काही व्यक्ती खरोखर खूपच वंदनीय असतात..!
अशा व्यक्तींचे विचार अगदी वाखाणण्याजोगे असतात. मला स्वतःला सायकल या विषयाचं महत्व समजल्याने. मी रात्रपाळीत असताना, सायकलवरून कामाला जात असतो. म्हणजे महिन्यातून मी साधारणपणे चारशे पन्नास किलोमीटर सायकल चालवतो.
माझी बाईक.. आता फार जुनी झाली आहे. दोन महिन्यांनी ती पंधरा वर्षांची होईल. त्यामुळे, सकाळ पाळीला कामाला जाण्यासाठी एक नवीन मोपेड घ्यावी. असा विचार माझ्या मनात घोळत होता.
हा विचार.. मी माझे मित्र, श्री. योगेश भाई यांना सांगितला. तर ते म्हणाले.. माझ्या एका मित्राचं आपल्या इथे दुचाकी गाड्यांचं शोरूम आहे. आपण तिथे चौकशी करून येऊयात.
हा विचार.. मी माझे मित्र, श्री. योगेश भाई यांना सांगितला. तर ते म्हणाले.. माझ्या एका मित्राचं आपल्या इथे दुचाकी गाड्यांचं शोरूम आहे. आपण तिथे चौकशी करून येऊयात.
त्या विषयाला..आजचा मुहूर्त निघाला, योगेश भाई आणि मी त्यांच्या मित्राच्या शोरूममध्ये पोहोचलो. दोन तीन मोपेडचं कोटेशन घेतलं. शोरूमचे मालक अजून आले नव्हते. त्यामुळे, भाईंनी त्यांच्या मित्राला फोन करून आम्ही शोरूममध्ये आलो आहोत ते सांगितलं. शोरूमचे मालक, अगदी तळागाळातील व्यक्ती आहेत. आणि शून्यातून त्यांनी हे विश्व निर्माण केलं आहे, हे ऐकून मला सुद्धा फार समाधान वाटलं. मराठी माणूस पुढे घोडदौड करतोय म्हंटलं, कि मला फार मोठा आनंद होतो.
काहीवेळात शोरूममध्ये मालक आले. #राजीव_जाधव असं त्यांचं नाव आहे. पुण्यातील कासारवाडी येथे, त्यांचं सुझुकी कंपनीचं #हिरा_सुझुकी नावाने एक तीन मजली भव्य शोरूम आहे.
तिथे ते आले तसे, येऊन आमच्या शेजारी बसले. नाहीतर एखादा व्यक्ती म्हणाला असता..
तिथे ते आले तसे, येऊन आमच्या शेजारी बसले. नाहीतर एखादा व्यक्ती म्हणाला असता..
" चला माझ्या केबिनमध्ये बसुयात..! "
पण कसं आहे, ज्या व्यक्तींचे पाय जमिनीवर असतात. तीच लोकं अशी सरळ आणि साधी वागू शकतात. भाईंनी माझी आणि त्यांची ओळख करून दिली. आमच्या थोड्या गप्पा झाल्या, चहापाणी झालं. त्यानंतर मला जी मोपेड हवी आहे, त्याचं कोटेशन मिळालं.
हे सगळे सोपस्कार पार पडल्यावर, त्या मालकांना मी म्हणालो. कसं आहे, मी रोजच्याला कामाला सायकलवरून जात असतो. पण सगळीकडे आपण सायकलवर जाऊ शकत नाही. त्याकरिता मी हि मोपेड घेत आहे. नेमका योगायोग असा घडला.. कि हे दुचाकी गाड्यांचे मालक सुद्धा, हल्लीच सायकलच्या प्रेमात पडले आहेत. आणि ते सुद्धा रोजच्याला.. तीसेक किलोमीटर सायकल चालवत असतात.

एक बाईक विकणारा व्यक्ती मला सांगत होता.. सायकल चालवनं हि काळाची गरज आहे. त्यामुळे चांगला व्यायाम होतो. आणि, त्याचे इतर सुद्धा बरेच फायदे आहेत.!
तर बोलता बोलता मला ते म्हणाले.. आमच्या इथे असणाऱ्या कर्मचारी वर्गाने मासिक पन्नास हजाराची एक भिशी सुरु केली आहे. मी सुद्धा त्यामध्ये मेंबर आहे. पण हि भिशी फोडण्याची आमची एक वेगळी पद्धत आहे. आमच्या मेंबर पैकी जो कोणी व्यक्ती भिशीच्या पैशातून सायकल खरेदी करणार असेल. त्या मेंबरला
" न मागता, त्या महिन्याचा नंबर देऊन टाकायचा. "
मग त्याने, त्या पैशात कितीही रुपयाची सायकल घेउद्यात. आणि बाकीचा पैसा आपल्या संसाराला लाउद्यात. त्यामुळे का होईना, लोकांना सायकल चालवायची सवय जडेल.
आहे कि नाही अगदी अजब प्रकार.. त्या मालकांच्या ठिकाणी जर आपण असतो. तर म्हणालो असतो. माझ्या शोरूममध्ये जो कोणी मोपेड खरेदी करणार असेल, त्याला लगेच नंबर मिळेल.
हाहाहाहा...थोडी गंमत केली.
हाहाहाहा...थोडी गंमत केली.
याला म्हणतात उच्च विचार आणि साधी राहणी. मोपेडच्या धावत्या जगात, मोपेड विकत, सायकल या विषयाचा वसा जपणारा, आणि प्रचार करणारा. हा एक आगळाच मनुष्य आज मला पाहायला मिळाला.
एका निस्वार्थी आणि जगा वेगळ्या अवलियाला भेटून, आज मला मनस्वी आनंद झाला..!
एका निस्वार्थी आणि जगा वेगळ्या अवलियाला भेटून, आज मला मनस्वी आनंद झाला..!
No comments:
Post a Comment