सैराट..
अपेक्षापूर्तीचं ओझं डोक्यावर घेऊन, दोन शब्द लिहून मोकळा होतो..!
गावरान ढंगाचा बाज, आणि त्यावर मखमली कलाकारांचा सरताज घेऊन, नेहमीप्रमाणे नागराज आपल्या भेटीला आला. आणि सर्वांची मने जिंकून गेला. लढ रे बेट्या, मराठी माणूस तुझ्या सदैव पाठीशी असेल. प्रेमरस चाखलेल्या. किंवा, त्यापासून दोन हात दूर राहिलेल्या. अशा प्रत्येक गटातील घटकांनी एकदा तरी अवश्य पहावा असा सिनेमा आपल्या भेटीला आला आहे.
तसा तर, वेळेअभावी हा सिनेमा मी फार उशिरा पाहिला.
परंतु.. हा सिनेमा पाहण्याकरिता, जनसामान्य लोकांच्या निघालेल्या झुंडी मी बऱ्याच वर्षांनी याची डोळा पाहिल्या. अगदी तळागाळातील व्यक्ती, नागराजची कलाकृती पाहण्याकरिता उतावीळ झालेला पाहायला मिळत होता.
खूप जुने दिवस आठवले, ज्यावेळी..चित्रपट म्हणजे एक उत्सव असायचा. नवीन कपडे घालून सजून, धजून नट्टापट्टा करून, सगळं कुटुंब सिनेमा पाहायला जायचं.
मध्यंतरीच्या काळात. टीव्ही सारख्या माध्यमांच्या अतिरिक्त भडिमारामुळे..
हे सगळं.. काळाच्या उदरात गडप झालं होतं. त्याला, नागराजने पुन्हा एकदा ताजंतवानं केलं, नव संजीवनी दिली, पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याकरिता, त्याचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत..

आवड, निवड, या गोष्टीत बिलकुल चूक न करता. पुन्हा एकदा त्याच प्रकारच्या थोड्या नव्या विषयाला सामोरं जात असताना. आण्णाचा नेहमीचा चोखंदळपणा, पुन्हा एकदा कामी आला.
अगदी सुरवातीलाच.. अवघडे बंधूंना सिनेमात पुन्हा एकदा पाचारण करून, हलगी वादनाला जागतिक दर्जाची जपणूक दिल्याबद्दल नागराजचे मनापासून स्वागत,
पहिल्या डॉक्यूमेंट्री पासून त्याच्या सोबत काम करत असणारा, तो चिमुकला..
" सुरज " आता.. तो सुद्धा, बराच मोठा झालाय म्हणा. त्याला, पुन्हा एकदा संधी देण्यामागे. त्याचा, नक्कीच काहीतरी चांगला "पायगुण" वगैरे असावा. माझ्या ह्या म्हणन्याला, खुद्द नागराज सुद्धा नक्कीच नकार देऊ शकणार नाही.

" प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं "
नेमकं.. याच गोष्टीला छेद देत, नागराजने रसिक मंडळीच्या काळजाला 'जाणीवपूर्वक' हात घातला. आणि, त्यात तो सफल सुद्धा झाला. कधीही न संपणारी जाती व्यवस्थे मधील तेढ, योग्य रीतीने मांडता येणं. हे फार मोठं कौशल्य, या माध्यमातून साध्य झाल्याचं दिसून येतं.
" प्रेम आंधळं असतं.. आणि, लग्नानंतर ते भोंगळं होतं. "
माझ्या.. ह्या स्वरचित संवादाप्रमाणे, सिनेमामध्ये सगळं काही अगदी नीटनेटकं आणि योग्य पद्धतीने बसवलं गेलं आहे. सिनेमाचं कथानक फार मोठं नाहीये. पण, त्या कथानकाला मोठं करून दाखवायचं कौशल्य, नागराजने अगदी बखुबी निभावलं आहे.
आणि त्यात, मराठमोळा सांगीतिक वारसा लाभलेली माननीय जोडगोळी.. मी त्यांच्यासमोर अगदी नतमस्तक आहे. मी तर म्हणेल, सिनेमा हिट होण्यामागे हॉलिवूड मध्ये रेकोर्डिंग झालेल्या संगीतासोबतच, त्याची योग्यप्रकारे जी जाहिरात झाली. आणि, नागराजने शेवटपर्यंत सिनेमाचा आशय आणि विषय या बद्दल बाळगलेली कमालीची गुप्तता. याला, मी शंभर पैकी दीडशे गुण नक्कीच देईल..

आर्चीच्या बिनधास्त आणि धडाकेबाज अभिनयाला सलाम आहे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेल्या कलाकारा विषयी, मी बापडा जास्ती काही लिहू शकत नाही. पोरगी.. आई बापाचं नाव नक्कीच रोषण करणार. पण सोबतच, नागराज आण्णाचे कष्ट जिद्द आणि मेहेनत याला तिने कधी विसरू नये. एवढीच माफक अपेक्षा.
तर, त्या.. चिकण्या नवोदित परशा करिता हा सिनेमा नक्कीच " रेड कार्पेट " ठरणार आहे. यात बिलकुल शंका नाही. त्याच्या बोली भाषेतला गावरान भाषेचा अडसर दूर झाला,
तर.. तो मराठी सिनेमातील चॉकलेट हिरो होण्यास नक्कीच पात्र ठरेल.

इतर सहकलाकारांनी दिलेली उत्कृष्ट साथ, ह्या सिनेमाची फार मोठी जमेची बाजू आहे. सल्या आणि प्रदीप यांच्या भूमिका चिरकाल स्मरणात राहतील.
त्याचप्रमाणे, त्यांना या क्षेत्रात पुन्हा संधी मिळेल कि नाही..? या विचाराने, माझं मन झुरणीला लागल्याशिवाय राहत नाही.
त्या बालकलाकाराने वठवलेली भूमिका अगदी अफलातून आहे. अंतकरणाचा ठाव घेतला त्या बाळाने. " त्या बाळाचे पाय, पाळण्यात दिसलेत म्हणायला काहीच हरकत नाहीये. " आणि ते नागराजच्या चाणाक्ष बुद्धीने बरोबर ताडलं सगळं काही अगदी लाजवाबच..
बाकी.. इतर ज्ञात, अज्ञात कलाकारांनी सिनेमाला सोनेरी कळस लावला. म्हणून नागराज सुद्धा सफल झाला..

आयुष्याचा फेरा मारत असताना. थोड्याफार फरकाने, आम्ही दोघे उभयता सुद्धा यातून बऱ्यापैकी गेलो आहोत.
त्यामुळे.. " सिनेमाचा 'रक्तरंजित' शेवट आमच्या मनाला भयंकर चटका लाऊन गेला...! "
बाकी एकुणात.. हा सिनेमा,

" सैराट " पेक्षा जास्त पटीने " झिंगाट " आहे, यात यत्किंचितही शंका नाही.
No comments:
Post a Comment