चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- बावीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उंच सखल घाटमाथा पार करत, सरकारी जीप सोनप्रयाग येथे येवून पोहोचली. वातावरणात भलतीच उष्णता जाणवत होती. त्या जीपमधून उतरल्या बरोबर मला थोडी कणकण जाणवली. असं घडणार आहे, याची मला पूर्वकल्पना आलीच होती.
दुपारचा एक वाजून गेला होता. पार्किंग मध्ये थोडी शोधाशोध केल्यावर, पवारची जीप आमच्यासमोर हजर झाली. कालचा पूर्ण दिवस आणि आज दुपार पर्यंत पवारने मस्त आराम केला होता. त्यामुळे, तो सुद्धा मस्त ताजातवाना वाटत होता.आम्हाला पाहताच तो म्हणाला..

सरजी.. दर्शन बढीया हो गया होगा..!
आम्ही सुद्धा, त्याला आमचा होकार कळवला. गाडीत असणाऱ्या आमच्या ब्यागा बाहेर काढल्या. त्यांना, टपावर व्यवस्थित बांधून घेतलं. आणि आमच्या पुढील प्रवासाला सुरवात झाली. चारधाम यात्रेतील, शेवटच धाम बद्रीनाथच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करायला सुरवात केली. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी प्रथमच इतके दिवस घाटमाथ्यावर प्रवास करत होतो. त्यामुळे, आताशा अशा भागात फिरण्यासाठीची माझी नजर मरून गेली होती. सुरवातीला जशी भीती वाटत होती. तशी भीती आता वाटत नव्हती. कारण, समोर विषय एकच होता.
" आर नाहीतर पार "
अर्ध्या तासात, परवा आम्ही मुक्काम केलेल्या सीतापुर नावाच्या गावामध्ये आम्ही येऊन पोहोचलो होतो. काही मित्रांनी आग्रह धरला,
कि.. परवा याठिकाणी, आपल्याला चांगलं जेवण मिळालं होतं. त्यामुळे, आजसुद्धा आपण इथेच जेवण करूयात. जेवणाची वेळ सुद्धा झाली होती. आणि, परवाच्या नियोजित ठिकाणी आम्ही गाडी थांबवणार, तितक्यात त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या पोऱ्याने हातानेच आम्हाला इशारा केला. " जेवण संपलं आहे..! "
थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. आता, इथून पुढे गुप्तकाशी नावाचं जे ठिकाण येणार होतं. तिथे बऱ्यापैकी जेवण मिळेल. असं पवारने आम्हाला सुचवलं. आणि, पुन्हा एकदा आम्ही पुढे मार्गक्रमण करू लागलो. तासाभरात गुप्तकाशी आलं. एक चांगलं हॉटेल पाहून, आमची गाडी तिथे थांबली. आम्ही सगळेजण गाडीतून खाली उतरलो. माझी कणकण, बऱ्यापैकी वाढती झाली होती. पहाडातलं थंड पाणी, मला चांगलंच बादलं होतं. त्यामुळे, सर्दी खोकला आणि हलकासा ताप जाणवू लागला होता. सोबत, बोनस म्हणून अंगदुखी सुद्धा होतीच.

जीपच्या खाली उतरल्या बरोबर, आसपासच्या बाजूला कुठे दवाखाना आहे का ते मी पाहू लागलो. हॉटेल समोरच्या बाजूला, मला एक मेडिकल स्टोअर दिसलं. या भागात, जरा वेगळाच प्रकार आहे बरं का. येथील डॉक्टर लोकंच, मेडिकल स्टोअर सुद्धा स्वतःच कंडक्ट करत असतात. डॉक्टर सुद्धा तेच, आणि फार्मासिस्ट सुद्धा तेच.
मी.. तडक, त्या मेडिकल स्टोअर मध्ये गेलो. त्या डॉक्टरांना यात्रेतील सगळी हकीकत बयान केली. त्यांनी, काही विशिष्ट गोळ्यांचा चार दिवसांचा डोस मला दिला. सोबत, खोकल्याचं पात्तळ औषध सुद्धा दिलं.
ती सगळी औषधं घेऊन, मी हॉटेलमध्ये गेलो. गोळ्या खाण्याआगोदर पोटात काहीतरी असावं, म्हणून इच्छा नसतानाही थोडासा फोडणीचा भात पोटात ढकलला. आणि त्यावर, गोळ्या औषधं घेऊन गाडीमध्ये जाऊन बसलो.

केदारनाथ पासून बद्रीनाथ हे २२९ किमी अंतरावर आहे. आज संध्याकाळ पर्यंत, जेवढं अंतर पार करता येईल तेवढं बरंच आहे. असा विचार करत, आम्ही सगळे गाडीत बसलो. पवारने पुन्हा एकदा टेपवर एक धार्मिक कथा लावली. धार्मिक कथा ऐकता ऐकता, गोळ्या औषधांच्या अंमलाखाली माझा डोळा कधी लागला ते काही समजलंच नाही.
मधल्या काळात, कधीमधी माझा डोळा उघडायचा. आणि मी पुन्हा झोपी जायचो. तोवर, मी झोपेमध्ये असतानाच. अगस्त मुनी, रुद्रप्रयाग, गोचर, कर्ण प्रयाग, नंद प्रयाग हि ठिकाणं कधीच मागे पडली होती. संध्याकाळी सातच्या आसपास माझा डोळा उघडला. गोळ्या खूपच असरदार होत्या. मला थोडं बरं वाटू लागलं होतं. वातावरण सुद्धा अगदी मस्त होतं. कटेल तेवढं अंतर कापण्याच्या तयारीत असणारा पवार आम्हाला म्हणाला. आगे चमोली नामका गाव आयेगा. तिथे थांबायचं कि पुढे जोशीमठ पर्यंत जाऊयात..? आम्हाला या भागातील काय डोंबलं माहित आहे..?
आम्ही त्याला म्हणालो. तुला योग्य वाटेल त्या ठिकाणी थांबव. आणि पुन्हा एकदा पवारच्या गाडीने जोर धरला.

अचानकपणे, वातावरणात सुद्धा बदल घडू लागला. सपाटीच्या रस्त्याचं घाट मार्गात रुपांतर झालं होतं. आणि, हलकी म्हणता-म्हणता धुव्वाधार पावसाला सुरवात झाली. अंधार पडू लागला होता. खोल दऱ्या, अंधार आणि पाऊस तिघांनी आळीपाळीने आम्हाला भीती दाखवायला सुरवात केली. शेवटी मी पवारला म्हणालो. पवार, पुढे जायला नको. आपण चमोली मधेच थांबुयात. शेवटी त्याचा सुद्धा नाईलाज झाला. पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता.
शेवटी.. चमोलीच्या अलीकडे, दोनेक किमी अंतरावर पवारच्या नेहेमीच्या पट्टीतील एक धर्मादायी हॉटेल पाहून. आम्ही त्याठिकाणी थांबलो. कोणत्या तरी दानशूर व्यक्तीने अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर हॉटेल वजा धर्मशाळा बांधली होती.
प्रत्येकी दोनशे रुपयात इथे आमची राहण्याची सोय झाली. प्रत्येकाला सेप्रेट बेड होते. नाहीतर, इथून मागे मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला दोन तीन एक्स्ट्रा बेड घ्यावे लागायचे. दोन रुममध्ये, सहा व्यक्ती बेडवर आणि तीन व्यक्ती जमिनीवर हे नित्याचं गणित ठरलेलं होतं.

आपापलं सगळं सामान घेऊन आम्ही रुममध्ये गेलो. सुरवातीला यात्रेदरम्यान खरेदी केलेल्या सर्व वस्तू मोठ्या ब्याग मध्ये व्यवस्थित ठेऊन दिल्या. तेंव्हा कुठे सगळे जन निवांत झाले. आमच्या रुमच्या बाहेर, मोबाईल चार्जिंगसाठी काही एक्स्ट्रा स्विचेस बसवले गेले होते. काही यात्रेकरू, त्यांचे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी तिथे बसले होते. ती लोकं सुद्धा, नेमकी अहमदनगर भागातील नेवासा येथील निघाले. त्यांचा, ऐंशी जणांचा फार मोठा ग्रुप होता. बद्रीनाथ करून, ते पुढे नेपाळला जाणार होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. त्या लोकांनी, जेवणाचं सगळं सामान सोबत आणलं होतं. आणि, विशेष म्हणजे त्या हॉटेलमध्ये जेवण बनवण्याची सोय सुद्धा होती. त्यामुळे, ती लोकं निवांतपणे जेवण बनायची वाट पाहत होते. थोडसं फ्रेश व्हावं, म्हणून मी बाथरूममध्ये गेलो.
तर.. हे भयंकर थंड पाणी.
उगाच नावाला म्हणून, मी तोंड ओलं केलं. हातापायावर थोडं पाणी घेतलं. आणि, बाथरूमच्या बाहेर पडलो.
मला वाटलं, हि आपल्या भागातील लोकं आहेत. आता ओळख झालीच आहे. तर.. ते आपल्याला जेवायला वगैरे बोलावतील. किंवा, तसा आग्रह करतील..
कारण, ऐंशी लोकांच्या जेवणात आम्ही नऊ लोकं आरामशीर खपून गेलो असतो.
त्यांना थोडीशी हिंट द्यावी, म्हणून.. मी मुद्दामच त्या लोकांना म्हणालो.
चला.. आम्ही जेवण करून येतो..!
त्यावर, त्यांची प्रतिक्रिया होती. हा.. या जेऊन. तोवर आम्ही इथे बसतो..!

माझा प्लान सपशेल फेल झाला होता. विषय, पैसे खर्च होण्याचा नव्हता. तर, घरचं आणि आपल्या भागातील पद्धतीने बनवलेलं जेवायला मिळेल हा होता. कारण, इतके दिवस तेच तेच जेवून जेवणाचा अगदी कंटाळा आला होता. पण नाही, ते जेवण आमच्या नशिबी नव्हतं. साला नेमकी मलाच अशी लोकं भेटतात. नाहीतर, आम्ही जर त्या लोकांच्या ठिकाणी असतो. तर त्यांना आग्रह करून जेवू घातलं असतं. असो..
धर्मशाळेत, बाजूला एक हॉटेल सुद्धा होतं. तिथे आम्ही जेवण्यासाठी गेलो,
तिथे, त्या चमोली भागातील काही टुकार मुलं दारू पिऊन गोंधळ घालत बसले होते. थोड्या वेळाने ती मुलं तेथून निघून गेली. पावसाची सततधार सुरूच होती.
मी, आठवणीने पवारला जेवण्यासाठी बोलवायला गाडीपाशी गेलो. अंधारात काही दिसत नव्हतं. मी, थोडे डोळे किलकिले करून पाहिलं.
तर पवार.. गाडीमध्ये मस्तपैकी 'कोटर' लावत बसला होता. मी त्याला आवाज दिला, तर म्हणाला.. तुम्ही जेऊन घ्या, इथे मला जेवण आणि राहणं फ्री असतं. माझी काहीही काळजी करू नका.
पवारचं बाकी एक मला खूप पटायचं. ज्या हॉटेलमध्ये ड्रायव्हर लोकांना मोफत जेवण मिळायचं. त्या हॉटेलमध्ये, तो गुपचूप आमच्यापासून दूर बसून जेवायचा. आणि, त्याच्या जेवणाकरिता आम्हाला येणारा खर्च वाचवायचा.
नाहीतर.. काही ड्रायव्हर लोकं, आपल्याबरोबर जेवतील. आणि, त्याच्या जेवणाचं आपल्याला बिल द्यायला लावतील. आणि, सगळे प्रवासी गाडीत बसल्यावर. काहीतरी बहाणा करून, गाडीतून खाली उतरून आपल्या जेवणाचे पैसे त्या हॉटेल मालकाकडून घेऊन येतील. असे बरेच प्रकार सर्रास घडत असतात.

आमची जेवणं उरकली, आम्ही खाली रुममध्ये आलो. मी गोळ्या औषधं घेतली.. नाक, घसा, कपाळावर विक्स चोपडलं. आणि, अंथरुणावर अंग टाकलं.
तुम्हाला म्हणून सांगतो, आजचं मुक्कामाचं ठिकाण मला खूप आवडलं होतं. आम्ही राहत असलेला प्रशस्त हॉल, त्यामध्ये सुटसुटीतपणा असणारे बेड, मागील बाजूस वाहणाऱ्या अलकनंदा नदीचा सुमधुर खळखळाट. आणि, बाहेर पडणारा मुसळधार पाऊस. माझ्या मनाला खूप सुंदर अनुभूती देत होता. वचन दिल्याप्रमाणे, गुढग्यांना आणि पायाच्या पोटऱ्या ना मस्त पैकी तेल मालिश केली.
उद्या सकाळी सुद्धा, लवकर उठून आम्हाला प्रवासाला निघायचं होतं. अजून, शंभर एक किमी अंतर कापल्यावर बद्रीनाथ धाम येणार होतं. त्यामुळे, आम्ही पटकन झोपी गेलो.
बद्री विशाल कि जय म्हणत, मी या कुशीवरून त्या कुशीवर वळालो.

आणि.. काही वेळातच निद्रादेवीने, ताबडतोब मला तिच्या कवेत घेतलं सुद्धा..!
क्रमशः
No comments:
Post a Comment