चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- वीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
केदारनाथ मंदिर,
हे.. बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असं धार्मिक ठिकाण आहे. हे मंदिर, समुद्र सपाटीपासून जवळपास बारा ते तेरा हजार फुट उंचीवर स्तिथ आहे.
पुराणात लिहिलेल्या माहितीच्या आधारावरून, असं सांगण्यात येतं. कि, केदारनाथपुरी येथे जाणारा प्रत्येक भाविक. हा, फारच भाग्यवान मानला गेला आहे. किंवा, केदारनाथ येथे फक्त जाण्याची इच्छा प्रकट करणारा भक्त सुद्धा फार भाग्यवान मानला जातो. त्याच्या तिथे जाण्याने, त्याच्या कुटुंबातील तीनशे पिढ्यांची पित्र, हि शिवलोकी जातात. त्यामुळे, केदार क्षेत्र हे इतर क्षेत्रांपेक्षा सर्वश्रेष्ठ असं गणलं आणि मानलं गेलं आहे.

दुरूनच आम्हाला, केदारनाथ मंदिरासमोर असलेली भाविकांची भली मोठी गर्दी आणि तेवढीच लांब दर्शनबारी दिसली. जवळपास, शे पाचशे लोकं त्या लाईन मध्ये दर्शनासाठी उभे असावेत. संध्याकाळचे सहा वाजले होते. वातावरणात धुकं पसरू लागलं होतं.
आत्तापर्यंत दूरवर दिसणारा बर्फाचा डोंगर अचानक दिसेनासा झाला होता. ढग, जमिनीवर उतरू लागले होते. वातावरणात, एक वेगळ्याच प्रकारचा रंग चढू लागला होता. तिथे पोहोचल्यावर आम्ही सगळे मित्र, त्या दर्शन बारीचा हिस्सा झालो.
तेवढ्यात मला काहीतरी आठवलं,
जास्ती अंधार पडला, तर फोटो काढता येणार नाही..! म्हणून, धावपळ करत मी मंदिराच्या दिशेने निघालो. तर वाटेमध्ये, आमचे पुढे आलेले मित्र मला भेटले. ते सुद्धा, त्याच लाईन मध्ये आमच्या पासून थोड्या पुढील बाजूस उभे होते. त्यांना उभ्याउभ्या भेटून, मी तडक पुढे निघालो. मला हवे असलेले आणि हवे तसे सगळे फोटो मी टिपून घेतले.
निसर्गाचं रौद्ररूप माझ्या केमेर्यात कैद झालं होतं. त्याच बरोबर, केदारनाथाचं देखणं मंदिर आणि आणि आजूबाजूचा सुंदर नजारा सुद्धा माझ्या नजरेत कैद झाला होता.

माझ्या मनासारखे मला फोटो मिळाले होते. त्यामुळे, मी भलताच खुश झालो होतो. आणि त्या ठिकाणावरून, मी पुन्हा माघारी फिरलो.
केदारनाथ मंदिरात, दिवस भरातून वेगवेगळ्या प्रकारच्या पाच, सहा पूजा बांधल्या जातात. हे मी, अंदाजे सांगतोय बरं का, आणखी किती पूजापाठ त्या ठिकाणी असतात. त्याची मला सखोल माहिती नाहीये. जाणकारांनी, त्याची माहिती आणि महती आम्हा भाविकांना कळवावी.
त्या पूजा अर्चेकरिता, त्या वेळेमध्ये केदारनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असतं. त्यामुळे, बरीमध्ये उभ्या असणाऱ्या भाविकांचा, बराच खोळंबा होतो.
परंतु.. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांना मोडीत सुद्धा काढता येणार नाही ना.
दर्शन बारीमध्ये, आम्ही फक्त तीनच मित्र पाठीमागे होतो. त्यापैकी, मी तर फोटो काढायला म्हणून पुढे निघून आलो होतो. आता, मागे दोघेच मित्र उरले होते.
मी त्या ठिकाणचे फोटो काढून माघारी आलो, आणि.. बारीमध्ये पुढे उभ्या असणाऱ्या माझ्या मित्रांबरोबर गप्पागोष्टी करत तिथेच थांबलो.
मी.. अजून का येत नाही..? म्हणून, मला पाहायला आमचा दुसरा मित्र तिथे आला.
आणि, तो हि तिथेच चिटकला. आणि त्यापाठोपाठ, आमचा तिसरा मित्र सुद्धा तिथे आला. आता बाकी, हम साथ साथ है म्हणण्यात खरी मज्जा होती.
थंडीचा कडाका वाढत चालला होता. मंदिराचे दरवाजे काही उघडले जात नव्हते. अजून.. किती वेळ लागणार आहे, ते सुद्धा, समजायला मार्ग नव्हता. दर्शनाच्या रांगेमध्ये, बहुभाषिक मराठी लोक होते. आणि, तितक्यात केदारनाथ मंदिरातील एक मुख्य अधिकारी, जो, तेथील पोलीस दलात कार्यरत होता. त्याला, मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत होती.
त्याला.. मराठी माणसावर कसला राग होता, ते.. तो केदारनाथच जाणो. पण, तो मराठी लोकांना मराठी भाषेतच फार सुनावत होता. आणि खेकसा खेकशी करत होता. जसा काही, त्याला.. पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रामधून गांडीवर लात मारून हाकलून दिला असावा. त्याच्या फालतू बोलण्याने, मला राग तर फार येत होता. पण, त्याच्या त्या बोलण्यात थोडंफार तथ्य होतच म्हणा.
त्याचं म्हणनं होतं. कि, मराठी माणसं रांगेमध्ये घुसखोरी करतात. आम्ही सुद्धा, रांगेमध्ये घुसखोरी केली असल्याने. आम्हाला, त्याला काहीएक बोलण्याचा अधिकार नव्हता. नाहीतरी, त्याला काही बोलावं, तर फुकटचा मार खानं तरी आलं. किंवा, सरळ जेलची हवा तरी घडणारच. त्यामुळे, त्याच्या बोलण्याचं जास्ती मनावर न घेता. आम्ही, देवाचं नामस्मरण करू लागलो. संध्याकाळी सात वाजता, मंदिराची कपाटं उघडली. आणि, पुन्हा एकदा लोकांनी रांगेमध्ये घुसाघुशी सुरु केली. पुन्हा त्या पोलिसाला, दांडा घेऊन तिथे यावं लागलं. तेंव्हा कुठे, ती लोकं लाईनीवर आली. अंधार वाढत चालला होता. तसे, ढग सुद्धा जमिनीवर उतरू लागले होते. सगळं वातावरण अगदी स्वर्गमयी झालं होतं. आणि, पांढऱ्या शुभ्र धुक्याने दाटून गेलं होतं.

अंधार पडू लागल्याने, मंदिरातील आणि मंदिरा बाहेरील विद्युत रोषणाई केलेल्या छोट्या लाईट्स लावल्या गेल्या. त्या गडद अंधारामध्ये, हिमालयाच्या कुशीत दडलेलं केदारनाथ मंदिर अजूनच देखणं आणि उठून दिसू लागलं होतं. मंदिरावरील विद्युत रोषणाई तर अगदी लाजवाब दिसत होती. प्रत्येक शिवमंदिराबाहेर असतो तसाच केदारनाथ मंदिराबाहेर सुद्धा एक भलामोठा नंदी आहे. तिथे, काय प्रथा होती ते माहित नाही. परंतु, मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी सगळे भाविक, त्या नंदीच्या अंगाला तूप चोपडत होते. बहुतेक, नंदी हे शंकराचं वाहन आहे. त्यामुळे, पहिला त्याला मस्का मारल्याशिवाय भाविकाची गाडी पुढे सरकत नसावी. असा काहीतरी त्यापाठी उद्देश असावा, असं माझं मत आहे.
पण त्या भागात.. तुपाचा खमंग सुवास दरवळनं बाजूला राहिलं. सगळीकडे, निव्वळ डालड्याचा वास येत होता. त्यावरून, आपल्या बाजारात किती अस्सल प्रतीचं तूप विक्रीला आहे. त्याची पुन्हा एकदा मला खात्री पटली.
हळूहळू दर्शनबारी पुढे सरकत होती. आणि शेवटी, आमचा नंबर सुद्धा आला. भक्तिभावाने, प्रथम आम्ही मंदिराच्या उंबर्याचं दर्शन घेतलं. आणि, मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील शिवलिंगाच्या भोवताली, फुलांची बरीच सजावट केली होती. त्यामुळे, ते शिवलिंग नेमकं कसं आहे. ते किमान, मला तरी समजलं नाही.पण, त्या ठराविक ठिकाणी मी एकाग्र चित्ताने नमन केलं. माझ्या संपूर्ण कुटुंबियांचा, आणि तुम्हा फेसबुक मित्रांचा नमस्कार मी शिव चरणी अर्पण केला. शेवटी, पुजाऱ्याने आम्हाला हळुवार ढकलत-ढकलत पुढे सरकवतं केलं. आणि आम्ही मंदिरातून बाहेर आलो.
देवाचं चिंतन करून, पुन्हा एकवार आम्ही प्रभूसमोर नतमस्तक झालो. थोडावेळ, मंदिरासमोर बैठक मारून एकाग्र चित्ताने. शिवजींची आराधना केली. मनाजोगतं दर्शन झालं होतं, त्यामुळे सगळ्या मित्रांना अगदी आनंदाचं भरतं आलं होतं.
अंधार पडू लागला होता, त्यागोदर मंदिराचा सगळा परिसर पाहून घ्या..! उद्या इथे येनं होतंय नाय होतंय. असं मी सर्व मित्रांना सांगितलं.
त्याठिकाणी, अगोदर मी सगळं फिरून घेतलं असल्याने. माझ्या मित्रांना, मीच त्याठिकाणी गाईडिंग करू लागलो. मंदिराच्या आसपासच्या भागात, आणि मंदिराला सुद्धा, जल प्रलायामुळे भरपूर हानी झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. मंदिराच्या आजूबाजूला, पहाडातून वाहून आलेला सगळा मलबा अजून तसाच पडून आहे. तो मलबा हटवण्यासाठी, बरीच मोठी यंत्रणा राबवावी लागणार आहे. परंतु, मंदिराच्या मागील बाजूला पुन्हा जल प्रलय आलाच तर त्याला अटकाव करता यावा. म्हणून त्याठिकाणी, काही उपाययोजनांची आखणी केली गेली आहे. त्याला पूर्णपणे मूर्तरूप प्राप्त झाल्यावरच तो नेमका काय आणि कसा प्रकल्प आहे. ते आपल्या ध्यानात येयील.
डोंगरातून वाहत आलेल्या ज्या मोठ्या दगडामुळे मंदिर नेस्तनाबूत होण्यापासून वाचलं होतं. त्या दगडाला आता " भीमशीळा " या नावाने ओळखलं जातं. सर्व भाविक, त्या भीमशिळेचं सुद्धा भक्तिभावाने दर्शन घेतात. त्या अवाढव्य भीमशिळेला, ज्या लहान दगडांची उटी ( टेकन ) लागली आहे. त्या दगडांमुळे, खरं तर तो मोठा दगड तिथे टिकून राहिला आहे. त्यामुळे, मला त्या लहान दगडांचं फार कौतुक वाटत होतं. पण शेवटी, इथे सुद्धा तो मोठा दगडच बाजी मारून गेला होता. माहाप्रलय आल्यानंतरची, हि दुसरी यात्रा आहे. एक वर्ष यात्रा बंद ठेवली होती. त्यामुळे, अजूनही मंदिराची डागडुजी चालूच आहे.
अशी आख्यायिका आहे, कि हे मंदिर पांडवांनी बांधलं आहे. या गोष्टीत किती सत्यता आहे. ते परमेश्वरालाच माहिती. समस्त धार्मिक लोक, प्रथम केदारनाथ येथे दर्शन करून. त्यानंतर बद्रीनाथ येथे दर्शनाला जात असतात. पौराणिक आधारप्रमाणे.. केदार, महिष
( मेष ) रूपाचा पाठीमागील हिस्सा आहे. द्वितीय केदार, मदमहेश्वरी येथे नाभी, तुंगनाथ येथे बाहू, रुद्रनाथ येथे मुख आणि कल्पेश्वर येथे जटा आहेत. हि सर्व ठिकाणं मिळून, पंचकेदार निर्माण झाला आहे. याविषयी बऱ्याच निरनिराळ्या कथा ऐकवल्या जातात. त्यामुळे, कोणत्या एका कथेला मान्यता द्यावी..? हा विचार मनात येऊन, त्यातील ठराविक एक कथा इथे लिहिणं मी मुद्दाम टाळत आहे.
आसपासचा परिसर पाहून झाला, तितक्यात आमच्यातील एका मित्राच्या लक्षात आलं. रात्रीच्या मुक्कामाकरिता आम्ही रूम किंवा तंबू बुक केला नव्हता.
आमच्यातील एक मित्र ताबडतोब गेला. आणि, आम्हा सर्वांकरिता तंबू मधील बेडचं बुकिंग करून आला. तो मित्र, घाईत गेला म्हणून बरं झालं. कारण, त्या तंबू मधील शेवटच्या फक्त दहा बेडच शिल्लक राहिल्या होत्या. कदाचित, शिवजींनी त्या खास आमच्यासाठीच राखून ठेवल्या असाव्यात.
तो परिसर फिरत असताना, काही भाविक आम्हाला त्याठिकाणी भेटले. या पवित्र ठिकाणी आम्ही भंडार्याचं आयोजन केलं आहे. त्यांनी, आवर्जून आम्हाला विनंती केली.
तिथे येऊन, तुम्ही सर्वांनी दोन घास भक्षण करावे अशी विंनती आहे.
त्या शिव भक्ताच्या विनंतीला मान देऊन, आम्ही त्या विशाल भंडाऱ्यात गेलो. तिथे, स्वादिष्ट अशा बासमती तांदळाची खिचडी बनवली होती. वातावरणात भयंकर कडाक्याची थंडी असल्याने. त्या खिचडी मध्ये, काळी मिरी आणि हिंगाचा पुरेपूर वापर करण्यात आला होता. आम्ही सर्व मित्रांनी, त्या स्वादिष्ट आणि गरमागरम खिचडीवर आडवा हात मारला. या भंडाऱ्यात मिळालेल्या प्रसादामुळे, इथे तिथे नको ते खाणंपिणं आपसूकच टळलं गेलं होतं. शेवटी भक्ताची " त्याला " काळजी असतेच हो.

संध्याकाळचे साडेआठ वाजून गेले होते. थंडीचा भयंकर कडाका वाढला होता. सगळ्यांनी सोबत आणलेल्या कानटोप्या स्वेटर अंगावर चढवले. तरी सुद्धा, थंडी काही कमी होत नव्हती. दर्शन आटोपलं होतं, जेवणं उरकली होती. आता, दुसरं-तिसरं काहीच काम नव्हतं. त्यामुळे, आम्ही आमचा मोर्चा, आमच्या तंबूकडे वळवला.
मंदिरापासून साधारण दोनतीनशे मीटर अंतरावर आमचा तंबू होता. आणि अगदी त्याच्या बाजूलाच हेलिकॉप्टरचं, हेलीप्याड सुद्धा होतं.
विशिष्ट कापडाच्या ताडपत्री पासून बनवलेले तंबू अगदी मजबूत असे होते. पाऊस पाण्यापासून बचाव करण्याची दांडगी क्षमता त्यामध्ये होती. त्या तंबूमध्ये, विशीष्ट पद्धतीने बनवलेल्या लोखंडी खाटेला, एकावर एक असे दोन मजली बेड बनवले होते. त्यावर, एक उशी आणि मखमली स्लीपिंग ब्याग होती. थंडी सहन होणारी नव्हती. त्यामुळे, आमचं सगळं सामान आम्ही तंबूमध्ये एका बाजूला ठेवून. त्या, जाडजूड स्लीपिंग ब्याग मध्ये घुसलो. स्लीपिंग ब्यागमध्ये, आमच्या शरीराला अगदी जखडल्या सारखं होत होतं. या कुशीवरून त्या कुशीवर होता येत नव्हतं. पण, हे बिछाने कमालीचे गरम होते.
अगदी.. आईच्या गोदीमध्ये झोपल्याचा आनंद मला त्याठिकाणी मिळाला.
नाहीतरी, मी स्वर्गात आणि परमेश्वराच्या सानिध्यात होतोच. त्याच्या पेक्षा, मोठी माऊली ती कोणती. हा, तंबूत राहण्याचा आणखीन एक नवीन अनुभव सुद्धा, आम्हाला.. त्याठिकाणी अनुभवता आला..!

क्रमशः
No comments:
Post a Comment