चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- एकवीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उबदार स्लीपिंग ब्याग मध्ये, मी झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. माझा डोळा लागतो न लागतो तोच, तंबूच्या ताडपत्रीचा फडफड करण्याचा आवाज मला जाणवला. जोरदार वारं सुरु झालं होतं. टप-टप-टप, पावसाच्या मोठमोठ्या थेंबांचा मला आवाज येऊ लागला. पुन्हा एकदा अनामिक भीतीने माझं मन बावरं झालं.
आपल्या भागात पाऊस पडायला लागला, कि आपण भलतेच खुश होत असतो. पण या भागात पाऊस पडायला लागला. कि सगळीकडे घबराटीचं वातावरण निर्माण होतं. पावसाचा जोर वाढेल असा मला अंदाज होता. परंतु नाही, पाऊस आणि वारा आल्या पावलीच माघारी निघून गेला होता. सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. तंबूमध्ये चालू असणारी ट्यूब लाईट आणि तिचा स्वच्छ पांढरा रंग मला शांती आणि शांततेचा संदेश देत होता. परंतु, डोक्यातील दुष्ट विचार काही केल्या थांबत नव्हते. विचार करून-करून, शेवटी माझा मेंदू सुद्धा थकला. आणि, कधी एकदा मी घाराघुर झालो, त्याचा मला तपासाच लागला नाही.

पहाटे पाच वाजताच, तिकडे झुंजूमुंजू सुरु झालं. लोकांच्या धावपळीचा आवाज येऊ लागला. सकाळच्या वेळी, हिमालयावर पडणारी सूर्याची कोवळी उन्ह हिमालयावर सोनेरी चादर पांघरतात असं मी ऐकून होतो. ते प्रत्यक्ष डोळ्याने पाहता यावं, म्हणून मी घाईघाईने उठलो, आणि तंबूच्या बाहेर पडलो. सूर्याची पहिली किरनं, हिमालयावर नुकतीच अच्छाद्ली होती. अगदी टोकाला.. त्या हिमालयाने सोनेरी टोपी परिधान केली असावी. असा, भास होत होता. तो नयनरम्य नजारा टिपण्यासाठी, बर्याच भाविकांची एकच झुंबड उडाली होती. मी सुद्धा, त्या क्षणाचा साक्षीदार होत. ते क्षण माझ्या डोळ्यात आणि केमेऱ्यात बंधिस्त केले.
तिथूनच जवळ असणाऱ्या, मंदाकिनीच्या घाटावर मी गेलो. पुरात वाहून गेलेला मंदाकीनीचा घाट, आता खूपच मस्त आणि मोठ्या स्वरुपात बनवला गेला आहे. त्याठिकाणी, मी मुखमार्जन केलं. अर्ध स्नान आटोपलं. आणि, पुन्हा एकदा आमच्या तंबूच्या दिशेने मी माघारी फिरलो.

सर्व मित्रांची आवराआवर झाली होती. आम्ही दोन मित्र सोडून, बाकी सगळे मित्र अगदी तंदुरुस्त होते. आणि, परतीच्या पायी प्रवासासाठी उत्सुक सुद्धा होते. त्यांनी, आम्ही काही चालत येणार नाही हे हेरलं. आणि, त्यांच्या पायी प्रवासाला सुरवात केली.
माझा सोबती असणारा दुसरा मित्र तर इतका थकला होता. कि, विचारता सोय नाही. सकाळचे साडेसहा वाजले होते. सोनप्रयाग येथून हेलिकॉप्टरच्या फेऱ्यांना नुकतीच सुरवात झाली होती. माझा मित्र जीद्धीला पेटला, कि आपण दोघे हेलिकॉप्टरनेच खाली जाऊयात. परंतु, मला माहिती होतं. हे काही शक्य नाहीये..!
कारण, फक्त जाण्याकरीताची किंवा परत येण्याकरीताची बुकिंग होत नसते. तरी सुद्धा, त्याची बोळवण करण्याकरिता. मी त्याला, त्या ऑफीसमध्ये घेऊन गेलो. आणि चौकशी केली, त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगितलं. आणि वर म्हणाला, जास्तीचे पैसे देवू केले तरी हे काम जमणार नाही. नाही म्हणता, अशा लोकांना त्यांचा बाप दाखवल्यावर संपूर्ण हेलिकॉप्टर ते आपल्या नावे करून देतील. तर, बाकीच्या गोष्टी फार निराळ्या आहेत. पण, त्यांचा बाप दाखवण्या इतपत आपली पोहोच कुठे आहे..?
त्यामुळे, नाऊमेद होत आम्ही तेथून निघालो. सकाळच्या पारी, हेलिकॉप्टरच्या पंख्याचा वारा अंगाला खूपच झोंबत होता. पंख्याच्या वार्याची झोंब अंगात साठवत, आणि " बाप माणूस " होण्याची मनोकामना मनी बाळगत. पुन्हा एकदा, केदारनाथ मंदिराच्या कळसाला दुरून नमस्कार केला. आणि, पायी चालायला सुरवात केली.

जाऊदेत.. हेलिकॉप्टरचा प्लान फेल झाला, पुढे घोड्याच्या थांब्यावरून किमान घोडा करून तरी जाऊया म्हणून आम्ही चालत पुढे निघालो. प्रत्येक पावलागणिक माझा डावा नि उजवा गुढगा मला शिवी हासाडायचा, मी सुद्धा त्यांची समजूत काढायचो. अरे मित्रांनो, मला कळत नाही का. तुमच्यासाठी मी प्रयत्नशील आहेच कि. तेंव्हा मात्र ते समजूत काढल्यावर कर कर करत गुपचूप चालू लागायचे. शेवटी एकदाचे आम्ही बेस केम्पला पोहोचलो. गौरी कुंडावरून पहाटे तीन एक वाजता निघालेले भाविक आत्ता कुठे वर पोहोचू लागले होते.
खालून वर आलेल्या दोनचार घोडेवाल्यांना आम्ही खाली येण्यासाठी विचारणा केली. त्यावर त्यांचं उत्तर होतं. " हम भी आदमी है यार, मशीन नही..! " आम्ही पहाटे दोन वाजता चालत निघालो आहोत. आम्हीच काय, आमचे खेचर सुद्धा खूप थकले आहेत. आता थोडावेळ आराम करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. थोडा वेळ म्हणजे नेमका किती वेळ..? असं त्याला विचारलं, तर म्हणाला.. दोपहर दो बजे निकलेंगे, शेवटी त्याला दोन हजार रुपये देण्याचं लालच दाखवलं. तर म्हणाला, आता आम्हाला झोपायचं आहे. जास्ती चौकशी करू नका. आम्ही अशा प्रलोभनांना भुलणार नाही.
हे सगळं ऐकून, आमची तर पाचावर धारण बसली. त्या भागात, आता तर पैसा सुद्धा कामाला येत नव्हता. दुपारी दोन वाजता निघावं, तर घोडा भेटेलच याची सुद्धा शास्वती नव्हती. तिथुनपुढे जायला चार तास लागणार, तोवर सगळे मित्र आमची वाट बघत थांबणार, आणि आमच्या नावाने खडे फोडणार. हे सगळं टाळण्यासाठी, मी माझ्या गुढग्यांच्या पाया पडलो, त्यांना हात जोडले आणि म्हणालो. बाबांनो, हा देह आता तुमच्या जीवावर अवलंबून आहे. बघा.. दया दाखवा माझ्यावर. माझे गुडघे खूपच थकले होते. थोडीशी कुरबुर करत, त्यांनी मला हिरवा सिग्नल दिला. आणि, पुन्हा एकदा घाट माथ्याच्या उतारावर माझी पायगाडी सुसाट वेगाने धाऊ लागली.
ह्या घोड वाल्यांचा नेमका काय प्रोब्लेम झाला आहे. ते मला, ताबडतोब समजलं. एकतर, खालून वरती जाण्याकरिता भाविक घोडा घेत असतात. वरतून खाली येताना उतार असतो. त्यामुळे, खाली येताना कोणी घोडा घेईल कि नाही..? याची शास्वती नसते.
आणि, त्यात मुख्य कारण म्हणजे, घोडे मालकांना किंवा त्यांच्या घोड्यांना केदारनाथ धामाच्या ठिकाणी मुक्कामाला एखादा तबेला किंवा त्या घोडे मालकांसाठी एखादा विनामुल्य तंबू त्याठिकाणी ठेवेलेला नाहीये. किंवा, तशी व्यवस्था केली गेली नाहीये. पण हि व्यवस्थाकरायला काय हरकत आहे..?
बहुतेक, मागे आलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये या सगळ्या गोष्टी सुद्धा पाण्यासोबत वाहून गेल्या असाव्यात. आता, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्याने कराव्या लागतील. पण त्यामुळे नेमकं होतंय काय, खालून वरती जाण्याकरिता भाविकांकडून घोडेमालक अव्वाच्या सव्वा रकमा उकळत आहेत. आणि, आल्या पावली.. थोडा आराम करून मोकळा घोडा घेऊन ते खाली जात आहेत. कारण, खाली जाण्याकरिता जवळपास सगळेच भाविक पायी जाण्याला प्राधान्य देत असतात. पण एक गोष्ट आहे बरं का, हि घोडे मालक लोकं खाली जात असताना सुद्धा त्या घोड्यावर बसत नाहीत. त्याच्यासोबत पायी जात असतात.
पण आपण, त्या घोड्यांचा आणि घोडे मालकांचा सुद्धा थोडा . एका दिवसात, रोजच्या रोज खाली वर करायची कोणाला हौस आली असेल का..? कारण, रोज पहाटे दोन वाजता यांचं काम सुरु होत असतं. तेच, हे जर वरती मुक्क्माला थांबले. तर, थकल्या भागल्या भाविकांना दोन नाही किमान हजार रुपयात तरी खाली घेऊन येतील कि नाही. शरीराची झीज, घोड्याची झीज, आणि हाती काहीच नाही. जाऊदेत, काळानुरूप यात सुद्धा काही बदल नक्कीच होतील, अशी आशा करूयात..

जीवाला त्रास करून घ्यायचा नाही. आणि, दैवी इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही. हा नवा मंत्रोच्चार करत मी पुढे मार्गक्रमण करत होतो. निसर्गाचा रम्य अवतार नजरेत साठवत, जितका जवळचा किंवा चोरवाट सापडेल असं पाहत आमचा प्रवास चालू होता. माझा मित्र तर जाम वैतागला होता, त्याचा उत्साह वाढवण्यासाठी मी मुद्दाम त्याला म्हणालो. अरे वैतागू नकोस राव, रस्त्यावरून किती सुंदर सुंदर मुली चालत येत आहेत. त्यांना बघ मस्त फ्रेश होशील. त्यावर तो म्हणाला, पाय इतके दुखत आहेत कि, " पोरी " काय " परी " बघितली तरी मला आनंद होणार नाही. त्याच्या या वाक्यावर हसावं कि रडावं तेच मला समजत नव्हतं.
चालत बोलत, आम्ही जवळपास निम्म अंतर कापलं होतं. मी माझ्या पायांचे आभार मानत होतो. लीनचोली टापुवर माझ्या मित्राने आणि मी थोडी पोटपूजा केली. गरमागरम मेगी पोटात ढकलली, त्यावर वाफाळलेला चहा मारला. थोडे ताजेतवाने झालो, आणि नव्या दमाने पुन्हा एकदा आम्ही चालू लागलो. पोटात पेट्रोल गेल्यावर, माझ्या मित्राच्या चालण्याचा स्पीड वाढला, आता चालताना, त्याने मला बरच अंतर दिलं होतं. पण, माझ्या पायात तेवढा दम नव्हता, मी थोडा जरी स्पिड वाढवला, कि माझे गुडघे माझ्यावर लगेच दातओठ खायचे. त्यांच्या कलेकलेने मी चालणं घेत होतो. ते नाही होऊन पडले, तर सगळा खेळ खलास होणार होता. आता तर, माझा सोबती मित्र बराच पुढे निघून गेला होता, पण दूरवरून.. त्याची आकृती मला स्पष्ट दिसत होती. आणि मला सोडून, तो पुढे जाणार नाही. याची सुद्धा मला शास्वती होती. त्यामुळे, मी बिनघोर आणि सावकाश चालत होतो.
मी एकटाच चालत असताना,एका ठिकाणी फार गंमत झाली.. मी जाम दमलो होतो. पायांना विश्रांती मिळावी म्हणून. आजूबाजूला काही दिसतंय का ते पाहत पुढे चालायचो. कधी फुलांचे फोटो काढ, कधी डोंगरांचे फोटो काढ असं करत माझा प्रवास चालू होता.
आणि एका ठिकाणी..
माझ्यासमोरून एक घोडेवाला, एका जाडजूड बाईला घोड्यावरून घेऊन वरील बाजूस निघाला होता. घोडा कसला.. ते खेचर होतं, तर नेमकं ते खेचर माझ्यापाशी आल्यावर. लगबगीने घोडे मालकाने, त्या बाईला घोड्यावरून खाली उतरवायचा प्रयत्न केला. त्या बाईला काही समजेनाच, कि हा नेमका काय प्रकार चालू आहे.
कारण..
" घोडा.. हा त्याच्या उभ्या आयुष्यात कधीच खाली बसत नाही...! जेंव्हा तो मरेल, तेंव्हाच तो खाली पडतो..! " आणि हाच त्याचा शेवटचा आराम असतो.
पण, ह्या खेचरांना हुक्की आल्यावर, लोळी खायची सवय असते. म्हणजे, त्या ठराविक वेळी, ते आपलं सगळं अंग जमिनीवर टाकून मस्त लोळून घेतात. आणि चक्क मेल्यासारखं जमिनीवर पडून राहतात. जोवर, त्यांचा आळस जात नाही. आपल्या अंगातील आळस बाहेर काढताना आपण कशा चित्रविचित्र हालचाली करत असतो, अगदी तशाच.
त्यांचा आलास संपेपर्यंत हि प्रक्रिया चालू असते. चुकून, घोडे मालकाने यात व्यत्यय आणायचा प्रयत्न केला. तर मग, ते खेचर त्याच्या बापाचं सुद्धा ऐकत नाही.
शेवटी, लगबगीने ती महिला त्या घोड्यावरून खाली उतरली, आणि लागलीच त्या घोड्याने आपलं अंग जमिनीवर टाकलं, आणि मेल्यासारखं ते पडलं. हा सगळा प्रकार पाहून, ती बाई मात्र जाम घाबरली,
चुकून.. येवढा मोठा देह, घोड्यावरून खाली पडला असता. तर काय झाला असतं..?
या विचाराने, घेरी येऊन ती एका मोठ्या दगडाला टेकून देवाचे आभार मानत, फतकल मारून खुशाल बसली होती.

थोडी गमंत पाहून झाली, तेवढ्यात माझ्या पायांना सुद्धा थोडा आराम मिळाला होता. आता पुढे निघावं, म्हणून एक पाऊल पुढे टाकलं. आणि, माझ्या गुढग्यात जोरदार चमक भरली. शेवटी.. मीच त्या गुढग्यावर रागावलो,
नको तेंव्हा मज्जा करतोस ना..? आणि, आता का म्हणून मला त्रास देत आहेस..?
माझ्या बोलण्याचा रोख, बहुतेक त्याला समजला असावा.
तिथून पुढे मात्र, त्याने मला काहीएक त्रास दिला नाही. नाही म्हणता, मी सुद्धा त्याची फार काळजी घेत होतो.
किती चालायचं..? सकाळचे अकरा वाजून गेले होते. शेवटी, थकून भागून माझा पुढे गेलेला मित्र सुद्धा माझी वाट पाहत वाटेत थांबला होता.
पिशवीत माझ्याकडे असणारं पाणी सुद्धा संपलं होतं. उन्हाच्या कडाक्याने, तहान खूप लागत होती. शेवटी, नैसर्गिक नळाचे पाणी, मी माझ्याकडील रिकाम्या बाटलीत भरलं. आणि.. ढसाढसा पिलं सुद्धा. तेंव्हा कुठे मला जरा बरं वाटलं.

उन, वारा झेलत मी निघालो होतो. नशीब, आज पावसाने सुट्टी घेतली होती.
अजून, शेवटचं दोन किमी अंतर जायचं बाकी होतं. पण ते सुद्धा माझ्या खूप जीवावर आलं होतं. शेवटी काही नाही, तर माझ्या मोबाईलला रेंज आली होती.
आमचे बाकी सगळे मित्र, गौरी कुंडा पर्यंत जाऊन पोहोचले होते. आणि तिथे पोहोचताच, त्यांचे आम्हाला फोनवर फोन सुरु झाले. एक झाला, दोन झाले, तीन झाले..
शेवटी, मीच वैतागलो.. आणि त्यांना म्हणालो,
आम्हाला यायला थोडा वेळ लागेल. आणि, पुन्हा चुकून सुद्धा फोन करू नका. नाहीतर, आम्ही लवकर येणार नाही. माझी हि मात्रा बरोबर लागू पडली. त्यानंतर, आम्ही गौरी कुंडा पर्यंत पोहोचे पर्यंत त्यांचा आम्हाला एकही फोन आला नाही.

शेवटी, दमत भागत.. आम्ही गौरी कुंडाच्या जीप स्थानकावर जाऊन पोहोचलो. तोवर, आमच्या काही मित्रांनी पुन्हा एकदा गौरी कुंडातल्या गरम पाण्यात त्यांचं स्नान आटोपलं होतं. खरच.. मला माझ्या त्या मित्रांचं फार कौतुक वाटत होतं.
" शेवटी..काही झालं तरी, शरीर संपदा हि फार महत्वाची असते. आणि, ती प्रत्येकाला मिळतेच असं नाही.! "
माझ्या पायाचे भडके उडत होते. गुडघे तर, रागाने माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नव्हते. शेवटी मीच, त्यांच्यावर हळुवारपणे माझा हात फिरवला,
तेंव्हा लाडीकपणे मला ते म्हणायला लागले.
जाऊदे, उगाच लाडीगोडी लाऊ नकोस. यावेळी फार त्रास दिलास तू आम्हाला.
त्यांच्या या लाडिक बोलावर,
तुम्हाला संध्याकाळी मस्त तेल मालिश करतो असं आश्वासन दिलं.

आणि, पुढील पाच किमी अंतर कापण्यासाठी, आम्ही त्या सरकारी जीप मध्ये बसलो.
क्रमशः
No comments:
Post a Comment