चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- पंधरा..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जसं काही आपल्याकडील सगळं काही लुटून नेलं असावं. अशा अविर्भावात हताश होऊन पवार गाडी चालवत होता. शेवटी मीच त्याची समजूत काढली, आपल्या भागातील परिस्थिती त्याच्यासमोर कथन केली. पण गडी काही ऐकायला तयार नव्हता. त्या पोलिसाच्या सात पिढ्यांचा उद्धार करत, तो त्यांना शिव्या शाप देत होता.

मेरी गलती नही है, सत्यानाश हो जायेगा हरामखोरोंका..!
जे कि, त्या पोलिसांनी तो दंड सरकारी खात्यात जमा केला होता. त्याची रीतसर पावती सुद्धा त्याला दिली होती. पण त्याचं मन काही ऐकायला तयार नव्हतं.
शेवटी.. थोडं विषयांतर करत, मी त्याला मस्त देवाधर्माची गाणी लावायला सांगितली. आणि, काहीतरी करून त्याचं मन वळवण्यात मी यशस्वी झालो.
त्याला म्हणालो.. पवार, एखाद्या चांगल्या ठिकाणी जेवण करायला थांबव. बरंच अंतर कापल्यावर, घाटामध्ये आम्हाला एक चांगलं हॉटेल आढळून आलं. पवारने त्याठिकाणी आमची गाडी पार्क केली. वेळात वेळ साधून, सगळे जन सगळ्या बाजूने फ्रेश झाले. जेवणाची ऑर्डर दिली गेली.

अशा भागात गेल्यावर, जिव्हेचे चोचले करण्यात काहीएक अर्थ नसतो. सरळ, जेवणाची थाळी घेऊन मोकळं व्हायचं असतं. पण काही मित्रांनी आग्रह धरला, कि आज जरा वेगवेगळ्या भाज्या आणि रोट्या घेऊयात. झालं, त्यांच्या म्हणण्या प्रमाणे चारपाच भाजा आल्या. त्यांना म्हणावी अशी चव सुद्धा नव्हती. पण अतिरिक्त पैसा गेला, आहे म्हणून सगळे जन अगदी मिटक्या मारत ते खात होते. आणि नेमकी त्यातली एक भाजी लागलेली ( शिळी ) होती. भाजीला आंबट वास येत होता. हा प्रकार घडण्यापाठीमागे, एक फार मोठं कारण आहे. त्या भागात कायम थंड वातवरण असल्याने, भाज्यालवकरखराबहोतनाहीत. त्यामुळे ते भरमसाठ भाज्या एकदमच उकडून ठेवतात. आणि, गिर्हाईकांना लागेल तशा बनवून देत असतात. त्यात, जास्ती दिवस मागणी न होणारी किंवा राहिलेली भाजी खराब होणारच ना. त्या भाजा फेकून न देता, मसाला टाकून चमचमीत बनवून ते आपल्या माथी मारतात. आणि, रोख रक्कम मोजून सुद्धा घेतात. आपण तक्रार केल्यावर म्हणतात..
त्या समोर बसलेल्या लोकांनी सुद्धा हीच भाजी खाल्ली होती. त्यांची काही तक्रार नाही. आणि तुम्ही काय म्हणून तक्रार करताय..!
शेवटी.. डोकं लावण्यात काहीच अर्थ नव्हता. जिथे आठशे रुपये बिल होणार होतं त्याठिकाणी, सोळाशे रुपये घालून आम्हाला अक्कल शिकावी लागली.

इथून पुढचा रोड, थोडा मोकळा आणि सुटसुटीत होता. रुद्रप्रयाग हे मोठं ठिकाण जवळ येऊ लागलं होतं. रुद्रप्रयाग पासून सुमारे पन्नास किमी अलीकडे रस्त्यावर पुन्हा एकदा आम्हाला जाम लागला. वाहनांच्या अर्धा एक किमीच्या लाईनी लागल्या होत्या. काय घडलं आहे ते पाहायला आम्ही पुढे चालत गेलो. रस्त्यावर दोन भली मोठी झाडं पडली होती. आणि सगळा रस्ता त्याने व्यापून गेला होता. जेसीबीच्या अथक प्रयत्ना नंतर ती झाडं हटवली गेली. तोवर अर्धा तास वाया गेला होता. हि वेळ भरून काढण्यासाठी सर्व वाहनांची धावपळ सुरु झाली. रुद्रप्रयाग आलं. रुद्रप्रयाग येथे अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम आहे. त्या संगमाला, दुरून नमस्कार करत आम्ही पुढे कूच केली. पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरु झाली. दुपारचे चार वाजून गेले होते. आजचा मुक्काम, सोनप्रयाग येथे अलीकडील बाजूस होता. त्याकरिता, अजून ७५ किमी अंतर आम्हाला कापायचं होतं. तोच घाटमाथ्याचा रस्ता, आणि तेच मातकट डोंगर समोर आडवे उभे होते. दिवस असल्याने पावसाचं भय वाटत नव्हतं. प्रवास चालू असताना, आम्हाला एक गोड बातमी मिळाली. माझ्यासोबत प्रवास करत असणाऱ्या, तीन मित्रांचं कामामध्ये प्रमोशन झालं होतं. सर्वांचा आनंद आणखीनच द्विगुणित झाला. पुढे पन्नास किमी अंतर चालून गेल्यावर, गुप्तकाशी नामक एक ठिकाण लागलं. तिथे देवदर्शन आटोपलं. इथूनपुढे पंचवीस किमी अंतरावर सोनप्रयागच्या अलीकडे साधारण सात आठ किमी अंतरावर सीतापुर नावाच्या एका छोट्या गावामध्ये आमचा मुक्काम ठरला होता.
गुप्तकाशी ते सोनप्रयाग अत्यंत खडतर असा मार्ग. दुरूनच बर्फाचे डोंगर आम्हाला स्पष्ट दिसत होते. रस्ते अवघड जरी असले. तरी चकाचक होते. आणि सर्व चालक एकमेकांना मान देत शिस्तीने प्रवास करत होते. त्यामुळे अपघाताची भीती नव्हती. हि फार मोठी जमेची बाजू होती. मुक्काम स्थळी पोहोचल्यावर, पहिली लॉजची काही सोय होतेय का ते आम्ही पाहू लागलो. रात्रीचे सात वाजून गेले होते, थंडीचा कडाका सुरु झाला होता. हाडं गोठवणारी थंडी काय असते. ते मला यावेळी पक्कं समजलं होतं. त्या भागात लॉजचं प्रमाण अत्यल्प असल्याने. लॉज मालक अव्वाच्या सव्वा रकमा सांगत होते. काम बजेटमध्ये व्हायला हवं म्हणून थोडी शोधाशोध केली. बाराशेला एक आणि हजार रुपयाला एक अशा दोन रूम आम्हाला मिळाल्या. या रूम इतक्या स्वस्तात मिळाल्या ते का..? तर तीन दिवस झाले, त्या भागात आणि आम्ही घेतलेल्या लॉजवर सुद्धा लाईट नव्हती. तिथे भेटलेला एक मराठी माणूस आम्हाला म्हणाला..
भाव ताव करत बसू नका. एकतर लॉज फार कमी आहेत. नाहीतर, रात्रभर तुम्हाला थंडीत पडावं लागेल. त्या व्यक्तीचा सल्ला मानून, लॉज मालकाला ताबडतोब पैसे देऊन आम्ही पहिल्या रूम ताब्यात घेतल्या. रुममध्ये सामानं टाकली, थोडं फ्रेश झालो. गरमागरम जेवण केलं, आणि लागलीच झोपी गेलो. कारण, उद्या सकाळी.. पहाटे चार वाजता " केदारनाथ " च्या दिशेने आमचा मुख्य प्रवास सुरु होणार होता.

क्रमशः
No comments:
Post a Comment