Wednesday, 10 May 2017

काल मेडिकल चेकअप करण्यासाठी माझी सौ डॉक्टरांकडे गेली होती. पुण्यामध्ये नाडी परीक्षणात अव्वलस्थानी असणारे असे ते डॉक्टर आहेत.
तर.. त्यांनी माझ्या बायकोच्या मनगटाला धरून तिचं नाडी परीक्षण करायला सुरवात केली. परीक्षण झालं,
आणि ते म्हणाले..
तुम्हाला.. गुडघेदुखी आणि कंबर दुखीचा त्रास आहे. बरोबर आहे का..?
माझ्या बायकोने लगेच होकारार्थी मान हलवली.
त्यावर ते डॉक्टर तिला म्हणाले.. तुम्हाला आणखीन काही त्रास होत आहे का..?
तर हि म्हणाली.. मुंग्या येतात..!
त्यावर डॉक्टर म्हणाले.. कोणत्या येतात, पिवळ्या, निळ्या, हिरव्या..?
डॉक्टरांनी विचारलेल्या या प्रश्नावर माझी बायको पक्की गोंधळून गेली. आणि, विनोद समजल्यावर थोड्यावेळाने माझ्या बायकोसोबत ते डॉक्टर सुद्धा जोरजोरात हसू लागलो.

No comments:

Post a Comment