माझे वडील मांसाहाराचे खूप शौकीन होते.!
मांसाहार म्हणजे, त्यांचा अगदी जीव कि प्राण होता. त्याला कारण सुद्धा, ती मुंबईच.
मुंबई मधील, कुंभारवाड्यात एक चार माळ्याची इमारत होती. तो कुंभारवाडा नेमका कोणत्या भागात आहे ते मला सांगता येणार नाही. पण त्याच्या आसपास, जुना बाजार होता असे माझे वडील मला सांगायचे. माझे वडील, त्याला चोर बाजार असं सुद्धा म्हणायचे. तर त्या भागामध्ये असणाऱ्या एका इमारतीमध्ये, तिसर्या माळ्यावरील जिन्या खालील जागेमध्ये. एक छोटीशी खोली काढली होती. समोरून मोठी आणि शेवटला निमुळती होत गेलेली अशी ती रूम होती. आणि त्याठिकाणी, माझ्या आई वडिलांनी त्यांचा नवीन संसार थाटला होता.

ती खोली इतकी लहान, कि तिला म्हणावी इतकी खोली रुंदी किंवा उंची सुद्धा नव्हती. जेमतेम, चार माणसं झोपतील एवढीच जागा. तिथेच कोपऱ्यात एक छोटंसं स्वयपाकघर होतं. त्या खोलीमध्ये, सरळ उभं असं राहाताच येत नव्हतं. अगदी ओणवं उभं राहावं लागायचं. नाहीतर, चुकून सरळ उभं राहिलं, तर.. डोक्याला टेंगुळ हे ठरलेलेंच. त्या खोलीत इतकं गुदमरायला व्हायचं कि बस. बाहेर जिन्यात आल्यावर थोडं हायसं वाटायचं.
त्या इमारतीच्या बाजूला खेटूनच, एक देवीचं मंदिर सुद्धा होतं. तिथे सकाळ संध्याकाळ आरतीची घनघन ऐकू यायची. इमारती शेजारी मंदिर जरी असलं. तरी, चारी बाजूने सकाळ संध्याकाळ मासे तळल्याचे शुभ समाचार नेहमी येत असायचे. आजूबाजूला राहणारे, जवळपास सगळे कोकणी लोकं. त्यामुळे, आमच्या आई वडिलांना सुद्धा त्याची सवय होऊन गेली होती. आमच्या घरी सुद्धा, रोज मांसाहार असायचा. स्वस्ताईचा काळ होता. त्यामुळे, माझ्या आई वडिलांचा संसार अगदी सुरळीत चालला होता.
माझे वडील, पक्के मांसाहारी. आणि, आई सुगरण. त्यामुळे, मला सुद्धा मांसाहाराची खूपच चटक आहे. माझ्या वडिलांना, मटनातील खूपच माहिती. त्यांच्यामुळे मला, मटनातील विविध प्रकार खायला मिळाले. नाहीतर इथे, सर्रास लोक मटन एके मटन इथेच अडकलेले असतात. बाकीची, त्यांना काही माहितीच नसते.
रक्ती, भेजा, मुंडी, पाय, वजडी , फोफीस, तिळवण,गुडदा, मटणातील सगळी माहिती मला माझ्या वडिलांमुळे झाली. मटनापेक्षा, वरील मांसाहारी पदार्थांचा मी खूप शौकीन आहे. भेजा फ्राय, भाजलेली मुंडी, भाजलेला पाया आणि त्याचा सूप किंवा पाया बिर्याणी. हे सगळं माझ्या विशेष आवडीचं.
माझे वडील १९६९ पर्यंत मुंबई मध्ये होते. त्यानंतर, पुण्यातील हिंदुस्तान एंटीबायोटिक्स
( एच.ए. फेक्टरी ) ह्या नव्याने सुरु झालेल्या सरकारी औषधी कंपनीमध्ये, कामगारांच्या काही जागा भरायच्या होत्या. हि बातमी, माझ्या वडिलांच्या कानावर आली. त्यावेळेस, पन्नास रुपयाचा फॉर्म घेऊन माझ्या वडिलांनी मुंबई सोडली, आईला आणि माझ्या भावंडांना आईच्या माहेरी ठेवलं. आणि माझ्या वडिलांनी तडक पुणे गाठलं.
नव्याने सुरु झालेल्या कंपनी मध्ये, कायमचं बस्तान बसून जाईल. अशी आशा, माझ्या वडिलांनी उराशी बाळगली. परंतु, इथे आल्यावर सुद्धा, त्यांच्या पदरी निराशाच पडली. नोकरीचं आमिष दाखवून, त्यांच्या हाती खोटा फॉर्म देण्यात आला होता. त्यावेळेस, माझ्या वडिलांची, पन्नास रुपयांची फसवणूक झाली होती.
तेंव्हाचे पन्नास रुपये म्हणजे बरेच मोठे होते. अशी, बर्याच लोकांची फसवणूक झाली होती. पण माझ्या वडिलांनी मनाशी जिद्ध बाळगली. पुन्हा फिरून मुंबईला जायचं नाही. असं, ठरवलं. आणि, पुण्यातच आपलं बस्तान बसवलं.
पुढील दोन वर्षातच, पुणे मुक्कामी आस्मादिकांचा जन्म झाला. जर, तो नकली फॉर्म देणारा व्यक्ती माझ्या वडिलांना भेटला नसता. तर कदाचित, आज मी सुद्धा मुंबईकरच असतो. मला अगदी अंधुकसं आठवतंय,
१९७७ साली माझ्या वडिलांनी... जिन्याखाली असणारी त्यांची ती रूम, कोणाला तरी विकली. त्यावेळी, मी त्यांच्या सोबत मुंबईला गेलो होतो. आता ते ठिकाण मला नीटसं आठवत नाहीये. पण ती परिस्थिती अजून आहे तशीच असणार आहे. जमल्यास त्या भागाला मला पुन्हा एकदा भेट द्यायची आहे.

काळ वेगळा होता. चांगला होता असे म्हणता येणार नाही. वाईट पण नव्हता. पण खूप बोअर काळ होता तो.
ReplyDelete