चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- बारा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आज सकाळी उशिरा आल्याने मी त्याला छेडलेला प्रसंग आठवून, पवार अजून सुद्धा मला पाहिल्यावर गालातल्या गालात हासत होता. मला पाहून मुद्धाम नजर चोरायचा. आमची जेवणं उरकली,
आणि आम्ही.. पुढे गंगोत्रीच्या दिशेने निघालो,
आता मात्र रस्ता फारच कठीण झाला होता. रस्त्यावर डांबर असं नाहीच, फक्त मातीचा घसरडा रस्ता, त्यात सुद्धा अरुंद रस्ता असल्याने, जाण्याकरिता एकावेळी एकच बाजू सुरु असायची. बाकी वेळ, अगदी जागेवर गाडी उभी असायची. आततायीपणा करून बिलकुल चालायचं नाही. नाहीतर.. " राम नाम सत्य है "

घाटमाथ्यावरून जात असताना, सहजच माझं खाली दरीमध्ये लक्ष गेलं. तर त्याठिकाणी, खोल दरीत दोनचार गाड्यांचे गंजलेले लोखंडी ढाचे मला दिसले..
सहज म्हणून मी पवारला म्हणालो.. हे ढाचे कोणी बाहेर काढत नाहीत का..?
तर म्हणाला,
इथे पडल्यावर, जिवंत माणसं बाहेर निघत नाहीत, तर या भंगार ढाच्यांना बाहेर कोण काढणार..?
त्याच्या या उत्तरवार निरुत्तर होत. माझ्या मनाला धीर देत,
पुकारता चला हु मै, गली गली बहारकी..
हे गानं गुणगुणत.. मी पुढे पाहू लागलो. मी थोडा दचकलो आहे हे पाहून, पवार सुद्धा मिश्किलपणे माझ्याकडे पाहून. मला चिडवण्याची हौस भागवून घेत होता. बहुतेक त्याचं उट्ट तो काढत असावा..

पुढे गेल्यावर, खोल दरीतील एक लोखंडी पूल आम्हाला लागला. पवार आम्हाला असं म्हणाला, कि हा आपल्या भारतातला दरीभागातील सर्वात उंच पूल आहे. खरं, खोटं याचा विचार करायला आमच्याकडे वेळ नव्हता. तिथे.. फोटो काढू नका, असा बोर्ड लावला होता. तरी सुद्धा, आम्ही शहाणपणा केलाच.
गंगोत्रीच्या अलीकडे, पाच एक किमी अंतरावर आमच्या जाण्याच्या डाव्या बाजूला एक रस्ता निघाला होता. पवार म्हणाला.. या रस्त्याने पुढे गेल्यावर पन्नास किमी अंतरावर चायना आहे..!
किती मोठं कुतूहल आमच्या मनात जागृत झालं.
पण पवारने, पुन्हा एकदा त्याचा पत्ता टाकला. आणि म्हणाला, " बीचमे भारत का पहेरेदार हिमालय है " उसे पार करके जाणा पडता है. या सगळ्या गोष्टी ऐकताना खूप सोप्या वाटतात. पण तसं नसतं. परंतु याच मार्गाने, बरेच भाविक लोक..
मानसरोवर यात्रेसाठी सुद्धा जात असतात. ती यात्रा करण्याची सुप्त इच्छा माझ्या मनात सुद्धा दडलेली आहे. बघुयात, कसं काय जमतंय ते..!
शेवटी एकदाचं आम्ही गंगोत्रीच्या पायथ्याला पोहोचलो.
चारधाम यात्रेत.. यमुनोत्री मध्ये पायी प्रवास आहे. तर, गंगोत्री अगदी सपाटीला आहे. पुन्हा, केदारनाथला मोठी चढण आहे. तर, बद्रीनाथ बिलकुल सपाट भागात आहे. त्यामुळे, एकाड एक पायी यात्रा असल्याने. भाविकांना थोडा आराम नक्कीच मिळतो.

गंगोत्रीचा मुख्य उगम, ज्याला गोमुख म्हंटल जातं. ते, या मंदिरापासून सुमारे अठरा किमी लांब अंतरावर आहे. भयंकर अवघड रस्ता असल्याने, मोजके भाविकच त्या मुख्य स्थळा पर्यंत जात असतात. एवढी मोठी पायपीट शक्य नसल्याने. आम्ही सुद्धा तो मोह आवरता घेतला. पण मनोमन मला खूप वाईट वाटत होतं. नाही हो, अशा ठिकाणी परत येनं म्हणजे त्याला सात जन्माची पुण्याईच असायला हवी..
खळाळत्या गंगेचं रौद्ररूप आणि तिचा प्रवाह पाहून आपला जीव अगदी घाबरा होऊन जातो. इतका भयंकर वेग, तिने प्राप्त केला आहे. हिमालयाच्या अजस्त्र रांगांमधून सुरु झालेला तिचा प्रवास, मोठमोठ्या ग्लेशियर आणि पर्वतांना चिरत आक्राळविक्राळ पणे खाली येतो. त्यामुळे, गंगेच्या पाण्याला त्याठिकाणी एक मातकट रंग प्राप्त झाला आहे. परंतु, नीट निरीक्षण करून पाहिल्यावर त्या मातकट पाण्यावर " मोतीया " रंगाचा चकाकता तवंग आपल्याला आढळून येतो. हिमालयाच्या गर्भात, अनेक रत्नांच्या राशी दडलेल्या आहेत. त्याचं.. हे, म्या डोळा पाहिलेलं जिवंत उदाहरण होय.
तेथील.. लहान-लहान दगडात सुद्धा, विविध प्रकारच्या धातूंची चमक आपल्याला आढळते.
गंगेच्या त्या विशाल प्रवाहाशेजारी मी उभा राहिलो. गंगा मातेला प्रेमपूर्वक नमस्कार केला. आणि, माझे चरण मी तिच्या निर्मळ जलात ठेवले. ते इतकं भयंकर थंड पाणी होतं. कि मी ताबडतोब माझे पाय पाण्याबाहेर काढून घेतले. समोरच्या बाजूला, काही वृद्ध महिला पुरुष त्या थंड पाण्याने अंघोळ करत होते. मनोमन त्यांना दंडवत केला. गंगा भागीरथी मध्ये मी अर्धस्नान केलं. गंगेचं पवित्र जल प्राशन केलं. आणि, भागीरथी नदीमधून मी काढता पाय घेतला.

गंगा उगमाच्या वरच्या बाजूला, चीडवासा, भोजवासा आणि गोमुख हि अत्यंत खडतर चढाई असलेली ठिकाणं आहेत. गंगोत्री बाबत अशी आख्यायिका सांगितली जाते. कि,
राजा, सगर.. यांनी, अश्वमेघ यज्ञासाठी एक घोडा सोडला होता. अश्वमेघ यज्ञ पूर्णत्वास आल्यावर, इंद्राने आपलं इंद्रासन जाताना पाहून. त्या अश्वाला चोरून त्यांनी कपिल मुनी यांच्या आश्रमात बांधून ठेवला. सगर राजा, यांचे साठ हजार पुत्र त्या घोड्याच्या शोधार्थ निघाले. आणि ते, शेवटी कपिल मुनी यांच्या आश्रमात पोहोचले. तिथे, कपिल मुनींना ध्यानस्थ अवस्थेत पाहून. ते, त्यांना शिवीगाळ करू लागले. तपस्या भंग झाल्यावर, कपिल मुनींनी क्रोधीत होऊन, त्या सर्वाना भस्मसात केलं.
आपल्या या पितरांना तारण्याकरिता, भगीरथ राजाने गंगेकारिता कैलाश पर्वतावर शिव शंकराची घनघोर तपश्चर्या केली. शेवटी, भगीरथावर प्रसन्न होऊन गंगेने मृत्युलोकात येनं स्वीकार केलं. आकाशातून पाताळात उतरणाऱ्या गंगेच्या अजस्त्र प्रवाहाला, शिवजींनी आपल्या जटेमध्ये सामाऊन घेतलं. तिथून पुढे गंगा प्रवाहित होत, हिमालयाच्या अजस्त्र रांगांना तोडत फोडत गंगा सागरावरून वाहत, कपिल मुनी यांच्या आश्रमात भगीरथाच्या पूर्वजांना तारत पुढे समुद्राला जाऊन मिळाली. अशा रीतीने भगीरथ राजाच्या पूर्वजांना मुक्ती मिळाली.
भगीरथ राजाने, कठीण तपस्या करून गंगेला पृथ्वीवर येण्यास भाग पाडलं. त्यामुळे, त्याठिकाणी गंगेला " भागीरथी " या नावाने संबोधलं जातं. म्हणून..
गंगा स्नान केल्याने, व तेथील पाणी आचमन केल्याने. मनुष्याला वैकुंठ प्राप्त होतो. अशी, श्रद्धा आहे..

क्रमशः
No comments:
Post a Comment