Saturday, 12 May 2018

मी, आजवर कायम म्हणत आलोय..
आणि आजही म्हणतो, कि.. भारत हा निव्वळ नालायक लोकांचा देश आहे.
या वरील वाक्याचा अर्थ नीट लक्षात घ्या बरं का..!
मी.. आपल्या भारत देशाला नालायक म्हणत नाहीये. आणि.. मी वर म्हंटल्या प्रमाणे, या नालायक लोकात, मी सुद्धा एक महानालायक आहे. हे सुद्धा, मी इथे प्रांजळपणे कबुल करतो. कारण, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये..!
" सब गधे, तो हम कहा सीधे..? "
भारतवर्षात, आजवर हजारो मुली आणि महिलांवर बलात्कार झाले असतील. माझ्या माहितीप्रमाणे, त्यातील अगदी काही मोजकी प्रकरणं आपल्या समोर आली असावीत. नाहीतर, अब्रूला घाबरून बरीच प्रकरणं आजवर दडपली गेली आहेत, आणि इथूनपुढे सुद्धा दडपली जातील. यात तिळमात्र शंका नाही.
पण.. मला तुम्हा सर्वांना इथे एक गोष्ट विचारावीशी वाटतेय.
कि, लाज आणि अब्रू फक्त स्त्रीलाच वाटून दिली आहे का..? आता सगळे जोशात आहेत, त्यामुळे कोणीही या विषयाची वाच्यता करणार नाही. पण एक गोष्ट आहे मित्रांनो..
" दिवाळीला कोणीही, शिमगा साजरा करत नसतो.! "
त्याकरिता आज मी तुमच्या समोर, एक वेगळाच विषय पेश करत आहे.. अरे मित्रांनो.. बलात्कार हे काय फक्त स्त्रिया किंवा मुलींवरच होत असतात का..? फक्त या विषयात, स्त्रियांचा टक्का जास्ती असतो. हि गोष्ट मला सुद्धा मान्य आहे.
पण कसं आहे, या विषय वासनेतून.. चक्क, कोवळी मुलं सुद्धा सुटली नाहीयेत हो.
कारण.. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला, आपली लैंगिक भूक शमवण्यासाठी..
फक्त, एक XX हवं असतं..!
मग ते.. एखाद्या स्त्रीचं असो, मुलीचं असो, किंवा एखाद्या कोवळ्या मुलाचं असो.
बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. आवड किंवा निवड नसते. तो फक्त आणि फक्त, त्या मांसल भागाच्या घर्षणाच्या आधारे आपली लैंगिक तृष्णा तृप्त करत असतो. आजवर मी अशा कित्तेक केस पाहिल्या आहेत. ज्यामध्ये पिडीत विषय हा " मुलगा " होता..! सांगा ना मला.. हे विषय असे सहजासहजी संपत असतात का.?
कोणीतरी कुरापत काढतं, आणि जुन्या जखमा पुन्हा एकदा ताज्या होतात.
लहानपणी, माझ्या ओळखीत असणाऱ्या माझ्याच वयाच्या एका मुलाचं वारंवार लैंगिक शोषण होत गेलं. आणि कालांतराने, तो मुलगा शेवटी गे झाला. वासनांध व्यक्तींच्या इच्छा तृप्त करता करता..शेवटी तो एड्स होऊन मेला.
भारत वर्षात आजवर असे कितीतरी मुलं, या वासनांध विषयाच्या पडद्यामागे.. दडून, झुरून, मरून गेली असतील त्याची गणती नसावी.
बलात्कार हे विषय होत राहणार आहेत. जोपर्यंत यावर काही जबरी तोडगा किंवा शासन निर्माण होत नाहीये, तोवर याला कोणीही अटकाव करू शकणार नाहीये. काही मित्रांना माझे हे बोल खूप कडू वाटतील. पण जे आहे, ते अगदी असं आहे बघा.
मित्रांनो..हे जे काही प्रकार घडत आहेत. ते खरोखर अगदी निंदनीय आहेत. आता खरोखर हे सांगायची वेळ आली आहे.
दिखावे पे मत जाव, जरा खुदकी अकल लगाव..!

No comments:

Post a Comment