एकदा, मला पैश्याची फारच निकड होती. माझ्यासाठी फार महत्वाचं काम होतं. मला, दोन हजार रुपयांची अत्यंत आवश्यकता होती. वीस वर्षांपूर्वीचा काळ, तेंव्हाचे, दोन हजार म्हणजे बर्यापैकी मोठी रक्कम. आणि, एवढी मोठी रक्कम मला कोणी उसनवार सुद्धा देणारं नव्हतं.
माझी एकमेव भिस्त होती, ती म्हणजे आमची मासिक भिशी. दहा जनात मिळून, महिना दोनशे रुपये याप्रमाणे आम्ही ती भिशी सुरु केली होती.

भिशीच्या बाबतीत, आमचं नशीब कायम फुटलेलं. जेंव्हा आवश्यकता असेल, तेंव्हा आमचा नंबर कधीच निघणार नाही. हि, काळ्या दगडावरील रेष.
त्या दिवशी, संध्याकाळी भिशी फुटणार होती. दोन तीन मित्रांना सुद्धा, मी आगाऊ कल्पना दिली होती. मला पैश्यांची आवश्यकता आहे. जर तुमची भिशी लागली, तर ती मला द्या.
पण, अडचणीला कोणीच उपयोगी पडत नाही. हा, तेंव्हापासून आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. त्यात, आजतागायत काहीच बदल झालेला नाही.

संध्याकाळ झाली, सगळे मेंबर जमा झाले. चिठ्ठ्या उधळल्या गेल्या. तेंव्हा, आमच्यामध्ये एक पद्दत होती. सभासदांपैकी, कोणीच चिट्ठी काढायची नाही. आणि, अगदी लहान अजानत्या मुलाच्या हातून चिट्ठी काढायची. जेणेकरून, कोणाच्या मनात शंका उत्पन्न व्हायला नको.
आता, लहान मुलगा कुठे शोधायचा..?
रोज तिथे, बरीच लहान मुलं खेळत असायची. पण नेमकं, आज मात्र तिथे कोणीच नव्हतं.
तितक्यात, दुरून मला एक लहान मुलगा येत असताना दिसला. मी तर, माझ्या मनात ठरवलं होतं. आज माझा नंबर निघाला, कि चिट्ठी काढणाऱ्या मुलाला एक मोठ्ठा बिस्किटचा पुडा घेऊन द्यायचा. आणि, काही वेळात तो लहान मुलगा आमच्यापाशी आला.
आम्हा सगळ्यासाठी, तो मुलगा अगदी अनोळखीच होता. मी, त्या मुलाला जवळ बोलावून घेतलं. आणि, त्याला एक चिठ्ठी काढायला सांगितली. त्या मुलाने, एक चिट्ठी काढली. आणि, आमच्या एका मित्राच्या हातात दिली. आमच्या सगळ्यांच्या नजरा, त्या मित्राच्या आवाजावर एकवटल्या होत्या. मित्राने चिट्ठी उघडली. आणि त्यात, नेमकं माझं नाव होतं.
माझ्या आनंदाला तर, पारावारच उरला नव्हता. अवघ्या अर्ध्या मिनिटात, हा कार्यक्रम आटोपला होता. मी खूप खुश झालो होतो. आणि मला, एकदम त्या लहान मुलाची आठवण झाली.
आणि पाहतो तर काय, तो मुलगा तिथे नव्हता.!

विशेष म्हणजे.. ज्या ठिकाणी, आम्ही चिट्ठी काढण्याचा कार्यक्रम करायचो. त्या दुकानाच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्ठा आणि लांबसडक रस्ता आहे. काही केल्या.. अर्ध्या मिनिटात, तो मुलगा आमच्या नजरे आड होऊच शकत नव्हता. मी त्या मुलाला खूप शोधलं. पण, तो मुलगा मला त्यादिवशी किंवा परत कधीच दिसला नाही.
तो मुलगा कोण होता.? काय होता..? कोठून आला होता...?
किंवा त्याला, कोणीतरी खास माझ्यासाठी तिथे मुद्दाम धाडला होता..?
ते, आजतागायत मला कळलच नाही..!

No comments:
Post a Comment