक ब्लांकेट किंवा चादर अंथरून तिथे तलम अशी बैठक निर्माण करतात. त्याचं काम चालू होतं, तोवर मी हळूहळू चालत पुढे निघालो.
पुढे एक पिट्टू, डोंगराच्या अगदी किनाऱ्यावर असणाऱ्या दगडावर आपली बास्केट ठेवून थोडा दम खात उभा होता. मी वाकून पाहिलं, तर त्या बास्केटमध्ये एक पन्नाशी पार केलेली महिला बसली होती. तो पिट्टू, नेमका दरी किनारावर थांबला असल्याने. म्हातारीला, खाली सगळी खोल दरी दिसत होती. चुकून, त्या पिट्टूच्या डोक्यावरील पट्टा निसटला.
तर, म्हातारी डायरेक्ट..
त्यामुळे, ती म्हातारी फारच रडवेली झाली होती. पिट्टू, बिचारा कंबरेत वाकून जागेवर उभा राहून दम खात होता. खाली वाकल्याने, त्याचा डोक्यातून येणारा सगळा घाम त्याच्या नाकाच्या शेंड्यावरून टपटप करत खाली ओघळत होता. " गधा मेहेनत " कशाला म्हणतात. आणि, घामाचा पैसा कशाला म्हणतात. ते मी, याची डोळा पाहत होतो. हि मानवी गधा मेहेनत पाहून मला फार वाईट वाटत होतं, पण करता काय..?
शेवटी.. मी, त्या म्हातारीपाशी गेलो. ती म्हातारी खूप घाबरली होती. आणि अशावेळी, माणूस नेमकं आपल्या मातृभाषेतच बोलतो. हा माझा फार जुना अनुभव आहे. एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. तर, ती म्हातारी तिच्या मातृभाषेत माझ्याशी बंगालीत वार्तालाप करू लागली. " किती खोल दरी आहे बाबा, मी खूप घाबरले आहे. जोवर तो पिट्टू चालता होत नाही. तोवर मला हात दे रे बाबा..! "
मध्य भारतातल्या लोकांना, एकवेळ दक्षिणेकडील भाषा समजणार नाही. पण, उत्तरेतील प्रत्येक भाषा त्यांना थोडीफार तरी नक्कीच समजते. हे सर्वांना मान्य असावं.
त्या म्हातारीची भाषा मला अवगत नसताना सुद्धा, तिच्या देहबोलीवरून आणि शब्दांच्या भाषेतील थोड्याफार साधर्म्यामुळे मी बांधायचा तो नेमका अंदाज बांधला.
म्हातारी खुपच घाबरली होती, मी तिच्या हाताला घट्ट पकडून ठेवलं. तेंव्हा कुठे तिला, आपण आता सुरक्षित आहोत असं वाटू लागलं. दहा एक मिनिटांनी, तिला वाहून आणणारा तो पिट्टू नव्या दमाने म्हातारीला पुन्हा एकदा आपल्या पाठीवर घेऊन निघता झाला. तेंव्हा कुठे, मी त्या म्हातारीचा हात सोडला.
म्हातारी खूप प्रसन्न झाली होती. दोन्ही हातांनी, ती मला भरभरून आशीर्वाद देत होती. मी काही फार मोठं काम केलं नव्हतं. पण, तेवढंच मला सुद्धा समाधान वाटत होतं. काहीतरी, पुण्यकर्म केल्यासारखं वाटत होतं.

माझा आता बराच आराम झाला होता, पुन्हा एकवार मी चालायला सुरवात केली. माझे गुडघे, मला आता शिव्या द्यायला लागले होते. मी सुद्धा, त्यांच्या शिव्या खात मुकाट्याने चालत होतो. समोरच्या बाजूस मला थोडी गजबज जाणवली, समोरच " छानी केम्प " होता. नाही-नाही म्हणता, मी जवळपास बारा किमी अंतर चालून आलो होतो. दुपारचे चार वाजत आले होते. छानी केम्प मध्ये, लष्कराच्या छावण्यांमध्ये दवाखाना, ऑक्सिजन पार्लर आणि इतर काही सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
थोडं अंतर चालून गेल्यावर, पुन्हा एकदा मला माझे तीन सहकारी मित्र दिसले.
चालून-चालून त्यांच्या तोंडावर सुद्धा पक्के बारा वाजले होते. अशा कठीण प्रसंगी एकमेकाला पाहून हसायची सुद्धा ताकत आमच्या अंगात उरली नव्हती. मी ते जिथे आहेत तिथवर जाऊन पोहोचलो.
ते मित्र मला म्हणाले, आपला सगळा प्लान फसला राव. वाटेत जाण्याकरिता एक सुद्धा घोडा मिळाला नाही. ते तिघे म्हणाले, आम्हाला तर आता बिलकुल चालणं होणार नाहीये. तुझं काय..? मी सुद्धा त्यांच्या हो मध्ये हो मिळवला. जशी काही, आम्हाला आता
" व्हीआयपी " ट्रीटमेंट मिळणार होती.
शेवटचं सहा किमी अंतर बाकी होतं. आता काय करावं या विचारात आम्ही होतो. आणि अचानक, माझ्या पोटात कळ मारली.

सकाळपासून माझ्या पोटामध्ये, फक्त.. चहा, वेफर्स, पाणी आणि अर्धा लिटर थम्सअप इतकंच काय ते गेलं होतं. मग, हा त्रास का..? त्या पहाडी भागात मुबलक पाणी आणि स्वच्छ स्वच्छतागृह असल्याने मी पहिला त्या स्वच्छतागृहात गेलो.
मला.. 'लूज मोशन' सुरु झाले होते. दहा मिनिटात सलग दोनवेळा, मी बाथरुमला जाऊन आलो. आता बाकी, मी पक्का गळून गेलो होतो.
पोटातून बाहेर पडायला, पोटात काहीतरी शिल्लक असायला हवं ना. त्यामुळे, माझ्या पोटात आता फक्त कळ मारत होती. मी पोटधरून खाली बसलो होतो. आणि तितक्यात, आम्हाला वरून तीन रिकामे घोडे येताना दिसले.
घोडेमालक.. साधारण, सतरा अठरा वर्षांची मुलं असावीत. आम्ही त्यांना थांबवलं, आणि वरती केदारनाथला येण्याकरिता त्यांना विचारणा केली. त्यांनी सुद्धा, क्षणाचीही उसंत न घेता आम्हाला ताबडतोब होकार कळवला. एका व्यक्तीचे आठशे रुपये घेऊ म्हणाले.
खरं तर, ती मुलं.. अगदी देवासारखे धावून आले होते ते.
त्यामुळे, आम्ही सुद्धा भावताव न करता त्यांना ताबडतोब आमचा होकार कळवला.

परंतु, अजून एक फार मोठी गडबड होती. आम्ही चौघे होतो, आणि घोडे फक्त तीन होते. शेवटी, " आदमी तीन और घोडे चार.. बहोत नाइन्साफी है रे ये " हा शोले सिनेमातील डायलॉग मला आठवला.
नाही होय करता, आम्ही तिघे मित्र आपापल्या घोड्यावर बसलो. मी भेटण्या अगोदर ते तिघे मित्र बराच वेळ सोबत असल्याने, त्यातील एकाला खूप वाईट वाटत होतं. शेवटी नाईलाज होता. कारण, जे दोन मित्र घोड्यावर बसले होते. ते फारच थकले होते. आणि त्या दोघांना सोबत म्हणून तो तीसरा मित्र त्याच्याबरोबर थांबला होता.
नाहीतर, तो सुद्धा कधीचा पुढे निघून गेला असता. आता तर..सगळे मित्र सुद्धा पुढे निघून गेले होते, आम्ही तिघे मित्र घोड्यावर जाणार होतो. त्यामुळे, आमचा प्रश्न मिटला होता. परंतु.. पायी चालणाऱ्या मित्राकडे मला पाहवत नव्हतं. पण करता काय..? इलाज नव्हता, आम्ही जसे घोड्यावर बसून निघालो. तसं त्या पाई चालणाऱ्या मित्राला डबल बळ मिळालं. आणि, तो इतक्या वेगात चालू लागला. कि त्याने चक्क आम्हाला आमच्या घोड्यांना पन्नास मीटरचं अंतर दिलं होतं. आज, त्याला सुधा " हत्तीचं " बळ आलं होतं.

मधल्या वेळेत, आमचा बराच वेळ खर्ची पडला होता. त्यामुळे, मागील बरेच लोक आमच्या पुढे निघून गेले होते.
" सकाळपासून आपल्या सोबत चालणारे सोबती आता घोड्यावर बसून निघालेले पाहून. " पाई चालणारे बाकी यात्री सुद्धा, आता आश्चर्य व्यक्त करत होते.
काय करणार..? आमचं शरीर साथ देत नव्हतं, त्यापुढे काहीच पर्याय नव्हता.
वाटेमध्ये एका ठिकाणी, फारच खडबडीत रस्ता होता. आणि, बाजूलाच ग्लेशियर सुद्धा होता. त्याठिकाणी,
जाड्या बाईला पाठीवर घेऊन आलेला पिट्टू विसाव्याला थांबला होता. पक्का घामाघून झाला होता बिचारा. मी सहज म्हणून त्याला विचारणा केली.
क्या हो गया..?
तर म्हणाला,
जिंदगीमे पहेली बार मेरा " अंदाजा " गलत निकला. लेडीज बहोत " हेवीवेट " है.
त्याला म्हणालो, तिला जास्तीचे पैसे मागून बघ, देईल ती. तर म्हणाला.. क्या पता..?
और.. पाच किमी आगे जाणा है. देखते है क्या होता है.
मला तर, मनोमन खूप वाईट वाटत होतं. पण करणार काय..?
आता आमचा घोड्यावर प्रवास सुरु होता. बघता-बघता पाच किमी अंतर येणार होतं. दुरून आम्हाला, एक टापू सुद्धा दिसत होता. पण ते कोणतं ठिकाण आहे. ते आम्हाला माहित नव्हतं.

तितक्यात आम्हाला वरून एक रिकामा घोडा येताना दिसला. आमचा मित्र आमच्या पुढेच चालत निघाला होता. शेवटी, त्या घोडे वाल्याला गळ घालून त्या मित्राला सुद्धा,
तो नको-नको म्हणत असताना सुद्धा आम्ही त्याला 'घोड्यावर' बसवलाच.
तो सौदा, फक्त पाचशे रुपयात ठरला गेला. आणि, अवघ्या पंधरा मिनिटात आम्ही त्या दुरून दिसणाऱ्या टापू पर्यंत जाऊन पोहोचलो. म्हणजे घोड्यावर बसून, आम्ही फक्त तीन किमी अंतरच आलो होतो.

ते.. रुद्रा पोइंट नावाचं ठिकाण होतं. आणि, हेच ठिकाण यात्रेच्या ठिकाणी त्या घोडे वाल्यांचा शेवटचा स्टोप होता. आम्ही सगळे, निव्वळ फसवले गेलो होतो.
पण.. आता बोलून काहीच उपयोग नव्हता.
सगळ्यात जास्ती तर, आमचा 'तो' मित्र कमनशिबी ठरला.
फक्त.. दीड किमी अंतराचे त्याला पाचशे रुपये मोजावे लागले होते.
पण.. काहीही झालं, तरी आम्ही तिघे मित्र हे अंतर चालू शकत नव्हतो. कारण, पायी चालण्याकरिता आणि खासकरून आमच्यासाठी तीन किमी अंतर अगदी खडतर आणि खूप चढण असणारं असं होतं.
विनाकारण खिशातील पाचशे रुपये गेल्यामुळे. तो मित्र, आमच्यावर फार चिडचिड करत होता. पण, आम्हाला तरी काय माहिती. कि पुढे नेमकं असं घडणार आहे.
आमच्या मनात, त्याच्याप्रती असणाऱ्या प्रेमामुळेच. आम्ही तो निर्णय घेतला होता.

रुद्रा पोइंट वर.. काही दमलेले खेचरं लोळ्या खात जमनीवर पडले होते. आमचा सुद्धा, थकवा थोडा कमी झाला होता. घोडेवाल्याचे पैसे चुकते करत आम्ही तेथून पुढे निघालो. अजून दोन किमी अंतर बाकी होतं. पण आता, सगळा सपाटीचा रस्ता होता. डोंगराच्या कुशीत, दुरूनच आम्हाला केदारनाथाचं मंदिर दृष्टीस पडलं. दुरूनच त्या मंदिराला आणि त्या छोट्याशा गावाला पाहिलं. दुरूनच, केदारनाथ मंदिराच्या पाठीमागून डोंगरातून आलेला तो मातीचा फ्लो आणि त्याची घळ सुद्धा मला स्पष्ट दिसत होती.
पुढे मी, रुद्र केम्प येथे तंबू मध्ये असणाऱ्या प्रथमोपचार केंद्रात गेलो. तिथे मला होणारा त्रास त्या डॉक्टरांना सांगितला. त्यांनी, मला दोन गोळ्या आणि कसलीशी पावडर दिली. आणि म्हणाले, पहिलं काहीतरी खाऊन घ्या आणि त्यानंतर या गोळ्या खावा. गोळ्या खाऊन झाल्यावर, हि पावडर एक लिटर पाण्यात मिक्स करा आणि थोडं थोडं पाणी पीत रहा. माझा उपचार होत असताना,
त्या दोन डॉक्टर लोकांची आपसात चर्चा चालूच होती. आणि, ती चर्चा नेमकी मागे आलेल्या जल आपत्तीवरच होती. ते दोघेही, आपापले अनुभव एक दुसऱ्याला कथन करत होते. तर त्यातील एक डॉक्टर म्हणाले,
मी.. त्या आपत्तीमध्ये, अशा मृत व्यक्तींच्या पोस्टमार्टेम केल्या होत्या. ज्यांना.. पोट असं नव्हतंच, पोटाच्या वरील आणि आतील सगळा भाग वाहून गेला होता. आतमध्ये, कोणताच भाग शिल्लक राहिलेला नव्हता.
बापरे.. या भयंकर गोष्टी ऐकून, माझ्या तर पोटातच गोळा आला. पुढचं काहीएक ऐकायला नको. म्हणून मी त्या तंबूतून ताबडतोब बाहेर पडलो.

बाहेर एका टापूवर, एक छोटंसं टपरीवजा हॉटेल होतं. तिथे गरमागरम मेगी, चहा बिस्किटं आम्ही खाल्ली. त्यावर, डॉक्टरांनी दिलेली गोळी खाल्ली. एका रिकाम्या बाटलीमध्ये, ती पावडर टाकली आणि निसर्गातून वाहणाऱ्या बिसलेरीचं पाणी त्यात मिसळलं. ते पहाडी पाणी इतकं थंड होतं. कि बाटलीत असणारी सगळी पावडर त्याने गोठून गेली होती. जवळपास अर्धा तास मी ते पाणी हलवत होतो. तेंव्हा कुठे ती पावडर त्या पाण्यात मिक्स झाली. डॉक्टरांनी दिलेली गोळी आणि त्या पावडरच्या पाण्याने मला इतका फरक पडला. कि त्यानंतर, मला लूज मोशनचा त्रास असा जाणवलाच नाही.
संध्याकाळचे पाच वाजत आले होते. अजून दीडदोन किमी अंतर चालून गेल्यावर मंदिर येणार होतं. मंदिराकडे पाहत, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर न्याहाळत आम्ही पुढील वाट चालू लागलो. आता मी मंदिराच्या अगदी जवळपासच्या अंतरावर होतो. आता हेलिकॉप्टर सुद्धा अगदी नजरेच्या टप्प्यात आले होते. त्यांची घरघर, आणि पंख्याची हवा आम्हाला स्पष्ट जाणवत होती. लक्ष्मी पुत्रांना, हेलिकॉप्टर मधून उतरताना पाहून पायाचे गोळे आणखीन वर चढत होते. शेवटी, नसीब अपना अपना.
वाटेत.. नव्याने बांधलेला मंदाकिनीच्या घाटावरून आम्ही पुढे चालत गेलो.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या महाप्रलयाच्या खुणा अजूनसुद्धा स्पष्ट जाणवत होत्या. अर्धवट तुटलेली घरं अजूनही त्याच अवस्थेत होती. डोंगरातून वाहून आलेला दगड मातीचा मलबा. अजूनही आहे त्याच ठिकाणी पडून होता. मातीखाली गाडल्या गेलेल्या लोकांची तर कधीच राखरांगोळी झाली असावी.
घडीभर.. मी त्या मृतात्म्यांच्या शवावरून चालत असल्याचा मला भास होत होता.
पुन्हा एकदा, त्या गहिऱ्या आठवणी माझं मन विषन्न करून जात होत्या.
आणि.. समोरच्या बाजूला,
केदारनाथाचं देखणं " मंदिर " आम्हाला, भेटीसाठी खुणावत होतं.

क्रमशः
No comments:
Post a Comment