चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- अकरा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा लॉज तसा मस्तच होता. अगदी नवीन बांधलेल्या लॉजमध्ये गरम पाण्याची सुद्धा सोय होती. त्यामुळे मी तर फार हरकून गेलो होतो. क्षणाचीही उसंत न घेता, आम्ही आमची रूम ताब्यात घेतली. आणि सर्वात पहिला मी बाथरूममध्ये शिरलो. आणि मस्तपैकी कडक पाण्याने माझी हाडं शेकून घेतली.
काय करणार..चालून-चालून माझे पाय सुद्धा खूप थकले होते.
माझ्या.. ह्या गरम पाण्याच्या मसाजने, माझे पाय सुद्धा खूप खुश झाले. आणि ते नव्या दमाने प्रवास करण्यासाठी पुन्हा उत्सुक सुद्धा झाले आहेत. असं सुद्धा, त्यांनी मला ताबडतोड कळवलं.
रात्रीची जेवणं उरकली. सगळे मित्र, चालून जाम थकले होते. त्यामुळे, सगळ्यांनी आपआपली अंगं बिछान्यावर टाकली. आणि, पडताक्षणी सगळे घाराघुर झाले. आज बाकी, कोणालाच कोणाच्या घोरण्याचा आवाज येत नव्हता. हि एक फार मोठी गंमत होती.

धुरकट वातावरणामुळे काही कळत नव्हतं, पण अचानक मला जाग आली. आणि, सकाळ सकाळी मी खडबडून जागा झालो. भिंतीवरील घड्याळात पाहिलं, सकाळचे सहा वाजून गेले होते.
पहाटे पाच वाजता आम्हाला उठवायला येणारा पवार सुद्धा अजून आला नव्हता.
तो सगळा विषय बाजूला ठेवून, सर्व मित्रांना मी जागं केलं. वेळ झालेला पाहून, सर्व मित्रांनी पटापट आपआपल्या अंघोळ उरकल्या. नाश्ता म्हणून, घरून नेनेल्या.. चकल्या, लाडू, चिवडा, भडंग यावर यथेच्छ ताव मारला. आणि, आपापलं सामान घेऊन आम्ही लॉजच्या खाली येऊन पवार महाशयाची वाट पाहत बसलो.

फार उशिराने, सकाळी आठ वाजता पवार लॉजवर आला, आम्हाला, खाली येऊन थांबलेलं पाहून तो थोडा खजील झाला होता. पण बहुतेक, काल रात्री त्याचं सुद्धा " जागरण " झालं असावं. असा विचार करत,
आम्ही तो विषय तिथेच सोडून दिला. पवारने, लगबगीने आमचं सगळं सामान एकवार गाडीवर लादून घेतलं. आणि, आमच्या पुढील प्रवासाला सुरवात झाली.
पवारला थोडं छेडावं म्हणून..
मी पवारला म्हणालो. आम्हाला मुद्दाम फसवून इकडे घेऊन आलास नाही का. त्यामुळे.. रात्री, मस्त झोप आली असेल नाही का तुला..
माझ्या या वाक्यावर.. गडी भलताच लाजला. आणि म्हणाला,

तो आपको, सब कुछ बता दिया उस बूढेने...!
आणि, चेहऱ्यावर कमालीची तेजी आणत नव्या दमाने तो गाडी चालवू लागला. आज बाकी, गडी अगदी मस्त आणि सावकाश गाडी चालू लागला होता..
जाऊदेत, पवार काल मस्तपैकी फ्रेश झाला होता. त्यामुळे, इथूनपुढे आता आम्हाला त्याच्या ड्रायव्हिंगची बिलकुल काळजी नव्हती.

पुढील प्रवासात, वाटेमध्ये जागोजागी.. दरडी कोसळल्याने काही ठिकाणी मजबूत जाम लागत होतं. तर, दुसऱ्या क्षणात लगेच रस्ता मोकळा होऊन पुढे चाल सुद्धा मिळत होती.
आता ते, नेमकं कोणतं गाव होतं काही माहित नाही,
पण.. त्या ठिकाणी, आम्हाला काहीवेळा करिता थांबावं लागणार होतं.
इथेच, आमच्या यात्रेकरिता आवश्यक असणारा रजिस्टर पास, आम्हाला मिळणार होता.

पासच्या लाईनीत आम्ही उभे होतो, अगदी पांढरं शुभ्र वातवरण असताना, अचानक पावसाची सतत रिपरिप सुरु झाली होती. माझ्या काही मित्रांना, मी त्या पासच्या लाईनीत उभं केलं. आणि, मी बापडा पुन्हा गाडीत येऊन उबेला बसलो. काही वेळाने, आमचा नंबर आला. कि मी लगेच तिथे हजर झालो.
संगणकात, सर्वांचे फोटो आणि फिंगर प्रिंट घेतल्या गेल्या.
उत्तराखंडमधील अतिरेकी कारवायांच्या, किंवा सुरक्षेच्या दृष्टीने हे फार महत्वाचं पाउल होतं. ते संगनिकीकृत पास घेऊन आम्ही तेथून निघणार..
तितक्यात आम्हाला आवाज आला..

" ओ भाऊ.. इकडे या, गरमागरम मसालेदार चहा पिऊन जावा. "
आयला.. ह्या पहाडी भागात मराठी भाषेत आम्हाला कोण आवाज देतय..?
ते पाहायला, आम्ही तिथे गेलो. तर तिथे, एक त्याच भागातील व्यक्ती चहाची छोटीशी टपरी टाकून व्यवसाय करत असताना आम्हाला आढळला.
आमच्याशी.. असल्लीखीत मराठीत संवाद साधत.. तुम्ही कुठले, काय, कोठून आलात म्हणून आम्हाला तो विचारू लागला.
आणि स्वतःच म्हणाला.. पूर्वी मी सुद्धा पुण्यात कामाला होतो. आता, इथेच राहून मी व्यवसाय करत असतो. त्या उत्तराखंडी पुणेरी मित्राने, आम्ही पुणेकर असल्याचे ऐकून, खास आमच्यासाठी आलं टाकून एक नंबर पुणेरी स्पेशल चहा बनवून दिला. आम्ही सर्वांनी चहा पिला, सगळे मित्र मस्त ताजेतवाने झालो. आणि त्याची माहिती विचारली,
तर म्हणाला.. पाच वर्ष पुण्यातील खराडी मध्ये मी एका चहाच्या दुकानात कामाला होतो. आता, कायमस्वरूपी इथे आलो आहे. आपल्या बायका पोरात निघून आलेल्या या मित्राचा मला फार हेवा वाटत होता. बायकांनी तरी, नवऱ्याशिवाय किती दिवस एकटं राहायचं हो..?
त्या मित्राला मी एकदा कडकडून भेटून घेतलं. आम्ही त्याला अलविदा केला,
आणि, पुढे निघालो.

अजून बरच मोठं अंतर कापल्यावर, आम्ही.. धरासू, उत्तरकाशी, या मोठ्या गावात जाऊन पोहोचलो. अजून बरंच अंतर कापायचं बाकी होतं. पुढे गेल्यावर, आम्हाला मणेरी नामक एक गाव लागलं. आमचा आज रात्रीचा मुक्काम याच गावात होणार होता, असं आम्हाला पवार म्हणाला. आणि, आम्ही पुढे कूच केली. त्यापुढे, भटवाडी, झाला, हरसील, लंका या गावातून प्रवास करत आम्ही पुढे निघालो.
सुंदर हिरवीगार झाडं आणि कमालीचा सुंदर असा निसर्ग आम्हाला गंगोत्रीच्या दिशेने खुणावत होता. मधेच, दूरवर दिसणारे हिमाच्छदित डोंगर.. आता तुम्ही, गंगोत्रीच्या जवळ आला आहात. असं पटवून सांगत होता. दुपारचे दीड वाजले होते, सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. भैरो घाटी येण्यागोदर, आम्हाला शेवटचं तीसेक किमी अंतर कापायचं होतं. कि लगेच गंगोत्री येणार होती. त्यामुळे, विसावा आणि पोटपूजा करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो.

दोनचार दिवसात मी तर त्या जेवणाला अगदी कंटाळून गेलो होतो. शेवटी मी, मध्यंतरी वादादित ठरलेली म्यागी खायचं ठरवलं. दहा मिनिटात गरमागरम म्यागी माझ्यासमोर आली. तसा मी, ताबडतोब तिचा फडशा पडला. बाकी मित्र जेवणच करायचं म्हणून काय काय मिळेत ते विचारात होते. तितक्यात.. तिथे सुद्धा, एक मुलगा आमच्याशी तोडक्या मोडक्या मराठीत बोलला. आणि म्हणाला.. काळजी करू नका, तुम्हाला मस्त महाराष्ट्रीयन जेवण बनवून देतो.
मग काय, सर्व मित्रांनी त्यांना हव्या आहेत त्या भाज्या त्याला बनवायला सांगितल्या. आणि मजबूत जेवले सुद्धा. विचारपूस म्हणून मी त्या खानसामांना म्हणालो..
तुम्ही इथे काय करताय..?
तर म्हणाले, आता आपल्या पुण्यात कडक उन्हाळा असतो. आणि, आम्हाला ते उन काही सहन होत नाही. त्यामुळे, हे चारपाच महिने सुट्टी घेऊन आम्ही आमच्या गावी येतो.
तेवढंच.. घरी राहिल्याचा आनंद. आणि इथे काम करून दोन आगावू पैसे सुद्धा मिळतात. कारण, आम्ही सगळ्या कामात वाकबगार आहोत.
त्यांच्या व्यवहारिक जगण्याला, पुन्हा एकावर सलाम केला. आणि, पुढील मार्गाने आम्ही गंगोत्रीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलो..

क्रमशः
No comments:
Post a Comment