बाहुबली..
तसा तर मी सिनेमाचा म्हणावा इतका शौकीन नाहीये.
बाकी.. इथे असणारे माझे काही मित्र, सिनेमाचे दांडगे हौशी आहेत. काहीजण तर सिनेमाचे इतके शौकीन असतात. कि सिनेमा पाहून आल्यावर, ते लगेच सांगून मोकळे होतात. कि हा सिनेमा बाजारात चालेल कि नाही. किंवा, तो सिनेमा किती चांगला किंवा बकवास आहे. हे सुद्धा ते अगदी सहज सांगून जातात. त्यामागे नक्कीच त्यांचा दांडगा व्यासंग असतो.

माझा विषय थोडा वेगळा आहे. टीव्हीवर किंवा सिनेमागृहात जाऊन पाहिलेले सगळेच सिनेमे मला आवडतात. सिनेमा आवडला नाही..! असं कधी होतच नाही.
मी जास्ती करून सिनेमाला जात नसल्याने, कदाचित मी पाहिलेला प्रत्येक सिनेमा मला आवडत असावा. हे सुद्धा त्यामागील कारण असू शकतं.
आता, हा बाहुबलीच पहा ना.. लोकांनी हा सिनेमा पाहण्यासाठी अगदी झुंबड केली होती. कारण त्यातील सर्वात मोठं सस्पेन्स.. " कटाप्पाने बाहुबलीको क्यों मारा..! "
तर सांगायचा विषय हा आहे, कि या सिनेमातील सस्पेन्स सुद्धा म्हणावं इतकं खास नव्हतं. आणि सिनेमाला विशेष कथानक सुद्धा नाहीये. हे सगळं काही खरं असलं. तरी, हजारो करोड रुपये खर्च करून हा सिनेमा बनवणाऱ्या या सिनेमाच्या निर्माता आणि दिग्दर्शक मंडळीना मला मनापासून सलाम करावासा वाटला.

या सिनेमात..सगळं काही नकली आहे, किंवा जे काही दाखवलं गेलं आहे. ते सगळं ग्राफिक्सच्या माध्यमातून साकारलं गेलं असलं. तरी सुद्धा, सिनेमातील भव्यता पाहून, आणि त्याचं सादरीकरण पाहून मन अगदी उचंबळून येतं. तीन तास मनुष्य अगदी खुर्चीला खिळून बसतो. खरच कमाल असते एकेकाची. बाहुबली सिनेमाचं कथानक जरी विशेष नसलं, तरीसुद्धा सिनेमातील कलाकारांची अदाकारी, संवादफेक, त्यांचं सौंदर्य, आणि भव्यदिव्य सेट्स पाहायला तरी नक्कीच गेलं पाहिजे. त्यात कळस म्हणजे, माझे आवडते संगीतकार एम.एम. क्रीम यांचं विशेष संगीत या सिनेमाला लाभलं आहे. बाकी एस.एस. राजमौली हा मनुष्य माझ्या मनात पक्कं घर करून गेला. माझा मेसेज त्यांच्या पर्यंत पोहोचले कि नाही ते मला माहित नाही.
पण.. राजमौली यांच्या हातून, " महाभारत " साकारलं गेलं पाहिजे. त्या निर्मितीने सिनेमा विश्वातील सगळे रेकॉर्ड नाही तुटले, तर नाव सांगणार नाही..!

मल्टीप्लेक्स मध्ये बटर पोपकोर्न खात सिनेमा पाहण्याची मजा काही औरच असते हो. एका वेगळ्याच विश्वात ते आपल्याला घेऊन जातात. अद्ययावत बैठक व्यवस्था, अगदी पायाखाली सुद्धा मखमली गालीचा असतो. शिवाय पाण्याची बाटली ठेवायला हातापाशी विशिष्ट कप्पा दिलेला असतो. ध्वनी यंत्रणा तर इतकी कमालीची असते, कि विचारता सोय नाही. आता तर मी ठरवलं आहे, शक्य तितके आणि जमेल तितके सिनेमे पहायचे. त्यामुळे, माझ्या जीवनातील आजचा दिवस खरोखरच खूप खास असेल.
No comments:
Post a Comment