#रेड..
अजय देवगण आणि अक्षय कुमार, हे दोन्ही सिनेकलावंत भारतात घडलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर सिनेमाच्या माध्यमातून नेहेमीच प्रकाशझोत टाकत असतात.
रेड सिनेमाचं कथानक, हे एका सत्य घटनेवर आधारित आहे. १९८१ साली, भारतातल्या लखनौ शहरात घातलेल्या फार मोठ्या आयकर छाप्याची घटना या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
आयकर विभागाचा एका निधड्या अधिकार्याच्या भूमिकेत खुद्द अजय देवगण, अमय पटनायक नावाने हि भूमिका साकारत आहे. त्याचा नेहेमीचा तगडा रुबाब या सिनेमात सुद्धा मस्त कामगिरी करून गेला आहे. आयकर विभागात कामाला असून सुद्धा, एक रुपयाची लाच न घेणारा असा हा अधिकारी या सिनेमात दाखवला आहे.
आणि हि व्यक्ती त्या सुमारास प्रत्यक्षात होती. आणि आजही ती जीवित असावी असा माझा अंदाज आहे.

सात वर्षाच्या नोकरीचा काळात. तब्बल एकोणपन्नास वेळा बदली झालेला हा अधिकारी फारच बहादूर दाखवला आहे. एका पार्टी सीनमध्ये, अजय देवगण त्या ठिकाणी पायात चप्पल घालून तिथे गेलेला असतो. कारण, बूट वगैरे सारख्या चैनीच्या वस्तू पायात घालणं त्याला परवडणारं नसतं.
लखनौ शहरातील एका व्यापार्याने.. एक फार मोठी मेजवानी आयोजित केलेली असते. आणि त्या ठिकाणी चप्पल घालून जाण्यास परवानगी नसते. ज्यावेळी हि गोष्ट त्या यजमानांना समजते. त्यावेळी.. ते चक्क नोकराला दुकानातून एक नवीन बूट खरेदी करून आणायला सांगतात. आणि ते बूट घालून तो अधिकारी त्या पार्टीत गेलेला दाखवला आहे.
हि अधिकारी व्यक्ती इतकी इमानदार दाखवली आहे. कि, त्या बुटाचे पैसे सुद्धा ती त्या यजमानांना परत करते. कारण लाच घेणं किंवा कोणतीही गोष्ट फुकटात घेणं त्याच्या तत्वात बसत नसतं.
त्या उंची पार्टीमध्ये, फार उंची प्रकारचं मद्य ठेवलेलं असतं. पण फुकटात मिळतंय म्हणून, कोणतीही दारू ढोसा असं न करता. आपला नेहमीचा घोडा छाप रम पिणंच तो पसंत करत असतो. त्याठिकाणी एक सुंदर डायलॉग दिलेला आहे.
तुम्ही कोणत्याही पार्टीत जावा, पण तुमच्या खिशाला जी दारू परवडते तीच प्या. त्यामुळे तुम्हाला अवघडल्यासारखं वाटणार नाही. कारण रोजच्याला, तुम्हाला तीच दारू प्यावी लागणार असते.

त्या पार्टी मध्येच, त्याची ओळख त्या भागातील एका नामांकित खासदारा सोबत होते. अर्थातच.. लखनौ मध्ये बदली झाल्यापासून, हा व्यक्ती त्याच्या लिस्टमध्ये असतो.
त्या एम.पी. च्या घरामध्ये.. चारशे वीस कोटीची काळी संपत्ती आहे. याची त्याला खबर मिळते, आणि या एकमेव छाप्यावर या सिनेमाचं सगळं कथानक साकारलं गेलं आहे.
घरका भेदी लंका ढाये.. या उक्तीप्रमाणे, त्या खासदाराच्या घरात असणारी बेहोशोबी संपती दडवून ठेवली आहे. एवढी खबर मिळते. पण ती नेमकी कुठे दडवून ठेवली आहे.?
त्यासाठी त्यांना अगदी जंगजंग पछाडावी लागते. हे सीन पाहताना.. आपल्या बुद्धीचा सुद्धा बराच कीस पडतो. या खासदाराने, सगळी संपत्ती बाहेर युटीलाइज करून ठेवलेली असते. त्यामुळे, तो निर्धास्त असतो. पण ऐनवेळी, त्याच्या घरात करोडोची मालमत्ता सापडते, तेंव्हा तो सुद्धा कमालीचा चिंताग्रस्त होतो. आणि आपल्या पाठीमागे आपले म्हणवणारे बंधू इतक्या मोठ्या संपतीचा अपहार करू शकतात, हे पाहून तो सैरभैर सुद्धा होतो. हे सर्व प्रसंग घडत असताना, मध्ये मध्ये, फार गमती जमती दाखवल्या गेल्या आहेत.
हा छापा थांबवण्यासाठी तो खासदार त्याकाळी, चक्क इंदिरा गांधी यांच्याकडे सुद्धा गेला होता. तरी सुद्धा तो नाकाम झालेला दाखवला आहे. त्यानंतर.. त्याच्या ठेवणीतल्या जनतेने घातलेला धुमाकूळ, आणि त्याचं जीवघेणं चित्रीकरण अगदी अफलातून झालं आहे.

हे सगळं कथानक घडण्यामागे, एक खूपच " आतली " गोष्ट दडलेली आहे. ती सांगितली तर, सिनेमाची सगळी मजाच निघून जाईल. त्याकरिता हा सिनेमा तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच पहा.
अजय देवगण सोबतच, खासदाराच्या भूमिकेत असणारा तगडा अभिनेता सौरभ शुक्ला याने राजाजीची ( एम.पी. ) भूमिका फार चपखलपणे पार पाडली आहे. सोबतच इलियाना डीक्रुजने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका उत्कृष्टपणे निभावली आहे. त्याचबरोबर..अमित सियाल या नवख्या कलाकाराने लल्लन नावाच्या भूमिकेला सुंदर न्याय दिला आहे.

भारतातील, या निधड्या छातीच्या एका अधिकार्याची कहाणी पाहायला, सिनेमागृहात नक्की जावा.
No comments:
Post a Comment