Saturday, 12 May 2018

एक तरुण तडफदार जानजवान मुलगा नगरसेवक म्हणून निवडून आला. हा मुलगा म्हणजे कार्य कुशलतेने नटलेलं एक उमदं व्यक्तिमत्व होतं..
कोणाच्याही अडी अडचणीला धावून जाने, गोर गरिबांच्या घरातील कार्यक्रमांना जातीने हजर राहणे. वार्डातील छोट्या मोठ्या समस्या तातडीने सोडविणे. इतकंच काय, काही नागरिकांच्या घरगुती तंट्यात सुद्धा मध्यस्थी करून देणारा असा हा नगरसेवक होता. त्यामुळे अर्थातच, तो त्या परिसरात कमालीचा लोकप्रिय होता. कोणत्याच कामाला त्याचा नकार नसल्याने, त्याचा दांडगा जनसंपर्क वाढला होता. तो कोणत्याच कामाला कधीच नाही म्हणत नसायचा.
आजच्याला नगरसेवक व्हायचं म्हणजे.. साम, दाम, दंड, भेद..! या सगळ्या गोष्टींचा अवलंब करावा लागतो. त्याशिवाय अशी पदं भूषवता येत नाहीत. हि सत्यता सुद्धा नाकारता येणार नाही. पण आता पहिल्या सारखी परिस्थिती उरली नाहीये. लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना गुंडागर्दी करून जमत नाही. आणि नेमका त्याचा काही लोकांनी गैरफायदा घ्यायला सुरवात केली.
काही बिन कामाचे जेष्ठ नागरिक, रोजच्या रोज काही तरी अडचणी घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये ठाण मांडून बसायचे. शेवटी या रोजच्या कटकटीला वैतागून त्या नगरसेवकाने एक नवीन उपाययोजना अमलात आणली..
त्याच्या ऑफिसच्या बाहेर, त्याने सीसी टीव्ही कॅमेरे बसवून घेतले. त्यामुळे, ऑफिसमध्ये कोण येत आहे. ते त्याला समोर लगेच दिसून यायचं. मग काही कटकटी मंडळी त्याला टीव्हीमध्ये येताना दिसली, कि हा समोर कोणीही नसताना, ऑफिसमध्ये असा काही जोरजोरात खोटी नाठी आरडाओरड करायचा. विनाकारण तो एखाद्याला जोरजोरात झापण्याचा अभिनय करायचा. त्याचा आवाज सुद्धा इतका मोठा आणि रागीट होता. कि तो आवाज ऐकून, बाहेर तक्रार घेऊन येणारे लोकं. त्याच्या आवाजाला घाबरून बाहेरच्या बाहेरच निघून जायचे. अशा पद्धतीने, त्याने या त्रासातून आपली सुटका करून घेतली.
काही लोकं बोट धरायला दिलं, कि लगेच हात धरायला बघतात. त्यामुळे, हाती आलेल्या चांगल्या संध्या सुद्धा ते गमावून बसतात.

No comments:

Post a Comment