#न्यूड..
मराठी भाषा तशी फारच अवखळ आहे.
न्यूड या सिनेमाला, जर मराठी नाव द्यावं लागलं असतं. तर ते, फारच बोल्ड आणि " नागवं " वाटलं असतं. त्यामुळे.. सर्रास मराठी सिनेमा दिग्दर्शक, काही विशिष्ट सिनेमांना इंग्रजी नावं देत, संभाव्य विषयाला बगल देत असताना, आपल्याला पाहायला मिळतात.
सेक्स हा शब्द, आजच्याला इतका प्रचलित झाला आहे. कि, आपण एखाद्या चांगल्या ड्रेसला सुद्धा.. " काय सेक्सी ड्रेस आहे " असं अगदी सहज म्हणून जातो.
पण त्याच ठिकाणी.. आपला मराठी शब्द अगदी 'झणझणीत' होऊन जातो. त्याकरिता बहुतेक दिग्दर्शक, त्यांच्या विशिष्ट पठडीतल्या सिनेमाला मराठी नावं देणं टाळत असताना आपल्याला दिसतात. आणि कसं आहे, आपण सुद्धा थोडेबहुत इंग्रजाळलेल्या अवस्थेत असल्याने, ते आपल्या सुद्धा लवकर पचनी पडतं.

अनिल अवचट यांच्या.. धागे उभे आडवे या पुस्तकात, त्यांनी महाराष्ट्रातील बऱ्याच दुर्लक्षित घटकांकडे फारच गांभीर्याने आणि अभ्यासपूर्ण पाहत, त्यावर एक आगळा वेगळा दृष्टीकोन टाकला होता.
मधुर भांडारकर सारखा नामवंत दिग्दर्शक, ट्राफिक सिग्नल किंवा पेज थ्री अशा सिनेमाद्वारे पडद्याआडच्या नवनवीन गोष्टी प्रेक्षकांना दाखवण्यात बऱ्याच अंशी सफल झाला होता.
त्याच विषयाचा धागा पकडून.. दिग्दर्शक रवी जाधव याने, न्यूड नावाचा हा आगळावेगळा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

मुंबईतील.. जे. जे. कला महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना, आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी न्यूड मॉडेल्सची नितांत गरज असते. पण असं चित्र काढून घेण्यासाठी, किंवा.. रेखाटू देण्यासाठी, सर्वांसमोर नागवं होऊन बसणार कोण..?
जुन्या काळात हा विषय म्हणजे फार मोठा कळीचा मुद्दा होता. कारण हे काम म्हणावं इतकं सोपं नाहीये. एखाद्या चित्रकारा समोर, तासंतास नागवं होऊन बसनं म्हणजे, ती स्वतः मध्ये सुद्धा एक प्रकारची फार मोठी कला आहे. आणि या विषयासाठी, कोणतीही स्त्री सहजासहजी उपलब्ध होत नसे. त्यामुळे, हे कार्य करणारी एखादी होतकरू तरुणी मिळाल्यावर, सर्व चित्रकारांची फक्त तिच्या एकटीवरच भिस्त असायची. आणि अर्थातच त्यामुळे, तिला बरीच मागणी सुद्धा असायची.

परिस्थितीने गांजलेली स्त्री सुद्धा, अशी कामं करायला सहजासहजी तयार होत नाही. पण पोटाची खळगी माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. आणि त्यानंतर, या किंवा अशा प्रकारच्या अन्य कोणत्याही कामाला मनुष्य किंवा स्त्री नाही म्हणू शकत नाही. हे सुद्धा तितकच खरं आहे.
काहीच कारण नसताना.. फक्त गल्ला जमवण्यासाठी या सिनेमाला ( A ) प्रौढांसाठी दर्जा प्राप्त करून दिला गेला आहे. खरं तर, हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी पडेल ते काम करायला तयार होत असते. पण त्याच कामाची तिला काही काळानंतर फार मोठी किंमत मोजावी लागते. एकंदरीत या सिनेमाचा असं साधं आणि सोपं कथानक आहे.

न्यूड या सिनेमाचं कथानक.. फक्त आणि फक्त त्या महिलांना समर्पित आहे. ज्यांनी या कलाक्षेत्रात आपलं नागवं पण दाखवून, त्याला रेखाटून घेऊन, स्वतः पडद्या मागे राहून, नवनवीन चित्रकारांना खर्या अर्थाने " जन्म " दिला. त्यांच्या कलेला न्याय मिळवून दिला.
छाया कदम आणि कल्याणी मुळे या दोन्ही अभिनेत्र्यांनी, न्यूड मॉडेल्सची भूमिका अगदी मस्त वठवली आणि पार पाडली आहे.

चार भिंती आड, हे काम करत असताना. या कामातून स्वतःला मिळणारी तुटपुंजी कमाई वगळता, इतरांच्या कलेला न्याय मिळवून देण्यासाठी, स्वतःला नागवं वाहून घेतलेल्या, त्या.. ज्ञात, अज्ञात स्त्रीयांच्या सन्मानासाठी. हा सिनेमा, प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच पाहायला हवा..!
No comments:
Post a Comment