Saturday, 12 May 2018

पूर्णपणे फसलेला आणि उन्नत दृश्याने ठासून भरलेला..
सेक्सी #शिकारी..!
मुळात.. शिकारी या सिनेमाला कथानक असं नाहीये. ओढूनताणून निर्माण केले गेलेले द्विअर्थी विनोद, आणि नव्या जुन्या अभिनेत्यांचा खच्चून भरणा असणारा असा हा सिनेमा आहे. हा सिनेमा पाहताना, मला अगदी तमाशा पाहत असल्याचा भास झाला.
सिनेमात दाखवलेलं नदी किनारचं गाव नेमकं कोणतं आहे ते समजत नाही. वैभव मांगले, कोल्हापुरी हेलात बोलतो. तर त्याची बायको दाखवलेली नायिका कश्मिरा शहा, एक वेगळीच गावठी भाषा बोलताना दाखवली आहे. तर या दोघांची मुलगी मृण्मयी एका वेगळ्याच हेलात बोलताना आढळते. या सिनेमात कश्मीरा शहाणे सुद्धा बर्यापैकी बोल्ड सीन दिले आहेत.
त्यांचं गाव ते मुंबई हा प्रवास बोटीने दाखवला आहे. त्यामुळे, त्या गावाचा नेमका ठिकाणाच समजून येत नाही.
भाऊ कदम आणि टीमने सादर केलेले, तमाशा मध्ये असणारे, भरपूर पाचकट विनोद, आणि.. नेहा खान नावाच्या मादक अभिनेत्रीच्या भयंकर अंगप्रदर्शनाणे हा सिनेमा अगदी ठासून भरला आहे. फक्त गल्लाभरू म्हणून हा सिनेमा बनवला गेला आहे.
सगळे सिनियर प्लेयर थकले रे, हिला खेळाडू पाहिजे नवा, आणि.. भोर भयी पणघटपे.. रिमिक्स, हे आयटम सॉंग मस्त आहेत. बाकी दुसरा खास असा काहीच विषय नाहीये.
वयात आलेल्या मुलीला.. अभिनेत्री, मृण्मयी देशपांडे हिला लैंगिक विषयाची बिलकुल माहिती नाहीये. त्यामुळे ती निव्वळ मुलांत खेळताना दाखवली आहे. असं सुरवातीचं कथानक आहे.
हा सगळा प्रकार, तिचं लग्न झाल्यावर उघडकीस आलेला दाखवला आहे.
हि भूमिका या सिनेमातील फुलवा नावाच्या पात्राला दिली गेली आहे. आणि ते, कोणत्याच अंगाने प्रेक्षकांना पटणारं नाहीये.
महेश मांजरेकर यांच्याकडून किमान मला तरी अशा सिनेमाची अपेक्षा नव्हती.
तीनही अभिनेत्र्यांनी फारच मादक आणि बिनधास्त सिन्स दिले आहेत. सिनेमा पाहत असताना.. शहरी अभिनेत्री आणि, अभिनेते यांना गावरान हेलात ऐकताना. तळपायाची आग मस्तकात जाते. तर, रघु.. सुव्रत जोशी या नव्या अभिनेत्याची बाकी या सिनेमात भलतीच 'चंगळ' झाली आहे.
मुंबई नगरीमध्ये.. सिनेमात काम करण्याच्या अपेक्षेने येणाऱ्या तरुणींच्या वाट्याला काय अवहेलना लिहून ठेवलेल्या असतात. याचं एक जिवंत आणि खरंखुरं उदाहरण या सिनेमात दाखवलं गेलं आहे. पण हा विषय काही तसा नवा नाही, या विषयाची जवळपास प्रत्येक व्यक्तीला जान आहेच. बाकी अंगप्रदर्शन म्हणाल तर, आजवर मराठी सिनेमात इतका ठसका बाणा तो हि एचडी स्वरुपात किमान मी तरी पाहिला नाहीये.
ज्यांना कोणाला हा ठसका पहायचा असेल, त्यांनी शिकारी व्हावं आणि हि शिकार करून यावं..!

No comments:

Post a Comment